Thursday, August 24, 2017

लेख ८ वा- हितगुज - ख्याली-खुशाली - अरुण वि.देशपांडे

Friday, August 11, 2017

लेखमाला - हितगुज "-लेख क्र-७ - वेळ कसा घालवायचा ?

लेखमाला - 
हितगुज "-
लेख- वेळ कसा घालवायचा ?
-----------------------------------------------------------

हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडत असतो . जे लोक इतर वेळी आपापल्या कामात असतात , त्यांना काम संपवल्यावर जो रिकामा वेळ असतो ..तो थोडा असो व खूप ..अशावेळी त्यांना एकच चिंता असते - "बापरे ,आता हा वेळ मी कसा घालवू ? 
आणि जे लोक रिकामेच असतात ,त्यांना वेळच वेळ असल्यामुळे ."वेळ कसा घालवू ? हा प्रश्न त्यांना कायमच पडलेला असतो. निवृत्त झालेली माणसे, आणि वृध्द  आणि  "जेष्ठ-नागरिक " यातील सगळ्यांनीच काही -स्वतहाला   कोणत्या न नकोणत्या कामात गुंतवून घेतलेले असते  असे नसते , या वयोगटात सुद्धा अनेकजण असे असतात की ..त्यांना "उगवलेल्या दिवसभरात ..कस वेळ काढायचा ? हा प्रश्न पडलेला असतो.

या "वेळेचे काय करायचे किंवा "मी वेळ कसा घालवू ?" 
मित्रांनो - हा प्रश्न आपल्याला व्यक्तिगत  रूपाने सोडवत येतो ,तसाच तो सामुहिक रूपाने सुद्धा सोडवता येऊ शकतो 
आता हेच पहा .. नेहमी कामात व्यस्त  असलेल्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावे की - कामाच्या तणावाने आपले मन थकून  गेलेले असते, आणि आपले शरीरही  तितकेच थकून गेलेले असते.. .पण, या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला सवयच नाहीये ,आणि अशा "विश्रांतीचे काय महत्व आहे ? हे सुद्धा  जाणून घेण्याची त्यायारी कधी दाखवत नसतो.

त्यामुळे ..आठवड्याची सुट्टी .मग ती रविवारी असेल, किंवा कार्यालयाच्या नियमाप्रमाणे एखाद्या दुसऱ्या एखाद्या दिवशी असेल , या ऑफ -डे " च्या दिवशी..नेहमीच्या रुटीन कामाला बाजूला सारून .खूप दिवसा पासून न केलेले एखादे आवडते काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यास आरंभ केला तर " बघा ..तुम्हालाच नंतर जाणवते ..अरेच्च्या - हे काम करतांना मला तर वेळेचे भानच उरले नाही की..या वेळेत काम पूर्ण झाल्याच आनंद तर अधिकच ,मग .कंटाळा आणणारा वेळ अशा सत्कार्यात घालवला तर "वेळ सारथी लावल्याचे समाधान नक्कीच मिळवता येते.

वेळ छान केंव्हा  जातो ? 
या प्रश्नाचे उत्तर आहे ..कामाच्या माणसांचा वेळ कामातच छान जातो आणि ..आळशी माणसांचा वेळ अर्थातच "आळसात-आरामत जात असतो ". पण, मित्रांनो .या दोन्ही प्रकारच्या "वेळ घालवण्यात खूप मोठा फरक आहे , जो नेहमी कार्यरत असतो ,त्यला सारे जग विचारीत असते , आणि जो फक्त आळसात .म्हणजेच "निष्क्रिय -राहून वेळ वाया घालवतो त्याला लोकांच्या दृष्टीने  काही किंमत नसते ..

यावरून एक अनुमान  काढू शकतो की - विधायक कार्य करण्यात वेळ घालवणे -हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात भर टाकणारा गुण आहे ", आणि म्हणून " निष्क्रिय- माणूस " म्हणजेच वेळ वाया घालवणारा माणूस , त्यापासून दूर राहणे बरे ", असे लोक ठरवतात..

प्रत्येक वयोगटातील स्त्री--पुरुषांनी , तरुण -तरुणींनी , मुला-मुलींनी " नेहमीच "वेळेचे नियोजन"करण्यास शिकले पाहिजे ..म्हणजे .जुन्या जमान्यातील सुत्राप्रमाणे ." काळ-काम "यांचे गणित सोडवतांना .लागणाऱ्या वेळेचा योग्यतम उपयोग करता येणे शक्य असते.

आपल्या हाती असलेल्या वेळेत आपण काय करावे याला ही खूप महत्व आहे" त्यामुळेच "आपण वेळेचा सदुपयोग करतोय की वेळेचा अपव्यय करतोय " याचे भान असायला हवे आहे..
योग्य पद्धतीने -नियोजनपूर्वक- आणि दिलेल्या वेळेनुसार कार्यपूर्ती "या परीक्षेत पास होणारी व्यक्ती ..कधी अपयशी झालेली आहे " असे दिसून येणार नाही , सहाजिकच ..फावल्या वेळेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात .अशा वेळी त्यांना कुणी..म्हणणार नाही की- हा फुकटचा वेळ वायाघालवतो आहे "
,
विद्यार्थ्यांनी .अगोदर अभ्यासाचा वेळ, मग, खेळायचा वेळ ..हे दोन नियम पाळले तर .त्यांना बोलणी खाण्याची वेळच येणार नाही.. पण बहुतेक वेळा उलटे होते .कारण अशी मुलं - अभ्यासाच्या वेळेतच - काही न करता बसून राहतात ..,खेळायची वेळ झाली कि मात्र ...वेळ कसा घालवू ? हा प्रश्न नाही पडत.

आपल्या सर्वांचा खुपसा  वेळ "करमणूक "या नावाखाली आपण घालवतो . "मन रमवणे -या साठी आपण .नेहमीच 
टीव्ही  आणि त्यावरच्या मालिका आणि इतर कार्यक्रमा पहाण्यात खूप वेळ  घालवतो , आता तर इंटरनेटवर- फेसबुक आणि  मोबाईल वरचे गप्पा -ग्रुप ", आणि "फ्रेंड बरोबरच्या गप्पा " यात किती वेळ घालवला जातोय  जातोय " हा प्रश्न आता सामाजिक चिंतनाचा विषय बनून राहिलेला आहे.
यात वेळ घालवणारे .याचे समर्थन तितककेच जोरदार करतात , दुसरी बाजू अशी पण आहे की " या सर्व 'गोष्टीत "वेळ वाया घालवला जातोय " असे मत व्यक्त करणारे काही कमी नाहीत 

आजकाल ...असी परिस्थती दिसते आहे की ..घरात माणसे नाहीत .जी आहेत ती .कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात .अशा वेळी जी कुणी व्यक्ती घरात शिल्लक राहते ..तिच्या समोर .. "वेळ कसा घालवू ?,
हा प्रश्न एखाद्या संकटां सारखा भीषण स्वरूपाचा  होऊन बसलेला असतो...
अशा  व्यक्तीला आपण  " वेळ घालवण्यासाठी तू अमके कर, तू हे कर, तू ते कर " सूचना करणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कदाचित तो वैतागेल आणि रागाने म्हणेल सुद्धा.. आलास मोठा शहाणा ..मला सांगणारा .तू बघ न राहून .अशा बंद घरात .मग कळेल तुला ..माझी व्यथा .." 
मित्रांनो त्याचे दुखः: आणि त्याची व्यथा समजून घेतली पाहिजे .कारण त्याच्यावर जी वेळ "आली आहे ,ती, एक लादलेली अवस्था आहे ..एरव्ही त्याला वेळ कसा घालवू ?" हा प्रश्नच पडला नसता .

थोडक्यात काय तर. "वेळ सगळ्यांनाच सारखा मिळालेला असतो ..त्याचा विनियोग कसा करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे "असे असले तरी .."वेळ वाय घालवू नये ये " तो सदा कार्यापुरती असावा " हे कुणी अमान्य करणार नाही.. कार्यमग्न राहावे - "वेळ कसा घालवायचा  ? हा प्रश्न पडणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- ७ वा ,
हितगुज -लेखमाला 
लेख- वेळ कसा घालवायचा ?
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साभार - साप्ता .पथदर्शनी  अंक.दि.८-७-२०१७ अंकात प्रकाशित लेख.

Tuesday, August 1, 2017

लेख-क्र-६ - समारंभ आणि कार्यक्रम .