Thursday, March 29, 2018

लेख- नातेवाईक असे का वागतात ?

साप्ता.चपराक -पुणे. दि.२६ मार्च २०१८ अंकात प्रकाशित लेख.
लेख-
नातेवाईक असे का वागतात? 
---------------------------------------------------------------------------------------
आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन प्रवासात भावनिक दृष्ट्या आणि व्यावहारिक -दृष्ट्या   मित्रांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे " हे आपण एखाद्या सुविचारा सारखे नेहमी सांगत असतो . या मित्रा इतकेच आपल्या पारिवारिक जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असते -आपल्या  समस्त नातेवाईक मंडळींचे.

एका जुन्या -जाणत्या व्यक्तीने एकदा मला समजावून सांगतांना म्हटले..हे बघा -भाऊसाहेब .एक लक्षात असू द्या नेहमीसाठी  की - 
 " कोणत्या प्रसंगी निभावून नेते ..ते नाते .. आणि आपली अडवणूक करते ते - .ना -धड नाते असते  ना संबंध ", !
आपण आपल्या नातेवाईक मंडळींचा उल्लेख . आपले सोयरे "असे ही करतो . आहे त्या परिस्थितीत सोय "समजून जे सोबत असतात त्यांना सोयरे म्हणायचे , आणि किती ही खातिरदारी करा ..त्यात गैरसोय झाली असेच ज्यांना वाटते आहे त्यात  " उणे "पाहणारे " ते असतात आपले पाहुणे ",
आता तुम्हीच ठरवा नातेवाईकात आपली इमेज .एक चांगला सोयरा म्हणून असावी की उपद्रवी-पाहुणा "?

नातेवाईक असे का वागतात ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे ,सहज आणि स्पष्ट आहे .. त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे .नातेवाईक आपल्याशी आपण कल्पना केली नसेल असेल विचित्र वागतात कारण ".कामापुरते गोड बोलून जवळ आलेली अशी मंडळी ..तुमच्यावर नाराज होऊन ..लगेच पुढच्या घराचा दरवाजा ठोठावण्यासाठी पुढे निघून गेलेली असतात.

 नाते-संबंधात एकमेकांना समजून घेणे "यावर फारसा विस्वास न ठेवता अतिशय वर-वरच्या माहितीवर विस्वास ठेवून स्व-निर्णय घेत अनेकजण चांगले संबंध बिघडवून टाकीत असतात. आपल्या माघारी जर ..नातेवाईक आपल्या नावाने महा-चर्चा "आयोजित करून पोस्टर छापत असतील तर ? आपण काय करू शकणार आहोत ?

तुम्ही कसे आहात " हे परस्पर ठरवून मोकळे होणारे नातेवाईक आजूबाजूला असतात "हे एकदा मान्य करून वागण्याचे जमले तर .. होणार्या मानसिक त्रासाचे तीव्र प्रमाण नक्कीच कमी होईल .
नातेवाईक असे का वागतात ? ..हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो ..याचे एक उत्तर असे आहे ..ते म्हणजे "
.तुमच्या सोयीप्रमाणे ते अजिबात वागलेले नाहीत हे तर मुख्य कारण आहेच आहे , आणखी एक कारण म्हणजे ..आपण सुद्धा त्यांच्या प्रमाणेच वागलो आहोत , नेमके हे जाणवल्यामुळे ..दोघांच्या एकमेकांच्या बद्दलच्या प्रतिक्रिया चांगल्या कशा असतील ?

व्याहारिक ज्ञान ,व्यावहारिक समज " या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप छान जमतात " या गैरसमजात रहाणारे आणि वागणारे ..समोरच्या मानसला हे डोस  आणि ढोस " ठासून देत असतात , असा मातब्बर नातेवाईक ..त्याच्या इतर नातेवाईक साठी नेहमीच आदरणीय असेल का ? तर याचे उत्तर कधी कधी ..हो , तर कधी कधी -अजिबातच नाही.." असे असेल .कारण हे सांगणे समोरच्या माणसाच्या त्यावेळच्या मानसिकतेवर अवलंबून असते..
मग असे नाते कसे सांभाळावे ?
प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे.. कारण स्वार्था पोटी नाते जरी टिकवणे असले तरी ..नाते हे विनाकारण तोडता येत नसते . या साठी मध्यम मार्ग अवलंबिता येतो ..तो म्हणजे नात्यात ..सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.
कारण पुष्कळदा ..अगदी .."मेतकुट "जमलेले एकजीव नाते ..मन फिरले , विचार फिरले की दुसर्या क्षणापासून आयुष्भाराचे वैरभाव मनात ठेवणारे नाते होऊन बसते.
"मित्र नातेवाईक असतात ..पण, सगळेच नातेवाईक हे कधीच मित्र होऊ शकत नाहीत .." म्हणूनच "नाते टिकेल ही ",पण नाते आणि नातेवाईक हे दोन्ही सांभाळून नेणे " ही एक मोठीच भावनिक कसरत असते .
ही अशी भावनिक कसरत आपण बहुतेक जन करीत असतो ..ज्यालाच पारिवारिक जीवन" म्हंटले जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख - नातेवाईक असे का वागतात  ? 
-अरुण वि. देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment