Saturday, September 21, 2013

कविता - स्वप्न नावाचे एक खेळणे ...!

कविता -    स्वप्न नावाचे एक खेळणे .
-अरुण वि .देशपांडे - पुणे
----------------------------------------------------------------
मन हिरमुसले किती ही
तरी पुन्हा ते खुलावे म्हणून
द्यावे लागते हातात त्याच्या
स्वप्न नावाचे एक खेळणे .
नाही तरी एक लहान मुल
दडलेले असतेच की मनात
त्याचे रुसेवे फुगवे जावे
म्हणून द्यावे लागते कधी
स्वप्न नावाचे एक खेळणे .
प्रेमाच्या सावल्या उमटून
जातात मनाच्या अंगणात
विसर पडतो वास्तवाचा
तेव्न्हा तर हवेच असते
स्वप्न नावाचे एक खेळणे .
स्वप्नातले जग असते खरे
आपल्या मनासारखे जगण्याचे
मनात मुरुलेल्या जुनाट वेदना
विसरून जाण्यास मदत करते
स्वप्न नावाचे एक खेळणे .
मनास ओळखावे आपण आपल्या
लाड त्याचेही कधी कधी करावे
गुंतणे त्याचे असे असते बरे
आपण असतो निवांत ,मन खेळते
स्वप्न नावाचे एक खेळणे .
--------------------------------------------------------
 कविता - स्वप्न नावाचे एक खेळणे . …!
-अरुण वि .देशपांडे -पुणे .
----------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment