Sunday, October 8, 2017

लेख- लेख-आठवणीतली गावं - लेख- क्र-१ अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!




लेख-आठवणीतली गावं –
लेख- क्र-१
अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!
मित्रहो नमस्कार ,
दैनिक दिलासा ,आणि आदरणीय विजय जोशीसर यांच्याशी अक्षर –नातेबंध जुळून आता ३५ वर्षे होऊन गेली आहेत १९८३-१९८४ साल असावे मी त्यावेळी हैद्राबाद बँकेत गंगाखेडला होतो .१५ ऑगस्ट विशेष अंकात माझी “ काचेचे हिरे “ ही कथा विजय जोशी सरांनी प्रकशित केली प्रकाशित झालेली हे माझे पहिले वाहिले प्रकाशित झालेले साहित्य.  तेंव्हा पासून सुरु झालेला माझा लेखन प्रवास आजही अखंडपणे चालू आहे , आज ही अगदी आपलेपणाने दिलासा साठी मी आनंदाने लेखन करीत असतो.
संपादक आणि मित्र –संतोष धारासूरकर यांच्याशी संवाद –भेटी नेमाने होत असतात .अशाच एका भेटीत ..आठवणीतली गावं “हा माझा लेखन-संकल्प यावर आमचे बोलणे झाले .आणि ते म्हणाले परभणीत तुम्ही खूप वर्ष होता –मग परभणी –आठवणीतले गावं .ही लेखमाला सुरु करा ,रविवार –साहित्य पुरवणीतून क्रमश ..येऊ द्या .
या रविवारपासून आपण नियमित भेटणार आहोत .त्यासाठी आरंभीच दिलासा टीमचे आभार मानतो.
माझ्या आयुष्य- प्रवासातील सर्वात मोठा पर्व-काल मी. परभणीत घालवला  ..,१९८६ ते २००६ अशी वीस वर्ष- दोन दशकं मी फेमस परभणीत होतो . मी तसा ही मुळचा परभणीकर आहे .एक लेखक म्हणून, एक बँक-कर्मचारी म्हणून आणि एक व्यक्ती –एक माणूस म्हणून मी परभणीत वावरलो ..खूप देऊ शकलो तर नाकीच नाही पण पर्भानीने सवयीप्रमाणे भभरभरून दिले आहे ..ते सर्व या लेखमालेतून येईल .ते दिवस, ती वर्षं ती माणसे या सर्वांच्या आठवणींचा –पेमाचा अक्षर जागर तुम्हाला आवडणारा ठरावा हे अपेक्षा करतो .

आजच्या लेखाच्या पहिल्या लेखातून परभणीकर म्हणून माझी पारिवारिक ओळख करून देणे योग्य राहील
१९८६ ते २००६ ही २० वर्ष मी परभणीला होतो . या काळात माझा परिचय गंगाखेडहून आलेला .हैद्राबाद बँकेतील एक कर्मचारी असा होता . माझे वास्तव्य त्यावेळी आरंभी वसमतरोडवरील रामकृष्ण नगर पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या बँक कॉलनीत होता , नंतर कारेगाव रोड ला –पाण्याच्या टाकी जवळ ..श्रीराम नगरला आमची आणखी एक बँक कोलोनी झाली ,आणि या कॉलोनीत मी माझे घर बांधले ..
४१ - वरदान “ श्रीराम नगर परभणी या वास्तूने मला खूप भरभरून दिले , माझे साहित्य लेखन या वास्तूत झाले आहे .यामुळे एक झाले ..बाहेरगावाहून आलेला मी –परभणीच्या क्रांतीचौकातला आहे ही माझी ओळख नव्या पिढीला झालीच नाही , म्हणून देखील आज हा लेख लिहिवसा वाटला
परभणीच्या वास्तव्यात माझी ओळख लेखन –धडपड करू पाहणारा आणि .मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर –प्रतिष्ठा –परभणी .या संस्थेचा एक कार्यकर्ता अशीच होती .. या दोन्ही संस्थात नियमित वावरत असतांना मला अनेक साहित्यिक आणि मित्र –लाभले –या सर्वांच्या सहवासात माझी साहित्यिक म्हणून जडणघडण झाली  साहित्य-नगरी –सम्मेलन नगरीची महती आज मी सर्वत्र मोठ्या अभिमानाने आनंदाने सांगत असतो..

आता परभणी सोडून मला अकरा वर्षे होत आहेत ..सध्या पुण्यात रहात असलो तरी ..मनाने फुल –टू-परभणीत असतो.
आजच्या लेखाचे प्रयोजन .साहित्यिक आठवणीचे नसून.माझ्या पारिवारिक –परभणीकर म्हणून तुमच्याशी शेअर करणे हे आहे. आमची पारिवारिक ओळख – लोहगावकर देशपांडे – क्रांती चौक –परभणी . ज्यांचा सहवास मला लाभला अशा माझ्या परभणीकर-पारिवारिक सदस्यांचा या लेखात उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय , अनेक माझ्या माणसांचा उल्लेख स्मरणा -अभावी होणे कठीण आहे .त्यांनी मोठ्या मनाने माझ्या विस्मरण –बुद्धीला क्षमा करावी.
आम्ही लोहगावकर देशपांडे –तसेच ताडलिंबेकर –देशपांडे ,महातपुरीकर –देशपांडे , परभणीकर –देशपांडे ,हे सर्व मंडळी क्रांतीचौकातच वास्तव्यास आहे ..सगळे आडनावंबंधू आणि तसे नातेवाईकच .
परभणीच्या क्रांतीचौकात रंगराव देशपांडे –हे संकुल आहे ते रंगराव गंगाधरराव देशपांडे –लोहगावकर हे माझे चुलत आजोबा ..या संकुलाच्या जागी रंगराव आजोबांचे वास्तव्य असलेला वाडा होता –त्यालाच “गढी “असे म्हटले जात असे रंगराव देशपांडेच्या वाड्यातच मराठीचे श्रेष्ठ –साहित्यकार बी.रघुनाथ शेजारी म्हणून राहत असत .माझे काका श्रीधर देशपांडे ..यांनी बी.रघुनाथ यांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात सांगितल्या.
रंगराव आजोबांच्या वाड्यात अलीकडच्या काळात –माझे काका श्रीधरराव देशपांडे राहत असत .त्यांच्या परिवारात सामील झालेला किशोर ब्रम्ह्नाथकर –आणि आता माझा बंधू झालेला किशोर देशपांडे –त्याची पत्नी संध्या औरंगाबाद येथे असतात ,शेतीविषय प्रयोगशीलता हा या बंधूचा विशेष आहे.
.त्याच्या बाजूला आहे ते आमच्या परिवाराचे मोठ्ठे घर ..व्यंकटराव उर्फ बालासाहेब काका यांचा वाडा ,या काकांचे चिरंजीव ..सखाराम देशपांडे –लोहगावकर –माझ्या या चुलत बंधूचे अकाली जाणे- आम्हा सर्वासाठी मोठी दुर्दैवी घटना ठरली आहे.आता या घरात आनंदी देशपांडे –लोहगावकर यांचे वास्तव्य असते
या वाड्याच्या मागच्या गल्लीत आमच्या लोहगावकर –देशपांडेच्या मोठ्ठ्या घराचा भाग आहे ,या वाड्यात १९६४ साली परभणीला वडिलांची बदली झाली तेंव्हा आम्ही आमच्या या खानदानी घरात राहिलो. मी त्या वर्षी जिंतूर रोडवरच्या मोठ्या नूतन शाळेत नववीच्या वर्गाचा विद्यार्थी होतो .माझ्या शालेय जीवनाचे एकच वर्ष परभणीला झाले.
माझ्या वडिलांचे नाव. विठ्ठल हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये होते , १९८९ मध्ये ते परभणी मुख्य शाखेत मनेजर होते .माझ्या वडिलांचे लहानपण परभणीतच गेलेले , मला आठवते दीप -प्रभाचे विठ्ठलराव पाठक , राजाभाऊ सुभेदार श्रीनिवासराव राजेंद्र “हे वडिलांचे अतिशय जिवलग मित्र होते
हनुमंतराव देशपांडे -माझे आजोबा “पांडेपण करायचे ..फुलकळस- या गावी त्यांचे वास्तव्य असायचे.या गावी आमचा वाडा आणि शेती होती .
..या गावात माझ्या बळवंत गंगाधरराव देशपांडे या आजोबांनी .श्री बजरंगबली –मारुती ची स्थापना केली ..आज पंचक्रोशीत हे मंदिर – पांड्याचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देशपांडे परिवारातील नवी पिढी मोठ्या श्रद्धेने फुलकळसला मारुती दर्शनास येत असतात . या गावासाठी बळवंतराव आजोबांचा नातू – नितीन मुरलीधर देशपांडे अनेक सामाजिक स्वरूपाच्या योजना राबवतो आहे
बळवंतराव आजोबांचे थोरले चिरंजीव म्हणजे जुन्या पिढीतील कीर्तिवंत प्राध्यापक – डॉ.के.बी .देशपांडे –केशव बलवंत देशपांडे .उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद मध्ये कार्यरत असतांना के.बी काकांना .औरंगाबाद  येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी बोलावले गेले ..हे केबी काका –बॉटनी  या विषयाचे प्राध्यापक होते ,मला आठवते शाळेत असतांना आम्हाला .वनस्पती शास्त्र “हे त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात होते .हे मोठे लेखक आपले काका आहेत” हे खूप सुखद वाटायचे .
केबी काकांची मोठी कन्या माझी मोठी चुलत बहिण मंगलताई ही -–मराठवाड्यातील पहिली महिला इंजिनियर आहे “ हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
केबी काका परभणीला अगदी नियमित येत असत ,जुनी परभणी त्यांना फार प्रिय होती.

काळाच्या ओघात आता खूप बदल झालेत .जुन्या पिढीतील जेष्ठ-पिढी आता हयात नाहीये . निसर्ग-नियमानुसार होणारी ही गोष्ट आहे...
माझे मोठे काका – दत्तात्रय हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..यांची आजची पिढी परभणीला आहे- श्री. गुंडेराव दत्तात्रय देशपांडे हे माझे मोठे चुलत बंधू – त्यांच्या परिवारातील दिनेश व त्याची पत्नी. आणि  धाकटे –चिरंजीव -.राजेश देशपांडे –संध्या देशपांडे हे दोघेजण –परभणीतील सार्वजनिक जीवनात सर्व-परिचित जोडपे आहे ..लोहगावकर देशपांडे ही ओळख त्यांनी दमदारपणे चालू ठेवली आहे .याचे मला खूप कौतुक आहे.
दुसरे मोठे चुलतबंधू भीमराव दत्तात्रय देशपांडे .जयश्री हेमाद्री –देशपांडे ,हे जोडपे -
भीमराव देशपांडे यांचे चिरंजीव – राहुल –अरुणा हे जोडपे पुण्यात असते आणि धाकटे चिरंजीव प्रसाद –- अदिती हे जोडपे बडोदा येथे असते.हा प्रसाद उर्फ पप्पू देशपांडे .आता प्रसाद भि.देशपांडे “या नावाने लेखन करणारा इंटरनेट-वरील अतिशय लोकप्रिय असा कथाकार आणि कवी आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन –मध्ये निमंत्रित कवी “म्हणून त्याचा सहभाग अभिनंदनीय असाच आहे.
भीमरावची कन्या –सौ.रसिका रमण संगमकर –नांदेडला असते
मधुकर देशपांडे- मोहिनी , यांची मुलं -राहुल आणि आरती - म्हणजे क्रांतीचौकातील आमच्या लोहगावकर देशपांडेच्या खानदानी वाड्यात राहणारे आमचे घर एक घर आहे.
भीमराव देशपांडे यांचे साडू –बंधू आणि प्रसिद्ध साहित्यिक-वक्ते – श्री .अनिल रामदासी –विद्या हेमाद्री –रामदासी –माझे पारिवारिक स्नेही आहेत ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
सर्वात मोठे चुलत बंधू लक्ष्मीकांत दत्तत्रय देशपांडे – यांचे चिरंजीव विलास नोकरी निमित्ताने औरंगबादला आहे ..त्याची पत्नी –सौ.संगीता देशपांडे ही उत्तम लेखिका आहे .परभणी-हिंगोली –नांदेड आणि आता औरंगाबाद अशा विविध ठिकाणी राहून ती विविध नियतकालिकातून नियमित लेखन करीत असते , लेखन आता इंटरनेटवर सुद्धा ती एक उत्तम वाचक आणि लेखिका म्हणून कार्यरत आहे.
माझ्या या मोठ्या बंधूंचे जावाई आहेत प्रसिध्द नाट्यकलावंत –श्री किशोर विश्वामित्रे .


माझ्या सर्वात मोठ्या चुलत भगिनी सुशीला –देशपांडे –देशमुख यांचा परिवार – सुधीर-विनोद –बाळू –(आकाशवाणी मधील )ही भाचे मंडळी आणि त्यांचा परिवार परभणीतील सार्वजनिक कार्यात परिचित आहे.
माझी धाकटी चुलत बहिण सौ.विमल –आणि श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हा परिवार परभणीत असतो .श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हे वसमतरोड परिसरातील एक सर्वप्रिय व्यक्तिमत्व आहे.
माझ्या वडिलांची मावशी –सुभेदार परिवारातील ..बबनराव सुभेदार हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ ..या बबनकाकांची नवी पिढी .त्यातला मनोज सुभेदार ..इंटरनेटवर परिचित असलेला एक लोकप्रिय मित्र आहे.
रेणुकादासराव चौधरी –सावरगावकर –हा परिवार म्हणजे वडिलांच्या बहिणीचे –वेणू-आत्याचे घर.
मोठा आतेभाऊ म्हणजे यशवंत चौधरी – म्हणजे य.रे -सर.त्यांची पत्नी –मंगला –पावडे-चौधरी आणि बाल विद्या मंदिर ,उभयतांची अशीच ओळख विद्यार्थ्यात होती . यशवंत चौधरी –माझा मोठा आतेभाऊ ..पण माझ्यासाठी अत्यंत आदरणीय य.रे –सर म्हणूनच अधिक जवळचा होता ..
पुढे निवृत्त झाल्यावर यशवंत चौधरी ..पुण्यात आल्यावर आमच्या नियमित भेटी होत असत ..
..त्याचे बाल-मित्र असलेले सुधाकर पाठक ,गोविंद कात्नेश्वारकर –हे माझे पारिवारिक मित्र म्हणून आज ही माझ्या संपर्कात असलेले परभणीकर मित्र आहेत .यशवंतचा  मुलगा –गणेश चौधरी पुण्याच्या संगीत क्षेत्रात उत्तम तबला –पटू म्हणून परिचित आहे.
माझा धाकटा आतेभाऊ , रविकांत चौधरी – याने आपल्या बहारीच्या काळात रवी टेलर्स “या नावाने परभणी आणि परिसरात आपल्या कार्याची ठळक अशी मुद्रा उमटवली होती...
रवी टेलर्स –कडे शिवलेले कपडे न वापरणारा परभणीकर –आणि कोणत्याही क्षेत्रातील नोकरदार व्यक्ती असो , १९७५- ते २००० अशा जवळपास पंचवीस वर्षांच्या काळात शोधून सापडले नसते ..इतका हा रवी-टेलर्स “चा प्रभाव होता .

आज या चौधरी परीवारतील बहुतेक सदस्य आता परभणीला नाहीत .स्वतः रविकांत चौधरी –सौ.अलका आणि त्याचा मुलगा हरीश , विवाहित मुली –रचना ,आणि रश्मी त्यांच्या परिवारासहित औरंगाबादला आहेत.माझ्या आतेबहिणी–  सौ.शोभा अशोकराव पार्डीकर , सौ.प्रभा सुधाकर जोशी ,या पुण्यातच असतात ,
सौ.सुनिता –कळंब- देशमुख परिवारात ,आणि सौ.मीना –प्रज्ञा प्रशांत आजेगावकर –नवी मुंबई ला असते.
सर्वात धाकटी आतेबहीण – सौ.ज्योती विलास आंबेकर परभणीकर झाली आहे. तिच्या सोबतच परभणीकर असलेली माझी मोठी आतेबहीण –सौ.ताई रमेश मंगरूळकर हा परिवार परभणीला असतो.
भला मोठा असा हा माझा परिवार आहे..आणि असा आहे मी परभणीकर
..बाकी पुढच्या लेखात .....
(क्रमशा ......)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment