Friday, June 22, 2018

नवे स्फुट लेखन - ##काहीबाही असेच काही ..(१) मन-.

मित्र हो नमस्कार ,
आपल्या साठी एक नवा लेखन उपक्रम सुरु केला आहे .
छोटे-छोटे लेख आपण वाचाल या लेखमालेतून ..
शीर्षक आहे-
काहीबाही असे काही "
या लेखनाबद्दल तुमचे अभिप्राय जरूर कळवा .
----------------------------------------------------------------

##काहीबाही असेच काही ..(१)
मन-
#अरुण वि.देशपांडे.
--------------------------------
आजकाल मनाला काय झालय ?या प्रश्नात गुंतण्यापेक्षा, मनाला बोलतं करावं असं वाटत पण हे मन बेटं दाद देत नाही,
आक्रसून गप्प बसून रहात, कोशात लपेटून घेतं आणि आपल्या कडे ढुंकूनही न पाहता डोळे मिटून पडून रहात.
त्याचा हा असहकार आपण समजून घेणे
गरजेचे आहे " हे कधी समजूनच घेतले नाही, मन रागवण्याचे एक कारण हे सुद्धा आहे.
स्वार्थी , अप्पलपोटी, संधिसाधू माणसाच्या हृदयातले मन" व्हावे लागणे",
मनासाठी लाजिरवाणी वाटणारी गोष्ट असते",
स्वतःच्या मनाला मारून जगणाऱ्या माणसाने मनाचा असा विचार करणे कधीच महत्वाचे मानले नाही",
शेवटी सहन करण्याला काही मर्यादा असते की नाही ?
माणूस स्वतःला उत्तम मित्र समजतो,
मित्रांचा गोतावळा भवती जमवतो,हा
उपद्व्याप करण्याच्या नादात ,स्वतःच्या मनाचे मित्र होणे त्याला जमले नाही ",की
मग असे अवचित घडते,
आपलेच मन आपला शत्रू बनते, मदतीस येत नाही, कृती सफल होऊ देत नाही,
परिणाम त्याची नि त्याच्याबरोबरच्या माणसाची दुर्दशा सुरु..
------------------------------------------------
-## काही बाही असेच काही (१)
मन
# अरुण वि.देशपांडे

No comments:

Post a Comment