Tuesday, February 9, 2016

कविता - हे किती खास आहे ...!

कविता - हे  किती खास आहे …!
-अरुण वि .देशपांडे
-----------------------------------------------
पुढे पुढे करण्याचा सोस आहे
काही न करता  सारे जमावे
नेहमीच असा जोश  आहे
हे किती खास आहे  ।।

खुशमस्करे  घोंगावती जिथे
मिसळूनी बेमालूम त्यात जावे
न जाणवावे कुणा कधी
हे किती खास आहे ।।

तत्वाशी बांधिलकी  असावी "?
 खुळेपणाचे  लक्षण की आहे
काही न करता सारे ओंरपावे
हे किती खास आहे  ।।

मेहनत , कष्ट ,पराकाष्ठा
करण्यास कुणा हो वेळ आहे
जमवता येतो मेळ  सारा
हे किती खास आहे   ।।

कसे असावे , कसे करावे ?
हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे
पुसण्यास कुणी नसे रिकामा
हे किती खास आहे  ।।
-----------------------------------------------------
कविता - हे किती  खास आहे ।!
-अरुण वि. देशपांडे -पुणे
--------------------------------------------------------

Saturday, February 6, 2016

कविता - ते पुन्हा आठवले ..!

कविता - ते पुन्हा आठवले ...!
-अरुण वि.देशपांडे .
------------------------------------------------------
कोरड्या ठप्प नदीच्या काठी बसता 
खेळकर रूप तिचे  ते आठवले  ||

हीच नदी  हाच  तिचा तो किनारा 
पाण्यातले पाय , स्पर्श ते आठवले ||

वाळूत नावांची ती नक्षीदार कोरणी 
तुझे स्मित चांदणे तेही आठवले  || 

कविता मन चिंब चिंब करणार्या 
भारलेले शब्द ते पुन्हा आठवले  || 

जादूचे क्षणते - दिवसही तसेच ते 
मोरपीस  मन तळातले  ,ते आठवले  ||

आयुष्य झाले आजचे कोरडे जगणे 
अजुनी आठवणी ओल्या ,हे आठवले   ||
--------------------------------------------------------------------------
कविता - ते पुन्हा आठवले ...!
-अरुण वि.देशपांडे .-पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------

Thursday, February 4, 2016

प्रतिलिपी डोट कॉम वर प्रकाशित नवी विनोदी कथा - जोडी झिंदाबाद

रसिक मित्र हो
प्रतिलिपी डॉट  कॉम वर प्रकाशित माझी नवी विनोदी कथा "जोडी झिंदाबाद "
वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करावी .व अभिप्राय द्यावेत.
१. http://www.pratilipi.com/arun-v-deshpande/jodi-zidabaad

विनोदी कथा - गजाभाऊचा नाराजीनामा

कथा -
गजाभाउंचा  नाराजी-नामा "
ले- अरुण वि.देशपांडे
-----------------------------------------------------------
माझे परम मित्र - गजाभाऊ नुकतेच सेवानिवृत्त झाले .मोकळा वेळ हाताशी असल्यामुळे " आता मी काय काय करू गड्या ? " अशा गोंधळात ते सापडले आहेत . वास्तविक गोष्ट अशी आहे की - हे महोदय  यापुढे आता दिवसभर  घरातच असणार आहेत " या कल्पनेने  मिसेस -गजाभाऊ  आणि कुटुंबीय हबकून गेले आहेत.

वाहिनी मला म्हणाल्या सुद्धा - भाऊसाहेब - आता तुमचे मित्र रिटायर्ड झालेत , पण, घरात त्यांनी सोडलेल्या आर्डरी  ऐकून आम्ही टायर्ड होणार " याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का हो ?
वाहिनीचा प्रश्न अगदी रास्त असाच होता - कारण माझा समावेश गजाभाऊच्या  "निकटच्या सूत्रात " असायचा . त्यामुळे "गजाभाऊ ही असामी कशी आणि किती बिकट आहे" महे माझ्या इतके कुणालाच माहिती असणे शक्य नव्हते

त्यामुळे "निकटच्या सूत्रातील माणसाने नाटकीय ढंगात  माहिती दिली पाहिजे " एवढी माफक माहिती मला होती.
वाहिनीना धीर देत मी म्हणालो - काळजी करू नका वाहिनी, गजाभाऊ घरात लुडबुड करतात  हे खरे आहे , आता यापुढे तुम्हाला त्यांच्या नको इतक्या बारीक नजरेचा " त्रास होणार आहे. तेव्न्हा यापुढे तुम्हीच तुमचा एक्शन-प्लान" बदलणे गरजेचा आहे.
त्यासाठी गजाभाऊ च्या नकळत  आपण इतर सगळ्यांच्या सहभागाचे "चिंतन -शिबीर " आयोजित करू या .गजाभाऊ ला आपल्या पेक्षा नवी जनरेशन  जास्त चांगल्या प्रकारे मेनेज करू शकेल असे मला वाटते आहे.
माझे ऐकून घेत वाहिनी मला म्हणाल्या - भाऊसाहेब , गजाभाऊ काय "चीज " आहे, ही तुमच्या पेक्षा जास्त मला माहिती आहे. तुम्ही असाल त्यांचे "जानी दोस्त ", मी प्रत्याक्ष्य  त्यांची बायको आहे ."मला जास्त कळत ? की तुम्हाला ?
मी मनापासून म्हणालो - अर्थातच तुम्हाला जास्त माहिती आहे वाहिनी.
 वाहिनी आपले बोलणे  चालूच ठेवीत म्हणाल्या - आमचे हे ", आत्तापर्यंत आफिसात गुण्यागोविंदाने नांदत होते , घरापेक्षा इथे त्यांना जास्त आनंद मिळत असे. " या पुढे माझीच कठीण-परीक्षा आही. घरात आमच्या सोबत हे कसे नांदतात ? कल्पनेनेच नुसता घोर लागलाय बाई माझ्या जीवाला ."

वहिनींना धीर देणे आवश्यक आहे हे जाणवून मी म्हणलो-
वाहिनी - अहो , हे घरगुती राज्य तुमचेच आहे . बिनपगारी असलात तरी -फुल अधिकारी तुम्हीच आहात घरतल्या.
तुम्ही मन भक्कम करा तुमचे .
माझे बोलणे मध्येच थांबवीत  वाहिनी म्हणाल्या -
भाऊसाहेब -  का उगीच फिरकी  घेताय ?, आमच्या मनाचे काही करण्याची हिम्मत आहे का आमच्यात ?,
तुमच्या दोस्ताचे लक्ष आफिसात जितके जास्त होते , त्यापेक्षा दुप्पट लक्ष घरात असे . त्यांचे मन घरातच  भिरीभिरी फिरते आहे असे भास आम्हाला होतात .
आम्हाला शिस्त लावण्याचे त्यांचे प्रयत्न " तुम्हाला माहितीच आहे, नवे काय सांगावे तुम्हाला .
त्यांच्या सोबत कायम असणारे तुम्ही - आठवा जरा - गजाभाऊनी  आफिसातला  फोन - तिथल्या कामा पेक्षा , घरी आमच्या चवकशी साठी जास्त वापरलाय , खर की नाही ?

वहिनींची फायरिंग अचूक होती -  एरव्ही आमच्या या वाहिनी "मित-भाषी  आहेत .फारसे न बोलणाऱ्या "वाहिनी  "आणि नको तितके बोलणारे गजाभाऊ ..!", हे मी पाहिलेले नेहमीचे दृश्य ,
 पण,आज वाहिनीचा हा  आवेश पाहून " त्यांच्याकडे ऐनवेळी टाकण्या साठी "बॉम्ब-गोळे " आहेत ,याची झलक पाहून मला तर बेस्ट वाटले. मी म्हणालो-

अरे वा - वाहिनी - तुमची तर जय्यत तयारी आहे "पलटवार करण्याची ",गजाभाऊचे काही खरे नाही आता.
वहिनींच्या चेहेर्यावर छानसे स्मित उमटले  .

वहिनीसाहेब - मानलं बुवा तुम्हाला . गजाभाऊचा बंदोबस्त -करण्याच्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य असेल . यासाठी माझी एक अट आहे - गरीबाची रसद तोडू नका .
वाहिनी लगेच समजल्या - काळजी करू नका भाऊसाहेब . घ्या गरमागरम चकल्या - आत्ताच करून ठेवल्यात .गजाभाऊ आणि तुम्हाला आवडतात , म्हणून आठवणीने केल्यात .
क्या बात है वाहिनी- तुमच्या प्रेमळ स्वभावास खरेच तोड नाही, चकल्या बेस्टच झाल्या आहेत" हे सांगण्यास विसरलो नाही.

 अहो वाहिनी -इतका वेळ झालाय मला येऊन- आणि गजाभाऊ आहेत कुठे ? माझ्या प्रश्नाचा खुलासा करण्यासाठी वाहिनी म्हणाल्या -
अहो, सकाळी उठल्यावर ते  मला म्हणाले - जरा गावाकडे जाऊन येतोय , संध्याकाळ पर्यंत येईल वापस . तोपर्यंत
काही करून ठेवा छानसं खमंग काहीतरी..आमची गिरणी " चालू राहायला पाहिजे . कळाले ना ?"
" आमच्या ह्यांच्या बोलण्याच्या टोन मध्ये "विनंती" चा स्वर नसतो ,असते फक्त ऑर्डर , जी आम्ही पाळायची .

वाहिनीच्या बोलण्यात काही चूक नव्हते . गजाभाऊ आज गावाकडे गेले , तिथे गेल्यावर .वावटळ "आल्या सारखेच वाटत असेल सर्वांना , नुसता धुराळा उडवत असतील गजाभाऊ आपल्या बोलण्याने ."गजाभाऊ कधी कुणावर खुश झाले आहेत ", असे कधीच होत नसे. करणार्याने किती जीव तोडून काम केले तरी. त्या कामात गजाभाऊ काही तरी चुका काढणारच ." यामुळे समोरचा म्हणयचा - "शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो...!"

आफिसात "साहेब असणारी व्यक्ती  -आपल्या साठी महत्वाची असणे सहाजिकच आहे. "साहेबास खुश ठेवण्यासाठी अंगात उपजत कौशल्य" असणारी माणसं आपल्या भवताली असतात. आमच्या आफिसात याच्या बरोब्बर  उलटे  चित्र होते. "गजाभाऊ नाराज होऊ नये म्हणून  आमचे "बिचारे साहेब ".अथक परिश्रम घेत असत.
कारण एकच - सर्वांच्या पगाराची कामं ", मंथली रिपोर्ट्स , मोठ्या कस्टमर-लोकांची मर्जी सांभाळायची ", अशा अनेक कठीण आणि कसरतीचे कामात  गजाभाऊ एकदम तरबेज -.सराईत  आणि सफाईदार "श्रेणीतले कुशल कारागीर- कर्मचारी --म्हणून लौकिकास प्राप्त झालेले .यामुळे गजाभाऊ कायम डिमांड मध्ये असणारी असामी होती .
 मंथ -एंड ला " गजाभाऊ आफिसात असणे म्हणजे -साहेबांचे बीपी नॉर्मल राहण्याची ग्यारंटी समजावी. गजाभाऊच्या तोंडून -र- रजेचा " शब्द आला तरी  साहेबांना हूड-हुडी भरायची . याचा फायदा गजाभाऊ चलाखीने घेत असत . एकूणच काय तर- "साहेबाचा जीव गजाभाऊत आणि गजाभाऊ दुसऱ्या कशात ..!
त्यामुळे - एखाद्याचा राजीनामा परवडला , पण- गजाभाऊचा "नाराजी -नामा "? नो वे ..!

डायरेक्ट साहेबच खिशात म्हटल्यावर - गजाभाऊ जरा शेफारून  गेले होते .मोठ्या नंबरच्या चष्म्यातून -बारीक-बारीक चुका शोधणारी त्यांची नजर .आणि  सोबतीला "फटाकडी -जीभ" ,या दोन अस्त्रा मुळे अनेक रथी-महारथी ", धारातीर्थी पडायचे .एकूण जबरदस्त असा "भीतीयुक्त -आदर "असणारे गजाभाऊ आफिसात मोठ्या आनंदाने दिवस घालवत असत.
इकडे घरातली माणसं  मात्र कायम टेन्शन मध्ये असायची ..स्वयंपाक काय करायचा ?, काय केले तर गजाभाऊ नावं न ठेवता खातील ? घरातील वावर सुद्धा गजाभाऊच्या  समोर मोकळेपणाने न होता "भेदरलेल्या चेहेर्याने होत असायचा ". त्यांच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत " ,हे असे वागणे चुकीचे असते ", असे विचार गजाभाऊच्या मनात कधीही येत नसत .

गजाभाऊच्या स्वतहा बद्दलच्या अफाट गैरसमजुती होत्या आणि त्या ठाम स्वरूपाच्या होत्या ", त्यामुळे  हे गैरसमज कधी दूर होण्याशी अंधुकशी  सुद्धा शंका नव्हती .
"या गैरसमजामुळे - पृथ्वी -तलावर आपला अवतार हा "बे-शिस्त लोकांना सुधारण्यासाठीच झालेला आहे ", यावरती गजाभाऊची श्रद्धा होती ",त्यामुळे "कोणाला काही वाटो-कामात जो टंगळमंगळ करेल -त्याला मी सुधारल्या शिवाय रहाणार नाही " असे म्हणत ते ज्याला -त्याला  म्हणायचे - ओ -,समजले का ? चला कामाला लागा..

हे वाक्य बोलतांना गजाभाऊची मान नेहमी वर असायची , आणि समोरचा माणूस त्यांची  दटावणी  खालच्या मानेने एकून घेत असायचा . मी तर त्यांचा जवळचा दोस्त. पण, यातून माझी देखील सुटका नसे. सर्वांच्या देखत मुकाटपणे त्यांच्या नाराजीचे फटके "मला सहन करावे लागतात . माझे दुर्दैव आणि गजाभाऊचे सुदैव " या दोन गोष्टीवर असूनही  आमची  महा -युती अभंग राहिलेली आहे .

माझ्या अंगात एक खोडी आहे - मला केव्न्हाही , कुठेही गाढ झोप लागण्याचे जणू वरदान प्राप्त आहे.कधी भरपेट भोजन झाल्यामुळे तर कधी उपवासाच्या ग्लानिमुळे  डोळे मिटल्या सारखे होते ,पण, ती असते गाढ झोपच .
आणि गजाभाऊ कायम निद्रानाश" झालेले पेशंट . चोवीसतास चालू असणाऱ्या  ए टीएम -मशीन सारखे गजाभाऊ नेहमी टक्क जागे आहेत असे वाटायचे .. असा अवस्थेच्या गजाभाऊच्या डोळ्यात माझी लाडकी झोप ", खुपत असायची. डाफरत म्हणायचे - "ओ -भाऊसाहेब , काय हे सदा न कदा डोळे गप्प मिटून काय पडून असता हो तुम्ही ? जरा जागे रहात जा..उठा बरं .जागते राहो ...! जरा स्वतःची काळजी करणे कमी करून -भवतालच्या जगाची काळजी कधी करणार तुम्ही ? कठीणच आहे तुमचं भाऊसाहेब .

शांतपणे मी म्हणायचो - काळजी आणि जगाची ? " नको रे बाबा , कुणी सांगितलाय   सुखातला  जीव -संकटात  का टाकायचा  ? ". अशावेळी एक तुच्छतेचा कटाक्ष माझ्याकडे फेकत गजाभाऊ दुसर्या कुणाला तरी सुधारण्याच्या कामात लक्ष द्यायला निघून जात .

अनेकदा मी अशा जागी बसायचो की - गजाभाऊच्या  रडारच्या रेंज मध्य येत नसायचो ,मग, अशा वेळेत माझी एक नैप ( आफिसातली मान्यता प्राप्त डुलकी -प्रकार ) झकास होऊन जायची.

आता स्पष्ट  शब्दात  सांगायचं म्हणजे -
आमचे गजाभाऊ निर्मल मनाचे आहेत . स्वच्छ आणि निर्मल आचार -विचार , कुणाचे भले व्हावे हा निर्मल हेतू ",
हे  मला माहिती असून काय उपयोग ? समोरच्याला काय कल्पना असणार हो ? यापेक्षा गंभीर बाब म्हणजे - माणसाला  आपण चांगलेच आहोत ", याचा अहंकार वाटायला लागतो , तो दिवसे-दिवस वाढायला लागतो .तेव्न्हा याचे परिणाम चांगले होण्या ऐवजी वाईट होऊ लागतात .
"
गजाभाऊच्या बाबतीत नेमके हेच होऊन बसलेले .पण समजून घेतील ते गजाभाऊ कसले ?
इतके दिवस म्हणा -वर्ष म्हणा -निभावल, योग्य वेळी गजाभाऊ रिटायर झाले .याचे त्यांना जितके वाईट वाटत होते , त्याचा दुप्पट आनंद आफिसातल्या लोकांना झाला आहे " स्वतहा गजाभाऊला याची जाणीव होत होती .
"उद्या पासून गजाभाऊचा "सुधरा रे जरा, काम करा रे ..१ असा दणका नसणार .त्यामुळी पब्लिक खुश आणि साहेब मात्र लहानसा चेहेरा करून बसले होते . महिना अखेर " कशी व्हावी ?ही चिंता त्यांची बीपी वाढवत होती.

आता येणार्या दिवसात गजाभाऊचा मुकाबला खुद्द घरातली पाब्लीक्षी होणार होता. ऊठ-सुठ  हाड हूड शब्दात कमेंट  करण्याची त्यांची आफिसातली सवय घरातील लोकांना नकोशी वाटू लागली.
वाहिनीची अवस्था फार कोंडीत  सापडल्या सारखी झाली होती. वहिनींच्या माहेरच्या लोकांपेक्षा -त्यांच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या आहेरांनी वाहिनी हैराण होऊन गेल्या होत्या. "सुनबाई - हा गजाभाऊ आफिसात होता तेच दिवस तुझ्यासाठी बरे होते म्हणायचे ..!, ह्यो बुवा आता घरातच असणार म्हणजे ..कठीणच ग बाई.- याला सांभाळणे .
तूच सुधार आता स्वतहाला ,तरच काही निभाव लागेल तुझा .नाही तर काही खर नाही तुझं.

अशा कठीण परिस्थितीतून  मार्ग काढण्या साठी वाहिनिसाहेबांनी  "अर्जंट बोलायचे आहे, येऊन जावे ", असा सांगावा धाडला .संध्याकाळच्या आत आमची मिटिंग होणे गरजेचे होते. एकदा का संध्याकाळी गजाभाऊ गावाकडून परतले की काही होणार नाही. मधला हा टाईम-वाहिनीसाठी  बहुमोल असाच होता.

पाण्याचा ग्लास माझ्या समोर ठेवीत -वहिनीनी स्वागत करीत म्हटले. "भाऊसाहेब - आम्ही कितीही मनापासून केलं तरी आमचा  माणूस नाखूष  असतो, नाराजीने बोलणार " हे आम्ही का सहन करावं ? सांगा बर तुम्हीच .
हे ऐकून मी पण विचारात पडलो- "मामला सिरीयस झालेला होता. मी म्हणालो - हे बघा , आता काही केल तरी आपले गजाभाऊ त्यांचा पक्ष सोडणार नाहीत . मग, घाबरता काय एव्हढ ?
होऊ द्या नाराज , तुम्ही त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करण्याचे सुरु ठेवा ..बसु द्या बोंबलत ..!
माझ्या सांगण्यावर वहिनींचा विस्वास बसत नव्हता - काय हे भाऊसाहेब ?, काही ही  हां हे ..!

अहो वाहिनी खरे तेच सांगतोय ..मी माझा सल्ला देणे चालू ठेवीत म्हणालो - हे पहा वाहिनी - या पुढे तुम्ही सुद्धा  ऊठ-सुठ नाराज होऊन बसायचे शिका .समजणार नाही अशा भाषेत ती व्यक्त करा ,तोडीस -बिनतोड जवाब द्या .
तुमचे वागणे -बोलणे पाहून "तुम्ही सुटकेस भरून माहेरी जाण्याच्या तयारीत आहात " असे गजाभाऊला सतत वाटले पाहिजे . "नाराजी -नामा " खिशात ठेवणाऱ्या गजाभाऊ ला  तुमच्या मनातली नाराजी कळू द्या .
तुमचे आणि घरातल्या माणसांचे महत्व , त्यांच्या कष्टांचे महत्व गजाभाऊला समजलेच पाहिजे.
इतकी वर्ष तुम्ही त्यांची नाराजी सहन केलीच ना, आता पाळी गजाभाऊची आहे.

अहो भाऊसाहेब -माझ्या वागण्याने असे काही होईल , हे खरे वाटतय तुम्हाला ?
वाहिनी - डेअरिंग की बात है. ते कराच, शिवाय "बायको म्हणून तुम्ही तुमची सगळी शस्त्र आता बिंधास वापरा.
नाराजी असणारे आमचे गजाभाऊ .तुमच्या हर एक सांगण्याला राजी होणार .
वाहिनीच्या चेहेर्यावर छानस स्मित उमटलेले पाहून , त्यांच्या उद्याच्या जीवनातले सुखाचे दिवस मला दिसत होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा -
गजाभाउंचा  नाराजी-नामा "
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------