Thursday, August 24, 2017

लेख ८ वा- हितगुज - ख्याली-खुशाली - अरुण वि.देशपांडे

Friday, August 11, 2017

लेखमाला - हितगुज "-लेख क्र-७ - वेळ कसा घालवायचा ?

लेखमाला - 
हितगुज "-
लेख- वेळ कसा घालवायचा ?
-----------------------------------------------------------

हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडत असतो . जे लोक इतर वेळी आपापल्या कामात असतात , त्यांना काम संपवल्यावर जो रिकामा वेळ असतो ..तो थोडा असो व खूप ..अशावेळी त्यांना एकच चिंता असते - "बापरे ,आता हा वेळ मी कसा घालवू ? 
आणि जे लोक रिकामेच असतात ,त्यांना वेळच वेळ असल्यामुळे ."वेळ कसा घालवू ? हा प्रश्न त्यांना कायमच पडलेला असतो. निवृत्त झालेली माणसे, आणि वृध्द  आणि  "जेष्ठ-नागरिक " यातील सगळ्यांनीच काही -स्वतहाला   कोणत्या न नकोणत्या कामात गुंतवून घेतलेले असते  असे नसते , या वयोगटात सुद्धा अनेकजण असे असतात की ..त्यांना "उगवलेल्या दिवसभरात ..कस वेळ काढायचा ? हा प्रश्न पडलेला असतो.

या "वेळेचे काय करायचे किंवा "मी वेळ कसा घालवू ?" 
मित्रांनो - हा प्रश्न आपल्याला व्यक्तिगत  रूपाने सोडवत येतो ,तसाच तो सामुहिक रूपाने सुद्धा सोडवता येऊ शकतो 
आता हेच पहा .. नेहमी कामात व्यस्त  असलेल्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावे की - कामाच्या तणावाने आपले मन थकून  गेलेले असते, आणि आपले शरीरही  तितकेच थकून गेलेले असते.. .पण, या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला सवयच नाहीये ,आणि अशा "विश्रांतीचे काय महत्व आहे ? हे सुद्धा  जाणून घेण्याची त्यायारी कधी दाखवत नसतो.

त्यामुळे ..आठवड्याची सुट्टी .मग ती रविवारी असेल, किंवा कार्यालयाच्या नियमाप्रमाणे एखाद्या दुसऱ्या एखाद्या दिवशी असेल , या ऑफ -डे " च्या दिवशी..नेहमीच्या रुटीन कामाला बाजूला सारून .खूप दिवसा पासून न केलेले एखादे आवडते काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यास आरंभ केला तर " बघा ..तुम्हालाच नंतर जाणवते ..अरेच्च्या - हे काम करतांना मला तर वेळेचे भानच उरले नाही की..या वेळेत काम पूर्ण झाल्याच आनंद तर अधिकच ,मग .कंटाळा आणणारा वेळ अशा सत्कार्यात घालवला तर "वेळ सारथी लावल्याचे समाधान नक्कीच मिळवता येते.

वेळ छान केंव्हा  जातो ? 
या प्रश्नाचे उत्तर आहे ..कामाच्या माणसांचा वेळ कामातच छान जातो आणि ..आळशी माणसांचा वेळ अर्थातच "आळसात-आरामत जात असतो ". पण, मित्रांनो .या दोन्ही प्रकारच्या "वेळ घालवण्यात खूप मोठा फरक आहे , जो नेहमी कार्यरत असतो ,त्यला सारे जग विचारीत असते , आणि जो फक्त आळसात .म्हणजेच "निष्क्रिय -राहून वेळ वाया घालवतो त्याला लोकांच्या दृष्टीने  काही किंमत नसते ..

यावरून एक अनुमान  काढू शकतो की - विधायक कार्य करण्यात वेळ घालवणे -हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात भर टाकणारा गुण आहे ", आणि म्हणून " निष्क्रिय- माणूस " म्हणजेच वेळ वाया घालवणारा माणूस , त्यापासून दूर राहणे बरे ", असे लोक ठरवतात..

प्रत्येक वयोगटातील स्त्री--पुरुषांनी , तरुण -तरुणींनी , मुला-मुलींनी " नेहमीच "वेळेचे नियोजन"करण्यास शिकले पाहिजे ..म्हणजे .जुन्या जमान्यातील सुत्राप्रमाणे ." काळ-काम "यांचे गणित सोडवतांना .लागणाऱ्या वेळेचा योग्यतम उपयोग करता येणे शक्य असते.

आपल्या हाती असलेल्या वेळेत आपण काय करावे याला ही खूप महत्व आहे" त्यामुळेच "आपण वेळेचा सदुपयोग करतोय की वेळेचा अपव्यय करतोय " याचे भान असायला हवे आहे..
योग्य पद्धतीने -नियोजनपूर्वक- आणि दिलेल्या वेळेनुसार कार्यपूर्ती "या परीक्षेत पास होणारी व्यक्ती ..कधी अपयशी झालेली आहे " असे दिसून येणार नाही , सहाजिकच ..फावल्या वेळेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात .अशा वेळी त्यांना कुणी..म्हणणार नाही की- हा फुकटचा वेळ वायाघालवतो आहे "
,
विद्यार्थ्यांनी .अगोदर अभ्यासाचा वेळ, मग, खेळायचा वेळ ..हे दोन नियम पाळले तर .त्यांना बोलणी खाण्याची वेळच येणार नाही.. पण बहुतेक वेळा उलटे होते .कारण अशी मुलं - अभ्यासाच्या वेळेतच - काही न करता बसून राहतात ..,खेळायची वेळ झाली कि मात्र ...वेळ कसा घालवू ? हा प्रश्न नाही पडत.

आपल्या सर्वांचा खुपसा  वेळ "करमणूक "या नावाखाली आपण घालवतो . "मन रमवणे -या साठी आपण .नेहमीच 
टीव्ही  आणि त्यावरच्या मालिका आणि इतर कार्यक्रमा पहाण्यात खूप वेळ  घालवतो , आता तर इंटरनेटवर- फेसबुक आणि  मोबाईल वरचे गप्पा -ग्रुप ", आणि "फ्रेंड बरोबरच्या गप्पा " यात किती वेळ घालवला जातोय  जातोय " हा प्रश्न आता सामाजिक चिंतनाचा विषय बनून राहिलेला आहे.
यात वेळ घालवणारे .याचे समर्थन तितककेच जोरदार करतात , दुसरी बाजू अशी पण आहे की " या सर्व 'गोष्टीत "वेळ वाया घालवला जातोय " असे मत व्यक्त करणारे काही कमी नाहीत 

आजकाल ...असी परिस्थती दिसते आहे की ..घरात माणसे नाहीत .जी आहेत ती .कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात .अशा वेळी जी कुणी व्यक्ती घरात शिल्लक राहते ..तिच्या समोर .. "वेळ कसा घालवू ?,
हा प्रश्न एखाद्या संकटां सारखा भीषण स्वरूपाचा  होऊन बसलेला असतो...
अशा  व्यक्तीला आपण  " वेळ घालवण्यासाठी तू अमके कर, तू हे कर, तू ते कर " सूचना करणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कदाचित तो वैतागेल आणि रागाने म्हणेल सुद्धा.. आलास मोठा शहाणा ..मला सांगणारा .तू बघ न राहून .अशा बंद घरात .मग कळेल तुला ..माझी व्यथा .." 
मित्रांनो त्याचे दुखः: आणि त्याची व्यथा समजून घेतली पाहिजे .कारण त्याच्यावर जी वेळ "आली आहे ,ती, एक लादलेली अवस्था आहे ..एरव्ही त्याला वेळ कसा घालवू ?" हा प्रश्नच पडला नसता .

थोडक्यात काय तर. "वेळ सगळ्यांनाच सारखा मिळालेला असतो ..त्याचा विनियोग कसा करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे "असे असले तरी .."वेळ वाय घालवू नये ये " तो सदा कार्यापुरती असावा " हे कुणी अमान्य करणार नाही.. कार्यमग्न राहावे - "वेळ कसा घालवायचा  ? हा प्रश्न पडणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- ७ वा ,
हितगुज -लेखमाला 
लेख- वेळ कसा घालवायचा ?
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साभार - साप्ता .पथदर्शनी  अंक.दि.८-७-२०१७ अंकात प्रकाशित लेख.

Tuesday, August 1, 2017

लेख-क्र-६ - समारंभ आणि कार्यक्रम .

Sunday, July 30, 2017

कविता- ओ मनमीत

कविता-
ओ मनमीत ।।
-----------------
हर पल गया बीत
यादोंमे तेरे
ओ मेरे मनमीत ..!

मिलना हमारा
कितना मीठा
सपना प्यारा जैसे
मधुरतम प्रेम गीत...

चांदतारे भी
ऊदाससे
हम भी वैसे
तेरे बिना मेरे मीत..
---------------------------------
कविता- ओ मनमीत ।।
-अरूण वि.देशपांडे- पुणे
---------------------------------

Sunday, July 23, 2017

लेख-४ - कौतुक आणि शाबासकी ..!

लेख क्र-४ 
----------------------------------------

लेख-
कौतुक -शाबासकी ..!
-अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------
आपण केलेल्या कामाचे कौतुक केले जावे , त्यासंबंधी काही प्रोत्साहन देणारे शब्द बोलवे अशी अपेक्षा करणे "यात  गैर मुळीच नाही . आपल्या डोळ्यासमोर एखाद्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण  केलेले काम दिसत असते , हे काम पूर्ण करतांना त्या व्यक्तीने घेतलेले परिश्रम आणि केलेली मेहनत आपण पाहिलेली असते ..आणि आपण पहाणारे या कामाचे एक निरीक्षक असतो  ,अशा वेळी तर .आपल्या कौतुकाला , शब्दांना एक किंमत देखील असते ..सहाजिकच आपण या वेळी कसे आणि किती कौतुक करतो  याकडे लक्ष असणार.हे उघड आहे..

मित्र हो - इथेच अनेकजण कौतुक करण्याचे टाळतात , किंवा .तोंडावर कुणाविषयी चांगले बोलायचे नाही ", अशाने ज्याचे कौतुक करू तो शेफारून जातो " असे यांचे "स्व-मत "असते.त्यामुळे  कौतुक करणे राहून जाते.
कौतुक कुणी कुणाचे करावे ? असा प्रश्न पडू देऊ नका - कारण "आपले कौतुक केले जावे" असे सगळ्यांनाच  वाटत असते ,काहीजण तर आपण कौतुकाचे हक्कदार आहोत असे गृहीत धरून चालतात ..आणि त्याच भावनेतून "हाती घेतलेले कार्य  पूर्ण करीत असतात..निखळ कौतुक "हे मनास स्पर्श करून जाणारे असते. 

कारण याच्या उलट  "तोंड देखले कौतुक " हा प्रकार म्हणजे बनावट आणि देखाव्याच्या कौतुकाचा प्रकार आपण एरव्ही सर्वत्र घडतांना पाहतच असतो.
"कौतुक करवून घेणे ", आणि कौतुक होणे " हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा कौतुकाची ठिकाणे व्यक्तिपरत्वे वेग-वेगळी असतात.
उदा - आपण आपल्या साहेबांच्या घरी -किंवा एखाद्या बडया घरच्या  पार्टीला गेलेलो आहोत - अशा ठिकाणी .जे जे कुणी निमंत्रित आलेलेल असतात त्यांच्यात " पार्टी -होस्ट बद्दल -त्यांच्या फमिली बद्दल कौतुकाचे शब्द बोलण्याची जणू चढाओढ लागलेली असते ", अशा बोलघेवड्या कौतुक-बहाद्दरांच्या सोबत मितभाषी  आणि अबोल स्वभावाची माणसे कौतुक करण्यात कमी पडलीत " हे लगेच पार्टी -होस्ट "यांच्या लक्षात तत्परतेने आणून देणारी मंडळी असतातच.असे व्यावहारिक हिशेबाचे कौतुक "केवळ स्वर्थापोटी केलेले असते..

आपल्या रोजच्या रुटीन -लाईफ मध्ये पावलो पावली कुणाचे ना कुणाचे कौतुक करावे असे प्रसंग नित्य घडत असतात .अशा वेळी प्रसंगोचित कातुक करण्यात आपण कमी पडू नये ", असा प्रयत्न केल्यास .आपल्यामुळे ,आपल्या कौतुकाच्या शब्दांनी , पाठीवर दिलेल्या शबासकीने अनेकंना खूप मोठी प्रेरणा मिळू शकते " हे अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवता आले तर खूप छान होईल.

जो अगोदरच निपुण आहे, हुशार आहे, कामाचा उरक आहे, समज आहे-उमज आहे" अशा व्यक्तीने केलेले काम हे उत्तमच होणार हे वेगळेपणाने सांगायची गरज नाही ..तरी सुद्धा .अशा व्यक्तीच्या कामाची प्रशंसा करणे , कौतुकभरे शब्द बोलून त्याला शाबासकी देणे "यामुळे एक छान काम होते ते म्हणजे "अश्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल योग्य वेळी  घेतली गेली "अशी भावना त्याच्या मनात निर्माण  होते..

होतकरू उमेदवार नेहमीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढून हाती घेतलेले काम पूर्ण करीत असतात , अशा व्यक्तीच्या कामाबद्दल ,त्याच्या यशाबद्दल जाणीव ठेवून त्याचे योग्य कौतुक करणे "हे मनाच्या मोठेपणाचे निदर्शक असते. असे पुष्कळदा होत असते की -अनपेक्षितपणे जबाबदारी घ्यावी लागते ,अशावेळी इतरांची मदत घेत हे काम पूर्ण करू शकणारा ..आपल्याला त्याच्यातील अनेक नेतृत्व -गुणांची झलकच दाखवून देत यशस्वी कामगिरी करून दाखवीत असतो.अशा वेळी वरिष्ठांनी दिलेली शाबासकी आणि सहकारी-मित्रांनी केलेले कौतुक "या दोन गोष्टी फार मोठा भावनिक चमत्कार करून जाणार्या असतात.

मोठ्यांना नेहमीच आपले कौतुक  करवून घेणे मनापासून आवडत असते ..गृहिणींना -त्यांच्या कला-गुणांचे कौतुक व्हावे वाटते, पालकांना वाटते- आपल्या मुलांच्या कलागुणांचे आल्या-गेल्यांनी भरभरून कौतुक केले पाहिजे ,आपणहून केलेले कौतुक नक्कीच आनंद देणारे असते ,परंतु ..कौतुक करणार्याने सुद्धा आपले कौतुक हे खोटे वा कृत्रिम वाटणारे नाहीये " याची काळजी घेतलीच पाहिजे ,असे केले तरच आपली शाबासकीची थाप खरी वाटेल , कौतुकांच्या शब्दांना ऐकून मन आनंदाने भरून येईल.  "कौतुक करणे ,गोष्ट जरी मामुली ,लहान वाटत असली तरी "त्याचे परिणाम फार सुखद आणि मोठे असतात हे विसरून  कसे चालेल.

आपल्या परिवारातील बाल-मित्र- मैत्रिणींचे आपण आवर्जून कौतुक केले पाहिजे ..त्यांच्या भावविश्वात तर रोज अनेक गोष्टी घडत असतात ,त्यांच्या हुशारीस वाव देणारे ,त्यांच्या कलागुणांना दर्शवणारे अनेक कार्यक्रम नित्य होत असतात ..अशा कार्यक्रमात .पहिला -दुसरा नंबर आला तरच कौतक ,एरव्ही नाराजी " याचे भान न बाळगणारे वडील माणसे, आणि पालक ..यांनी वेळीच आपल्या वागण्यात बदल करयला हवा.  चिमुकल्या मनांना कौतुकांच्या शब्दंनी खूप आनंद मिळतो  ..तो आपण देण्यात कमी पडू नये.

आपल्या सहवासात कलावंत ,लेखक-कवी ,खेळाडू , अशी विविध व्यक्तिरेखा असतात.. या सर्व मंडळींना "कौतुकाचे शब्द "हवे असतात , पाठीवरती शाबासकी हवी असते ", अशा सर्वांना -आपण त्यांचे जवळचे आहोत " या भावनेपोटी  न चुकता या सर्वांना वेळोवेळी कौतुक-शब्दांचे गुच्छे देत राहावे . बघा आपल्या अशा करण्याने आणि वागण्याने आनंदाचे वातावरण आपोआपच  तयार होऊन जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
कौतुक -शाबासकी ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साभार - साप्ता -पथदर्शनी  दि.१० जून २०१७ -अंकात  प्रकाशित लेख.

Sunday, July 16, 2017

म.टा- पुणे टाईम्स मध्ये प्रकाशित लेख - आम्ही अचानक भेटलो आणि ...!

पुणे टाईम्स मध्ये - प्रकाशित लेख
आम्ही अचानक भेटलो आणि ...
--------------------------------------------------------
१९६५ सालातील -- हैद्राबाद मधील --काचीगुडातील सरकारी हायस्कूलमधील -हैद्राबाद - मराठी माध्यमाच्या १० वी - ड "च्या वर्गातील आणि ११ वीच्या (एच.एस.सी )वर्गातील विद्यार्थी ..आता २०१७ साली कुठे असतील ..? याची कल्पना देता येणं अवघड आहे. ..पण.आमच्या त्यावर्षीच्या या वर्गातील आम्ही सात जण- २०१२ साली - ४५ वर्षानंतर अचानकपणे पुन्हा संपर्कात आलोत ..आणि बालगंधर्व नाट्यगृह परिसरात ..एकमेकांच्या समोर उभे राहिलोत ..आणि २०१२ पासून आम्ही पुण्यातल्या विविध भागात असूनही - २-४-महिन्यांनी भेटून दिवसभर जुन्या आठवणीत रमतो
आमच्या पैकी तिघे डिफेन्स -मध्ये -अकौंटं- विभागात कार्यरत होते ,आणि अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले.
रवी जोशी -,प्रदीप तुंगार, ,आणि हरीश काशिकर, पद्माकर धाट- , अशोक दळवी सुभाष काळे- आणि मी असे आम्ही सात मित्र .
.हैद्राबाद सोडल्यावर सुद्धा सुभाष काळे आणि मी -कायम संपर्कात होतो .सोबत होतो .त्याचे कारण- आम्ही दोघे ही स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीस होतो .२०१२ मध्ये -मुलुंड-मुंबई- ब्रांच-मनेजर असतांना सुभाष काळे निवृत्त झाला .मी २००६ मध्येच स्वेच्छा -निवृत्ती घेऊन परभणीहून पुण्यात आलो .
आता आमच्यापैकी कुणाला भेटीची इच्छा झाली -की , त्यादिवशी फोनाफोनी होते .लगेच -दुपारच्या निवांत वेळी आम्ही सारे "...
फर्ग्युसन कॉलेजरस्त्यावरील . " गुडलक -मध्ये जमतो . मग काय ...आमची हैद्राबादी मैफल जमते ..
शाळेच्या दिवसात .काचीगुडा परिसरात अनेक इराणी हॉटेल होती. ..बन-मस्का ,आणि सोबत हैद्राबाद्दी चहा -कटिंग .ज्याला .तिकडे चाय -पवना " म्हणत असत . मनात रेंगाळणारी , " ती चव अजून पुन्हा एकदा ", पुण्यात गुडलक मध्ये बसून अनुभवणे अतिशय आनंदाचं असतं
हिंदी फिल्म्स आणि त्यातील गाणी हा आमचा सर्वांचा आवडीचा विषय आहे - त्यामुळे मनाने आम्ही अजून ही हैदराबादच्या आमच्या लाडक्या थियेटर मध्ये असतो- दिलशाद ,रॉयल ,अशोक ,नवरंग ,बसंत , प्रभात , लिबर्टी ,जमरुद मेहल ,प्यालेस..या आणि अशा अनेक थियेटर ची नावं मनात रुंजी घालतात ..आणि ती वर्ष .हिंदी सिने -संगीताचा सुवर्णकाळ होता.
आता आम्ही मित्र ६५ -६७ या वर्षांच्या वयोगटात आहोत. कौटुंबिक जीवनात .आजोबा-आजीच्या भूमिकेत रमून गेलो आहोत ..कर्तबगार-मुलांच्या -लेकी-सुनांच्या संसारात लुडबुड न करता त्याना सोबत करत .निवृतीच जगणं आनंदाने जगत आहोत ..हा आमच्या मैत्री-जीवनातील आनंदाचा समान धागा आहे..
नुकतेच आम्ही काही मित्र सुभाषच्या घरी म्हणजे -डहाणूकर कॉलोनीत जमलो होतो ..मस्त गप्पा झाल्या .आमच्या मैत्रीबद्दल मला कायमच असं वाटतं की.- ये दोस्ताना .कभी ना होगा पुराना .
----------------------------------------------------------
लेख- आम्ही अचानक भेटलो आणि ....
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------
(फोटोतील मित्र- डावीकडून ... पद्माकर धाट , अरुण वि.देशपांडे , सुभाष काळे , हरीश काशीकर )
Comment

Wednesday, July 12, 2017

लेखमाला -हितगुज - लेख- जिद्द -कठोर -परिश्रम ..वगेरे ..

साप्ता-पथदर्शन अंकात प्रकाशित लेख-( मे- २०१७ )



लेखमाला - हितगुज
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
-------------------------------------------------------------------
मित्र हो- नमस्कार..
तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे आहोत ,साधे सरळ असे जगणे आपल्या वाट्याला आलेले  असते, ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट-गाडगे अगदी सामन्या -पणे चालू असते ,अशा परिस्थतीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते ,कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात ,
असे खुपजण असतात की त्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात ,  मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे  निखारे धगधगत असतात . अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या जाणत्या आणि जबादार अशा मार्गदर्शकाची.

आपल्याकडे खुपजण असे आहेत की ..त्यांच्या मनात स्वप्नवत कल्पना असतात ..पण..त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात ",हे त्यांच्या गावी नसते ..सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते.
आता तुम्हीच सांगा.."दे रे हरी पलंगावरी "..असे वागून काही मिळवता येईल का.
जो मेहनत करतो ..आणि अशी मेहनत करतांना अपयश आले तरी .त्याने अजिबात खचून न जाता ..नव्या दमाने ,नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होई पर्यंत परिश्रमात कमी पडत नाही.." त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फल मिळणारच .

मनात जिद्द " नसेल तर .मिळणारे यश सतत हुलकावणी देत असते .कारण..कार्यपूर्ती साठीची वाट पहाणे , त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे , या अधीर -वृत्तीमुळे कित्येकजण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात ..अशावेळी धीर देणारे , खचून  गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर ..कार्य होणे तर दूरच .ते पूर्णपणे भरकटून ..भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते.

जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्य सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते ..या साठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते ,त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना !  इतकेच असून चालणार नाही ..स्वतःच्या कार्यक्षमतेवर विस्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमीच जाणल्या पाहिजे.
शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे ..यात हाती निराशा  लागण्याची शक्यता अधिक असते.

मोठी स्वप्ने जरूर पहावीत ..पण ती सत्यात येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची ,परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे , या ठिकाणी फक्त "स्वप्नाळू -वृत्ती "असून काही उपयोगाचे नाही..तर.. मनाच्या ठायी जिद्द असावी लागते, परिस्थती अनुकूल असो वा प्रतिकूल असो ..यातून मार्ग काढणारा तो खर्या अर्थाने "बाजीगर "असतो, त्याची ओळख "मुकद्दर का सिकंदर "अशी आपोआपच होते.
मनगटाच्या बळावर काय काय करता येते "हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जांबाज " आपल्या अवतीभवती असतात . अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या "आपल्या साठी अचूक अशा मार्गदर्शक असतात.
जीवनात यशस्वी असणार्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो..परिश्रमाला पर्याय नाही.
------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ....
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------