Thursday, March 29, 2018

लेख- नातेवाईक असे का वागतात ?

साप्ता.चपराक -पुणे. दि.२६ मार्च २०१८ अंकात प्रकाशित लेख.
लेख-
नातेवाईक असे का वागतात? 
---------------------------------------------------------------------------------------
आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन प्रवासात भावनिक दृष्ट्या आणि व्यावहारिक -दृष्ट्या   मित्रांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे " हे आपण एखाद्या सुविचारा सारखे नेहमी सांगत असतो . या मित्रा इतकेच आपल्या पारिवारिक जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असते -आपल्या  समस्त नातेवाईक मंडळींचे.

एका जुन्या -जाणत्या व्यक्तीने एकदा मला समजावून सांगतांना म्हटले..हे बघा -भाऊसाहेब .एक लक्षात असू द्या नेहमीसाठी  की - 
 " कोणत्या प्रसंगी निभावून नेते ..ते नाते .. आणि आपली अडवणूक करते ते - .ना -धड नाते असते  ना संबंध ", !
आपण आपल्या नातेवाईक मंडळींचा उल्लेख . आपले सोयरे "असे ही करतो . आहे त्या परिस्थितीत सोय "समजून जे सोबत असतात त्यांना सोयरे म्हणायचे , आणि किती ही खातिरदारी करा ..त्यात गैरसोय झाली असेच ज्यांना वाटते आहे त्यात  " उणे "पाहणारे " ते असतात आपले पाहुणे ",
आता तुम्हीच ठरवा नातेवाईकात आपली इमेज .एक चांगला सोयरा म्हणून असावी की उपद्रवी-पाहुणा "?

नातेवाईक असे का वागतात ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे ,सहज आणि स्पष्ट आहे .. त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे .नातेवाईक आपल्याशी आपण कल्पना केली नसेल असेल विचित्र वागतात कारण ".कामापुरते गोड बोलून जवळ आलेली अशी मंडळी ..तुमच्यावर नाराज होऊन ..लगेच पुढच्या घराचा दरवाजा ठोठावण्यासाठी पुढे निघून गेलेली असतात.

 नाते-संबंधात एकमेकांना समजून घेणे "यावर फारसा विस्वास न ठेवता अतिशय वर-वरच्या माहितीवर विस्वास ठेवून स्व-निर्णय घेत अनेकजण चांगले संबंध बिघडवून टाकीत असतात. आपल्या माघारी जर ..नातेवाईक आपल्या नावाने महा-चर्चा "आयोजित करून पोस्टर छापत असतील तर ? आपण काय करू शकणार आहोत ?

तुम्ही कसे आहात " हे परस्पर ठरवून मोकळे होणारे नातेवाईक आजूबाजूला असतात "हे एकदा मान्य करून वागण्याचे जमले तर .. होणार्या मानसिक त्रासाचे तीव्र प्रमाण नक्कीच कमी होईल .
नातेवाईक असे का वागतात ? ..हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो ..याचे एक उत्तर असे आहे ..ते म्हणजे "
.तुमच्या सोयीप्रमाणे ते अजिबात वागलेले नाहीत हे तर मुख्य कारण आहेच आहे , आणखी एक कारण म्हणजे ..आपण सुद्धा त्यांच्या प्रमाणेच वागलो आहोत , नेमके हे जाणवल्यामुळे ..दोघांच्या एकमेकांच्या बद्दलच्या प्रतिक्रिया चांगल्या कशा असतील ?

व्याहारिक ज्ञान ,व्यावहारिक समज " या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप छान जमतात " या गैरसमजात रहाणारे आणि वागणारे ..समोरच्या मानसला हे डोस  आणि ढोस " ठासून देत असतात , असा मातब्बर नातेवाईक ..त्याच्या इतर नातेवाईक साठी नेहमीच आदरणीय असेल का ? तर याचे उत्तर कधी कधी ..हो , तर कधी कधी -अजिबातच नाही.." असे असेल .कारण हे सांगणे समोरच्या माणसाच्या त्यावेळच्या मानसिकतेवर अवलंबून असते..
मग असे नाते कसे सांभाळावे ?
प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे.. कारण स्वार्था पोटी नाते जरी टिकवणे असले तरी ..नाते हे विनाकारण तोडता येत नसते . या साठी मध्यम मार्ग अवलंबिता येतो ..तो म्हणजे नात्यात ..सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.
कारण पुष्कळदा ..अगदी .."मेतकुट "जमलेले एकजीव नाते ..मन फिरले , विचार फिरले की दुसर्या क्षणापासून आयुष्भाराचे वैरभाव मनात ठेवणारे नाते होऊन बसते.
"मित्र नातेवाईक असतात ..पण, सगळेच नातेवाईक हे कधीच मित्र होऊ शकत नाहीत .." म्हणूनच "नाते टिकेल ही ",पण नाते आणि नातेवाईक हे दोन्ही सांभाळून नेणे " ही एक मोठीच भावनिक कसरत असते .
ही अशी भावनिक कसरत आपण बहुतेक जन करीत असतो ..ज्यालाच पारिवारिक जीवन" म्हंटले जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख - नातेवाईक असे का वागतात  ? 
-अरुण वि. देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, March 13, 2018

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी लेख-२० वा - साहित्य - संमेलन - अनुभव नि आठवणी .

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी
लेख-२० वा 
साहित्य - संमेलन - अनुभव नि आठवणी .
 -अरुण वि.देशपांडे -पुणे.
--------------------------------------------------------
१९८६ साली परभणीला आल्यावर माझ्या लेखनाला योग्य दिशा मिळाली  . १९९२ या वर्षी . मराठवाडा साहित्य परिषद -परभणी शाखा ,नव्या कार्यकारणीने सुरु झाली. 
दि.१७,१८,१९ -एप्रिल - १९९२, १८-वे मराठवाडा साहित्य संमेलन - आखाडा बाळापुर ,येथे संपन्न झाले 
या संमेलनाचे अध्यक्ष्य होते- प्राचार्य प्र.ई.सोनकांबळे सर-औरंगाबाद
या संमेलनाचे उद्घाटक -  रसाळ वक्ते -लेखक- विचारवंत - आदरणीय  प्राचार्य -राम शेवाळकर सर ,
प्रमुख पाहुणे- कविवर्य -ना.धो.महानोर , विठ्ठल वाघ, फ.मु.शिंदे,
या साहित्य संमेलनात मी प्रथमच नामवंत साहित्यिक -लेखक-कवी -कलावंत मंडळींना जवळून
पाहिले, त्यांच्याशी  संवाद साधला.या भेटीमुळे साहित्य व लेखन प्रवास या बद्दल जाणून घेणे हा आपल्या लेखन-प्रवासाला खूप उपयोगाचे असते ..ही जाणीव खूप अनुभवसंपन्न करणारी ठरली.
या संमेलनातील  - कथा-कथन" या कार्यक्रमात माझा सहभाग  होता, अनेक
मान्यवरांच्या साक्षीने आणि हजारो रसिकांच्या समोर मी पहिल्यांदाच विनोदी कथा सादर केली.
नंतरच्या कवी-संमेलनात -  अनेक प्रथितयश कवींच्या रचना ऐकल्या.आणि  सह्त्यिक परिसंवादाच आस्वाद घेतला.
याच साहित्य स्मेलानात  "मनोरंजनपार असा एक कार्यक्रम झाला या निमित्ताने मला 
राम नगरकर  या थोर लोक-कलावंताचा सहवास लाभला . त्यांच्या  "रामनगरी "या कार्यक्रमाचा प्रयोग अफाट रंगला ,रसिकांचा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद कस असतो ? हे या निमित्ताने अनुभवले. या कार्यक्रमच सूत्र-संचालन मला करण्याचा योग आला . हा माझा पहिला साहित्य-संमेलन -सहभाग होता
नंतरच्या मसाप -परभणी शाखेत देविदास कुलकर्णी यांनी अनेक नव्या व उत्साही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन परभणी जिल्हा साहित्य सम्मेलन ,मराठवाडा साहित्य समेलन , अशा उपक्रमाचा धडका सुरु केला आणि माझ्या सारखे नवशिके या वातावरणातून अनुभव घेत साहित्य लेखन करीत गेलो. अशाच या उमेदीच्या ऐन भरात .आलेली एक वर्ष ते म्हणजे 
१९९५ -हे वर्ष.  माझ्या साहित्यिक-प्रवासाला एक सुयोग्य दिशा /वळण देणारे आहे. एक लेखक- कवी, बाल-सहित्यिक -कवी, आणि - साहित्य- चळवळीतील एक उत्साही कार्यकर्ता म्हणून मला ओळख  मिळाली होती
२०-२१ व २२ जानेवारी -१९९५ हे तीनही दिवस, आणि त्या आधीचे काही महिने, नंतरचे काही महिने 
-आणि आता २३ वर्षे होत आहेत , या आठवणी आणि ते अनुभव आज ही आमच्यामनात ,माझ्या जशाच्या तश्या आहेत.आहेत,जणू अगदी काल-परवाच हे घडून गेले आहे.
साहित्याची ही - , महापर्वणी -  म्हणजे, परभणी ला -संपन्न झालेले -६८-वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
कविवर्य -नारायण सुर्वे -या संमेलनाचे अध्यक्ष्य होते. नामवंत हिंदी कवी- अशोक वाजपेयी हे उद्घाटक होते
 सर्व माजी अध्यक्ष्य व्यासपीठावर हजर होते .इतक्या मोठ्या साहित्यिक व्याक्तीमात्वांना अगदी जवळून पाहण्याचा हा पहिला योग होता .
या संमेलनात "बाल मेळावा "कार्यक्रमाचे नियोजन -आयोजन -सूत्र-संचालन 'अशी बहुरूपी कामगिरी करण्याची 
स्वप्नवत जबाबदारी   पार पाडण्याची भाग्यकारक संधी मला मिळाली.
या निमित्ताने ३ दिवस मी -यदुनाथ थत्ते , दत्ता टोळ, कल्याण इनामदार ,मधु नाशिककर ,राजा मंगळवेढेकर ,सुधाकर प्रभू ,दत्ता ससे, यांच्या सहवासात होतो. 
 आणि मराठवाड्यातील नामवंत बाल-साहित्यिक लेखक आणि कवींचा या संमेलनात आणि बाल-मेळाव्यात सहभाग होता. या बाल मेळाव्याला पंधरा हजार बाल-रसिक हजार होते , सामेलानातील सर्वात यशस्वी
उपक्रम क्र-२ म्हणून या बाल-मेळावा" कार्यक्रमाची नोंद घेतली गेली ,माझी ही  कामगिरी अजून सर्वांच्या स्मरणात आहे. . या अनुभवातून खूप शिकायला मिळाले आहे.
रसिक हो- माझ्या साहित्यिक प्रवासातील "आणखी एक अविस्मरणीय असा सम्मेलन अनुभव आहे तो म्हणजे परभणीला २००५ साली झालेले १९ वे अखिल भारतीय मराठी बाल कुमार साहित्य संमेलन .लेखिका -लीला दीक्षित संमेलनाच्या अध्यक्ष्य होत्या.
परभणी-कार्यकर्त्यांनी या संमेलनाचे  खूप छान आयोजन केले होते..एक कार्यवाह म्हणून माझा सहभाग होता, तसे संमेलन स्मरणिकेचा एक संपादक म्हणून माझा मोठा लेखन सहभाग होता.
या संमेलनात माझ्या "माझा तिरंगा प्यारा " या बालकविता संग्रहाच प्रकाशन झाले. 
परभणी हे माझे गाव."साहित्य-संमेलन नगरी" म्हणून माझ्या गावाची ओळख कायम झालेली आहे.मला याचा अभिमान आहे.
.जिवलग स्नेही देविदास कुलकर्णी हे या सगळ्या साहित्य उपक्रमाचे आयोजक- असे कल्पक सूत्रधार आहेत.
दुनिया मे जर्मनी -और इंडिया मे परभणी" असे म्हणतात ते सार्थ आहे,
खरे तर हा इतका मोठा साहित्यिक अवकाश आमच्या सारख्या त्यावेळी नवोदित म्हणून धडपड करणाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्याचे श्रेय माझे साहित्यिक स्नेही .आणि आता बडोदा येथे संपन्न होत असलेल्या अ.भा.मराठी समेलनाचे अध्यक्ष - निवृत्त शासकीय अधिकारी आणि सुप्रसिद्ध लेखक-कादंबरीकार -लक्ष्मीकांत देशमुख यांचे आहे.
श्री.देशमुख साहेब १९९५ मध्ये परभणीला निवासी उप-जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते सम्मेलन परभणीला होणार हे पक्के झाले आणि या, "कामाची माणस अचूक हेरण्याचे - त्यांचे कौशल्य त्यांनी समेलन -नियोजनात अचूकपणे वापरले .परभणी सम्मेलन कार्यसमिती " म्हणजे "माणसे कशी जोडावी याची एक संपन्न कार्यशाळा देशमुख साहेब यांनी उदाहरणादाखल आम्हाला सक्सेसफुल करून दाखवली असे म्हणवेसे वाटते.
परभणीच्या त्यांच्या वास्तव्याने आमचे छान सूर जुळून आले ,मैत्री झाली ..गेली दोन दशके झालीत आमच्या मैत्रीला ,आता पुण्यातील वास्तव्यात आम्ही नित्य नेमाने संपर्कात असतो.
 अ.भा.मराठी साहित्य समेलन - परभणी - चे देशमुख सर कार्याध्यक्ष होते .आणि आता बडोदा साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष आहेत.. या प्रवासाचा एक मित्र म्हणून  मला आणि सर्वच मित्रांना सानंद अभिमान आहे. श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांना खूप खूप शुभेच्छा.
हे अनुभव आणि या आठवणी म्हणजे माझ्या साहित्य-प्रवासातील प्रेरक शिदोरी आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साहित्य चपराक मासिक 
साहित्य समेलन विशेषांकात प्रकाशित लेख.
आभार - मा.  संपादक .साहित्य चपराक मासिक -पुणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साहित्य संमेलन - अनुभव नि आठवणी .
 -अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, March 8, 2018

जागतिक महिला दिन - शुभेच्छा, कविता - स्त्री

जागतिक महिला दिन - शुभेच्छा
कविता - स्त्री
------------------
शक्तीरूप स्त्रीचे
भक्तिरूप स्त्रीचे
त्यागी रूप तिचे
वंदनीय...।।
उमेद अंतरी
निर्धार भरारी
निश्चय करारी
अंतरात....।।
छोटीशी बाहुली
मोठीशी सावली
कर्तुत्वे भावली
जगतास....।।
दिवस विशेष
हवाच कशाला
मान सन्मान तो
करू सदा....।।
-------------------------
कविता - स्त्री
-अरुण वि. देशपांडे
-------------------------------