Friday, February 28, 2014

लेख- बदल- एक प्रक्रिया.......!

- मित्र हो-
इ- पेपर - पुणे परिचय -पुणे - दि. ७-२-२०१४ -च्या अंकात
प्रकाशित  माझा नवा लेख.
लेख- बदल- एक प्रक्रिया...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------
प्रत्येक गोष्टीत बदल होणे ", ही नैसर्गिक प्रक्रिया आहे .चराचर-
विश्वात बदल होत आले आहेत ,निसर्ग-चक्र बदलते आहे , ज्ञान -आणि-
विज्ञान यांच्या मदतीने आपले जगणे  बदलत असते,  स्थिरता " हे अवस्था
-प्रगतीचे लक्षण समजले जात नाहि.
नवे-नवे बदल होत जाणे, स्वरूपात बदल होत जाणे , कायापालट होणे ,
विचारांचे परिवर्तन होणे" , या शब्दातून "बदल -होणे" हे ध्वनित होते आहे.
सगळ्या गोष्टी आपोआप बदलत असतांना , "बदलण्यास तयार नसणारा -
माणूस ", स्वतहाच्या प्रगतीत मात्र मोठा अडथला बनून राहतो ", हे तो कधीच
मान्य करीत नाही.
खर म्हणजे आपल्याला "बदलण्याची संधी' सारेच जण देत असतात . अगदी
निसर्गा पासून ते ,प्राणी, पक्षी सुद्धा . आपल्या सभोतीची माणसे , समाज ,
हे सुद्धा वेळोवेळी "आपल्यात बदल व्हावा ", म्हणून प्रत्येक वेळी एक नवी
संधी देतात.
माणूस  त्याच्या एका "धोरणा साठी फार परिचित आहे. ते धोरण  त्याच्या
स्वभावाचे द्योतक  देखील आहे . कुणाच्या सांगण्याला न बधनारा -असा माणूस"
आडमुठ्या -धोरणाचा "म्हणून ओळ्खला जातो..".
कुणी नव्या आणि काही बदल करण्याची सूचना जरी  बोलून दाखवली ", तरी
अशा माणसांचे ताल-तंत्र बिघडून जाते . शांतपणे आणि विचार पूर्वक काही
ऐकून घेणे "या माणसांना मान्यच नसते.
"आपल्याच जुन्या आणि कालबाह्य ठरू पहाणाऱ्या  विचारंना आणि कल्पनांना
घट्टपणे चिकटून राहणे ", हा यांचा स्वभाव असतो. "कोणता ही बदल यांना मान्य
होणारा नसतो.
अशा आडमुठ्या स्वभाव्च्या माणसा मुळे" सगळीकडे त्रास होत असतो.
ही माणसे जिथे असतात - तिथे सगळे वातावरण वेगळेच आहे ही जाणवत असते ",
एक प्रकारचे अवघडलेल्या कुंद वातावरणाचा  अनुभव येऊ शकतो.
माणसाचे व्यक्तीरूप "हे सगळ्यांसाठी एक स्वीकार्ह  असे हवे.
कारण -
ज्या ठिकाणी समूह स्वरूपात कार्य करायचे असते -त्या ठिकाणचा प्रमुख "
हा "मन-मिळाऊ , सर्वांना समजून घेणारा , सोबत घेऊन चालणारा , उत्तम
नेता आणि उत्तम श्रोता "असला तर, एक सुखद परीस्थिती  असते .
अशा वातावरणात "कार्यक्षमता अधिक सिद्ध होऊ शकते.
कुटुंब -जीवनात देखील हे परिणामकारक आहे.घरातील
प्रमुख व्यक्ती  मोकळ्या मनाचे, आणि दुसर्याचे समजून
घेऊन त्या प्रमाणे निर्णय घेणारी असेल तर - घरात नेहमीच
छान आणि नवे, तसेच उपयुक्त असे बदल होतात .
आणि ज्या ठिकाणी याचा अभाव असतो " त्या घरातील
जुने-पुराने वातावरण " जाणवल्या शिवाय रहात नाही.
असे असले तरी- "बदलाचे हे वारे "- वाहणे, सर्वांनाच आवडणारे
असते असे मुळीच नाही.
आपल्या घरात , आजूबाजूला  हे असे "बदलाचे वारे " येऊ नयेत "
या साठी प्रयत्न करणारी "आडमुठी माणसे ", आपण पाहतोच असतो .
बदल न झाल्यामुळे , बदल न केल्यामुळे ", आपले काय, किती
आणि  कसे  नुकसान  होत असते ", या गोष्टीवर विचार तरी करून
पाहण्यास काय हरकत आहे ?
असे असले तरी आपण एका बदलाची " नेहमीच चिंता करीत असतो.
हे बदल आहेत माणसाच्या वृतीत होणारे - . आजकाल "हिंसक वृत्ती
आणि विकृती " यांनी सर्वत्र थैमान घातले आहे .
समाजात हे काय चालू आहे ? असा प्रश्न पडला आहे. नैतिकता ,
जीवन मुल्य", आदर्श " यांची चाड न बाळगणारी "ही भीषण माणसे ",
आणि त्यांच्यातील नष्ट झालेली माणुसकी पाहून" मनाचा थरकाप
होतो.
सगळ्या निर्मल भावना , संवेदना ,फुलणारी मने , उमलती शरीरे ,
सगळ्यांचा पाला -पाचोळा करणारी ही माणसे ", यांच्यातील "खरा
माणूस इतका कसा बदलून गेला आहे " ?,
आपल्या भल्यासाठीचे  आणि हिताचे , समाजाच्या कल्याणासाठीचे
होणारे बदल, करावे लागणारे बदल, हे नेहमीच आवश्यक आहे.
पण, समाज-जीवन बिघडवून टाकणारे , नैतिक जीवन उध्वस्त करणारे ,
अशी विकृत - माणसे आणि त्यांनचे हे बेदरकार वागणे "थांबवने "
हे सर्वांचे उद्दिष्ट झाले पाहिजे.
मवाळपणा सोडून , कणखरपणा आला तर च आपण या विकृतीचा
सामना करू  शकतो "आणि हा बदल" दुर्जनाना शासन करण्या साठी
आवश्यक आहे  हे नक्की.
"बहुजन सुखाय -बहुजन हिताय ", या हेतूने आलेल्या ,सुचलेल्या
कल्पना आणि विचार  या दोन्हीचा स्वीकार करून जर आपण
बदल करण्याची तयारी दाखवली  तर ।!
यातून नक्कीच काही तरी विधायक असे हाती लागेल.
 -------------------------------------------------------------------------------------------------
लेख- बदल- एक प्रक्रिया...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------

Thursday, February 20, 2014

कविता - कहाणी ...!

कविता - कहाणी ...।।
-अरुण वि.देशपांडे -पुणे
---------------------------------------------------------------------------
नाही राहिले भान मज,  सांगे माझी कहाणी
लक्षात आले अचानक  , का सांगे  मी कहाणी  ?  ।।

दुराव्याची दुनिया  माझी ,  जवळीक न ठावे
ओलाव्याच्या शब्दावीना,चाले रे  ही कहाणी ....।।

चंद्र तारे क्षीण दिसे  मज,  आकाश  न ठेंगणे
सुरु  असेल ही जरी तरी ,  अर्धी अजून कहाणी ………. ।।

असते कहाणी रंजक ,   असे ज्यात राजा राणी
हा राजा राणी विना . , त्याची कसली कहाणी …।।

आभारी आहे मित्र तुझा  , वेळ तुझा मी घेतला
नवखा आहेस तू  गड्या,  नवखी तुज कहाणी ......।।

मीच म्हणालो राजाला      ,उदास का  रे होसी..?
कशी ही असो तुझी  ही  ,     मी  सांगेन ही कहाणी .....।।
-----------------------------------------------------------------------------------------
कविता - कहाणी ...।।
-अरुण वि.देशपांडे -पुणे
---------------------------------------------------------------------------------------

Monday, February 3, 2014

कविता- आहे का तुज खबर काही ?

कविता - आहे  का तुज खबर काही   ?
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
--------------------------------------------------------
भेटून गेलीस काल सखे
घडून गेले मग खूप काही
काय झाले समजुनी घे तू
आहे का तुज खबर काही ?………!

म्हणतेस नेहमी मजला
हे  काय आह? आपल्यात रे  !
तूच विचार  मनास तुझ्या
आहे का त्यास  खबर काही ?……!

सूर जुळती मनांचे तेंव्हा
गीत हे  मन गाऊ लागते
स्वप्ने तरळती स्वप्नात
आहे का तुज खबर काही …?…।!

बरे आहे एक सखे तुझे
असतेस  तू तुझ्यात सदा
वेड लाविलेस अन मजला
आहे का तुज खबर काही …?…।!

आहे आता करणे इलाज
तुलाच या बिमारीवरी
गंभीर हा मामला आता
आहे का तुज खबर काही …?…।!
------------------------------------------------------------------
कविता - आहे  का तुज खबर काही   ?
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------