Friday, October 13, 2017

लेख- कल्पना आणि अंदाज

लेखमाला -
हितगुज -
लेख- 
कल्पना आणि अंदाज ...!
------------------------------------------------------------------------
 दैनंदिन कार्यक्रमात अनेक वेळा आपण सगळेजण आयोजकाची भूमिका कधी न कधी पार पाडीत असतो..आणि अशा समारंभाचे व्यवस्थित पार पडणे , .  बरेचदा " .अनेक गोष्टींची आपल्याला कल्पना असणे आणि कल्पना नसणे , तसेच आपल्याला  "  एखाद्या गोष्टीचा अंदाज करता न  येणे आणि अंदाज चुकणे .." या दोन गोष्टीवर अवलंबून असते . याचे आणखी एक कारण असते ते म्हणजे - आपल्याला व्यावहारिक अनुभवाची आणि ज्ञानाची असलेली कमतरता ".हे कुणी मुद्दाम करत नसते ,हे ही तितकेच खरे .

आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू, जिन्नस अशा अनेक गोष्टींची कल्पना नसते की ,हे सगळे "की हे कुठे मिळते, कसे मिळते ? कितीला मिळते ? आणि मग कित्येकदा गरज नसतांना "केवळ कल्पना नसल्यामुळे ,माहितीच्या अभावी" आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते , यात पुन्हा एक गम्मत अशी असते की .आपण कुणाला विचारायला जावे तर .समोरचा खांदे उडवीत म्हणतो .."काय की बुवा ,काही कल्पना नाही ..! " कदाचित असे म्हण्यामागे .अशी एक वृत्ती असू शकते ..जाऊ द्या .कशाला उगीच मागे काही जबाबदारी लावून घ्या ?.

अंदाज असणे आणि अंदाज नसणे ..या दोन्ही गोष्टी या प्रत्यक्ष्य अनुभवावर  आधारित आहेत. अंदाज हा नेहमीच अचूक असयला हवा असा आग्रह नसतो .म्हणून आपण लगेच म्हणतो ..निदान ढोबळमानाने-"  तरी अंदाज करू या ..!
आपल्याला असे अंदाज आपल्याला करायला लागतात- केंव्हा ? जेंव्हा नियोजित कार्यक्रम वा समारंभ हे मोठ्या स्वरूपाचे असतात ,आणि यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप जास्त संख्येची असते.
एवढेच कशाला ..आपण कित्येकदा "घरच्या घरीच कार्यक्रम .ठरवतो  यात अतिशय मर्यादित संख्या असलेले पाहुणे 
येणार असतात " अशा वेळी ..सर्व गोष्टींचे प्रमाण घरातील अनुभवी याक्ती  सांगेल त्याप्रमाणे ..त्याच्या अनुभवी अंदाजानुसार केल्या जातात .ही व्यक्ती सल्ला देते की - " हे बघा ...१०० पाहुणे येणार असतील तर ..७५ मानासंना लागेल इतका केले तरी ..निभून जाईल हो..!
कारण सगळेच्या सगळे पाहुणे येतीलच असे होत नसते " त्याचा हा अंदाज जवळपास अचूक ठरणारा असतो..कारण अनुभवातून त्या व्यक्तीला असलेली नियोजनाची कल्पना आणि त्याला असलेले अंदाज -कौशल्य .

अंदाज करता येणे " तो न चुकणे " या गोष्टी निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे ..निर्णयक्षमता नसणाऱ्या व्यक्तीने ,काही कल्पना नसतांना त्याच्या अंदाजा प्रमाणे केले तर आणि कार्यक्रमाचा पचका झाला तर  ..त्याला बोलणे खावी लागतील तुला आधीच म्हणालो होतो ..नको करू करूस .तुला न कल्पना आणि  कशाचा अंदाज ! ..अरे बाबा .असे ...अंदाजे पंचे दाहो दर्शे..केल्याने कुठे जमतं असते का ?

एखाद्या विषयाची काहीही माहिती नाही ,तर कल्पना तरी कशी करता येईल ? या साठी प्राथमिक माहिती, जुजबी माहिती , कामापुरती माहिती ,सगळी माहिती , परिपूर्ण माहिती ..एव्हढे सगळे किंवा या पैकी थोडे तरी आपल्याजवळ असेल तर ..काम पूर्ण होईल की नाही ? आपण हे काम करू शकू की नाही ? याची पूर्वकल्पना करता येते आणि मग त्या अनुषंगाने .अंदाज बांधता येणे , थोडाफार अंदाज करणे , असे करीत करीत पुढच्या पायऱ्या चढून जाणे जमायला लागते .

चार माणसाच्या घरात सुद्धा हे तितकेच आवश्यक आहे ..गृहिणी व्यवहार -कशल आहे " असे जर कुणी म्हणत असेल तर खुशाल समजावे की या घरातील गृहिणीला सगळ्या गोष्टींची माहिती आहे , कुठून ,कशी खरेदी करायची याची कल्पना आहे ...तिच्या या सवयीमुळे ..घराचे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता फारच कमी असते ,

आणि अनुभव हा श्रेष्ठ गुरु"लाभला की ..त्या पाठोपाठ आपल्या व्यक्तीमत्वात अनेक चांगले गुण येऊ लागतात .
सगळी सोंगं करता येतात पण..पैश्याचे सोंग नाही करता येतं ..हे एक सर्वपरिचित सिध्द अशी म्हण प्रचीलीत आहे.
आणि पैश्याचे नियोजन ..हे नेहमीच ..अनुभवी..अंदाजातून तयार करायचे असते ..म्हणून तर याला .."वार्षिक  अंदाज पत्रक " असे ठळक नाव प्राप्त झाले आहे ते किती अचूक आणि संपर्क आहे हे जाणवते .

अंदाज "म्हणजे तरी नेमके काय ? भविष्यात नेमके असेच घडेल ..याची कल्पना आपल्याला नसतेच ..त्यामुळे काय घडू शकेल ? याचा अर्थातच अंदाज करता येत नाही .." असे आहे म्हणून .भविष्यकालीन नियोजन न करून कसे चालेल ? मग, केवळ स्व-अनुभव ,इतरांचे अनुभव ,आणि क्षमता ..यांच्या बळावर आपण ..अनेक गोष्टी ठरवतो ..त्यात आपली कल्पना आणि अंदाज .या दोन्ही गोष्टींची  परीक्षा होत असते .

जीवनाच्या या कठीण परीक्षेत ..ज्याचे ठोकताळे , अंदाज ..अचूक ठरतात ,ज्यांचे अंदाज खूप बरोबर नाही ठरले तरी फार चुकीचे ठरत नाहीत , अशा व्यक्ती ..अपयशी होण्याचे दुखः टाळण्यात नक्कीच यशवी होत असतात. याची कल्पना आपल्याला असयला हवी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- कल्पना आणि अंदाज .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment