Thursday, March 30, 2017

पुस्तक परिचय - कविता- संग्रह -दरवळ रातराणीचा

पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------

कविता संग्रह -दरवळ रातराणीचा
------------------------------------------------------------------------
सौ.चंदना सोमाणी इंटरनेट आणि फेसबुक्वर नियमितपणे  साहित्य लेखन करणाऱ्या लेखिका आणि कवयित्री आहेत.
२०१६ मध्ये प्रकाशित झालेले  " सुख-दुखांच्या वळणावर ", हे त्यांचे पहिले पुस्तक .  .ललित लेखन सोबत त्यांचे काव्यलेखन ही सहजतेने चालू असते , त्यांच्या गद्य आणि काव्य अशा दोन्ही लेखन प्रकाराला वाचकांनी प्रतिसाद दिला आहे.
सौ.चंदना सोमाणी यांच्या कविता आता संग्रहाच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाल्या आहेत .६७ कवितांचा समावेश असलेल्या त्यांच्या कविता संग्रहाचे शीर्षक आहे - दरवळ रातराणीचा ". २०१७ म्हणजे या वर्षाच्या आरंभीच या कविता संग्रहाचे आगमन झालेले आहे .
प्रस्तुत परिचय लेखात कवयित्री सौ.चंदना सोमाणी यांच्या कवितांचा हा आस्वादात्मक परामर्श ...
 कवींच्या कविता आपल्याला खर्या अर्थाने "जीवन -अनुभव "देणाऱ्या असतात ". एका अर्थाने कविमन हे प्रतिभा-संपन्न असतेच असते ", ",याची प्रचिती कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कविता-लेखनात नक्की जाणवते. या कविता छान आशय असणार्या आहेत " आणि या कविता  कवयित्रीच्या पुढील लेखन-प्रवासाची आश्वासक ग्वाही देतात "हे फार छान वाटावे असेच आहे..

"दरवळ रातराणीचा "या संग्रहातील कवितेतून .कवयित्रीच्या कविमनाचे यथार्थ असे दर्शन तर घडते. कवी त्यांच्या भवती असलेल्या हरेक गोष्टीचा साधक -बाधक विचार करतो ..आणि त्याचे हे विचार कवितारुपात आपल्या समोर अतिशय योग्य शब्दातून मांडतो " .कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कवितेचे स्वरूप हे असे साधे -सरळ आणि निर्मल कविता "असे करता येईल  ".
रातराणी " या कवितेत कवयित्री तिच्या कवितेला उद्देशून म्हणते असेच या ओळीवरून वाटेल -
"खोल श्वासात भरली
 मनात माझ्या उरली
 दरवळ तुझी प्रिय सखी
 माझीच रातराणी गं....(रातराणी ..पृ.८ )

"दरवळ रातराणीचा "संग्रहातील कविता ..परिचित विषय असलेल्या म्हणून फार वेगळ्या आहेत असे मुळीच नाही. पण या कवितेतील त्यांनी व्यक्त केलेला आशय नक्कीच वेगळा आहे "ही आवर्जून सांगावे असे त्यांच्या कवितेचा विशेष गुण आहे. आणि या कवितेतून कवयित्री चंदना सोमाणी यांनी आपल्या वाचकांशी खूप छान असा भाव-संवाद साधला आहे.
कविते विषयीची ही कविता-
" जी ना तुझी  ना माझी
   मी लिहिते म्हणून माझी
   तुम्ही वाचता म्हणून तुमची 
   असते जी सर्वांची ती कविता ....(कविता ..पृ..८१ ),
या संग्रहातील अनेक कविता मधील आशय मनाला खूप भावणारा आहे.म्हणून या कविता वेगळ्या वाटू लागतात ..
ही आणखी एक सुंदर कविता .समाजिक भान देणारी ..
"कालपरत्वे जाण बदल भाऊराया
दे सक्षमतेचा राखीचा नजराणा
कर तिला शिकवून सावरून मोठी
असू दे ती मोठी किंवा छोटी....( राखीचा नजराणा ..पृ..७२ ),

आवडत्या गोष्टीवरची कविता एक वेगळेच भारलेपण घेऊन येते ..
"जीवनात आपल्या मनमोकळे
  खळखळून जागा
  इगतपुरीचा  धबधबा
   शिकवतो पहा कसा ...(इगतपुरी ...पृ.६७ ),,
संदेश देणे, भावना संस्कार करणे .सुविचार असणार्या या कविता ही  कवयित्री समरसून लिहिते ,
एक संकार कविता -
आई सांगे लेकरास ....

पोट भरले असतांना
चव लागत नसते
गरीबाच्या भाकरीला
कष्टाची चव असते ......(फरक दृष्टिकोनाचा ..पृ.५९ ),
लेखक आणि कवी यांच्या लेखनात जेंव्हा आपणास "माणूस "दिसू लागतो,त्याच्या भावना  कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतो "अशा कवितांना एक मोठे सामुहिकआणि सामाजिक  असे परिमाण लाभत  असते .
कवयित्री चंदना सोमाणी  यांनी .माणसांचे  व्यक्ती -रूप  टिपणार्या अनेक कविता लिहिल्या आहेत..
काही कवितांची शीर्षके -
"माणूस म्हणून पाहू "..(पृ.४२ ), ,"शेतकरी "..(पृ/१०) , "व्यसनांचा बाजार "..(पृ..२७), ,"सुरुवात "..(पृ.४६), ,
"मान -अभिमान "..(पृ.५१ ),,नियतीचे दान "..(पृ..५३ ), "जीवन - मरण "..(पृ..५५ ),
वर उल्लेख केलेले कवितांचे एक समान असे सूत्र आहे ..ते असे - या सगळ्या कवितेतून कवयित्री .माणसाबद्दल ,माणसाविषयी ,आणि माणसांला .त्याचे हित कशात आहे..हे सांगते आहे ..आणि हे सगळे सांगणे उपदेशवजा नसून एक  यात  माणसाविषयी वाटणारा आपलेपणा "ही भावना आहे ..ज्या मुळे या कविता एक वेगळा परिणाम साधून जातात.

बाकी नेहमीच्या ..ती आणि तो -यांच्यातील प्रेम-भावना , समाजिक जाणीव आणि बांधिलकी या दृष्टीकोनातून व्यक्त होतांना झालेल्या कविता , आणि काही चिंतनपर कविता ..वाच्वायास मिळतात.
साधी आणि सुयोग शब्द-योजना , शीर्षक आणि आशयाशी  अनुरूप अशी कविता ,मनाला स्पर्श करून जाणारी भाव-कविता " असे वर्णन कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कविता-लेखनाचे करता येईल
" दरवळ रातराणीचा " हा त्यांचा पहिला कविता संग्रह  याची प्रचीती वाचकांना नक्कीच देतो.
कवयित्री सौ.चंदना सोमाणी यांचे अभिनंदन व पुढील लेखन-प्रवासासाठी  शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------
कविता संग्रह -
दरवळ रातराणीचा ..
सौ.चंदना सोमाणी -पुणे.
मूल्य-रु.७५ -/ पृ.८२
------------------------------

प्रकाशक -
रसिका प्रकाशन ,कोल्हापूर ,
मो-९८२३३६१९७७ 
-------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------