Saturday, September 23, 2017

लेख- बोलावे कुठे -कसे -किती ? ले- अरुण वि.देशपांडे





लेखमाला - हितगुज -
लेख-क्र.१० 
बोलावे- कुठे - कसे-किती  ?
----------------------------------------------------------
आपल्या दिवसभराच्या वेळापत्रकानुसार आपण कधी एखाद्या ठिकाणी आपण जाऊन येतो , कुणाच्या घरी  , एखाद्या कार्यक्रमाला जात असतो , आपल्या सोशल -लाईफ मध्ये तर नेहमीच विविध ठिकाणी आपण हजर रहात असतो .
प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी अनेक व्यक्तींशी आपण बोलत असतो ..अशावेळी परस्पर सवांद होत असतांना ..त्या त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या -आणि त्यानुसार त्याच्या वागण्याचा आपल्या मनावर थेट मोठा परिणाम होत असतो.  अशा ठिकाणी व्यक्ती--रूपाचे इतके विविध रंगी -विवध ढंगी नमुने एकत्र आलेले असतात की.या सगळ्यांना भेटून .नंतर आपल्या .मनात .मैत्रीभाव ,आदर, सन्मान ,या सोबतच काहीजणांच्या बद्दल मात्र  तिरस्कार , कंटाळा ,वैताग ,अशा अनेक भावना एकाचवेळी निर्माण होतात ..

काहीवेळा एखाद्या ठिकाणी जाऊन येतो ,समारंभ होऊन जातो ,तिथे मत प्रदर्शन करणे बरे नसते या विचाराने गप्प राहून घरी आल्यावर मात्र  आपण स्वतःशीच म्हणून मोकळे होतो - बाप रे -या ठिकाणी गेलो नसतो तर फार बरं झाला असतं ,"
मजा येण्ने तर दूरच , एका पेक्श एक नग भेटले .त्यांना भेटून आणि यांचे  "एकमेकांचे बोलणे .ऐकूनच डोके फिरून गेलयं राव , वैताग...नुसता ...!
मित्रांनो असे होणे हा माझाच नव्हे तर .तुमचाही असाच अनुभव असू शकतो ताची कल्पना आहे.याचे कारण एकच आणि ते म्हणजे - माणसांचा -स्वभाव ".

काही माणसे स्वतःच्याच प्रेमात पडलेली असतात ..मी यंव .आहे..मी त्यंव आहे..."हे कौतुक-गाणे -रेकार्ड " लावून देतात के बस रे बस , " किती बोलावे ? याचे भान विसरून गेलेली अशी माणसे .समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देत नाहीत ,स्वताच्या असलेल्या आणि नसलेल्या  मोठेपणाची ( ? ), टिमकी वाजवत रहाणे हेच त्यांचे काम असते , शेकडो वेळा आपण या गोष्टी लोकांना सांगितल्या  आहेत ",हे विसरून अशी माणसे ..आपल्या समोरच्या माणसाची संयमाची परीक्षा पहात असतात . 
काहीजणाना आपण कुणाशी बोलत आहोत याचे भान नसते.आणि ते जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते .."अज्ञानातही  -प्रचंड आत्मविस्वास बाळगून तारे तोडणार्या माणसांना पाहिले की मला त्यांचे कौतुक करवावे वाटते , आपण कोण आहोत ,आपल्या मर्यादांची जाणीव न ठेवता ..एखाद्या विद्वान व्यक्तीला सुद्धा गप्पगार करण्याची यांची क्षमता "पाहून भलेभले चकित होऊन जातात ,आणि कुणीतरी मध्ये हस्तक्षेप करून .या बोलक्या -बाहुल्याच्या तावडीतून  खरोखरच्या ज्ञानी व्यक्तीची सुटका करतो " हे पाहून विचार येतो .बोलणे " म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा घटक आहे.त्याला अजिबात महत्व न देणारी माणसेच माणसे भवताली वावरतांना दिसून येतात.

काही ठिकाणी तर ..- स्वतःच्या वागण्याने .अस्तितवाने .स्वताचे हास्यास्पद -असे फिरते प्रदर्शन घडवणारी माणसे भेटतात ,त्यांचे रहाणे ,त्यामुळे त्यांचे दिसणे ..काहींचे  त्यांच्या वयास न शोभणारे वागणे -वावरणे " हे सगळा पाहून..बघणार्याने लाजावे अशी परिस्थिती असते ...कुठे -किती -कसे ? हे तीनही प्रश्न अशा माणसांना पडत नसतील का कधी ?..माझ्या मते तर.असे कळत असते पण ते काही केल्या वळत नसते .कारण एकच ..मी -आणि मीच " याचा अतिरेक ..सगळ्या ठिकाणी असतो. लोकांच्या चर्चेचा विषय ..मग.त्यासाठी "काहीपण करण्याची अशा माणसांची तयारी असते..म्हणून..आपल्या बोलण्याला .कुणी हसेल का ? हा पोरकटपणा पाहून लोक मनातल्या मनात चिडत असतील ..हे माहिती असून सुद्धा अशी माणसे बिलकुल बदलत नाहीत ..

लहान -थोर, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणी ..वयोगट कोणताही असो ..लोकांच्या आपल्याकडे बघण्याची एक नजर असते , आपण कसे असुत, कसे बागतो..बोलतो याबद्दल त्यांच्या निश्चित अशी अपेक्षा  असते ..नेमक्या या परीक्षेत आपण नापास होणे .ही खचितच शोभणारी गोष्ट नाही.

ज्या व्यक्तीच्या बोलण्यात सौम्यपणा ,आदर व्यक्त होणारी भाषा , नम्रपणा ,समवयस्कांशी बोलतांना अपेक्षित असणारा समंजसपणा , मृदू आणि कठोर नसणारे शब्द..लहानांशी लहानहोऊन खेळकरपणे वागणारा -बोलणारा  ..मोठ्यांशी तितक्याच आदबशीरपणे ..त्यांचे ऐकून घेत मोजक्याच शब्दात बोलणारा " असे वागणारे नक्कीच आहेत ,अशा व्यक्तींच्या सहवासात रहाणे ..त्यांना अनुभवणे..हे एका अर्थाने एक खरे संस्कार-शिबीर "असेल. आपण मन:पूर्वक ते अनुभवले तर.. कुठे -कसे- आणि किती बोलावे" याचे शिक्षण नक्कीच घेता येईल..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- बोलावे- कुठे -कसे-किती ?
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(साप्ता.पथदर्शनी अंक दि.२२ जुलै -२०१७ अंकात प्रकाशित लेख )
(.-सौ.उज्वला शेट्ये ,संपादक यांचे आभार )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, September 11, 2017

कविता-- नयन

स्टोरी मिरर आयोजित कविता /गझल स्पर्धा
माझी प्रथम पुरस्कार प्राप्त कविता
------------------------------------------------------
नयन
-अरुण वि .देशपांडे
-------------------------------------
नयनात तुझिया सखे
 मी मजला पहातो
चिमुकले जग तुझे माझे
त्यात दिसता जीव हा सुखावतो  ।।

लढाईत या जगण्याच्या
सावलीसोबत तुझी असते
बळ येते लढण्यास मला जेंव्हा
नयनातून बोलक्या तुझ्या धीर देते  ।।

शांत तृप्त नयन तुझे
मज अथांग डोहासम भासती
व्यथा वेदनांचा मज विसर पडे
तुझी सुखद नजर मजवरी पडे     ।।

व्यक्त होण्यास कधी कधी
शब्द बोलके -ते ही तोकडे पडते
सस्मित नयनांनी तू मज बोलता
ओझे मनावरचे हलके हलके होते ।।

एक स्वप्न माझ्या मनीचे सखे
कुशीत असता मी तुझ्या पूर्ण व्हावे
नयनांशी  हितगुज करता करता
भावविश्व सारे भरुनी हे यावे         ।।
----------------------------------------------------------
कविता - नयन
-अरुण वि .देशपांडे.