Thursday, February 15, 2018

लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ श्रीकांत सदावर्ते .

लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - 
लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ 
श्रीकांत सदावर्ते .
------------------------------------------------------------------------
आठवणींचा जलाशय ..खोल आणि अथांग ,शांत आणि निशांत ..वार्याच्या झुळुकी येतात नि तरंग -वर्तुळे उठवूनी जातात , मित्रांनो , आठवणींचा असा जलाशय प्रय्त्येकाच्या मनात असतो .. या लाटा उसळून येत नाहीत  इथे 
या आठवणी जिव्हाळ्याच्या , आपलेपणाच्या , मायेच्या , प्रेमाच्या ,स्नेह-भावनेच्या असतात ..याना ओहोटी "नसते ,असते फक्त असोशी.
अखंडपणे आठवणी मनात  असतात , हे झरे अखंडपणे पाझरत असतात ..मन कधीच कोरडे होऊ देत नाहीत हे आठवणींचे झरे.
माझ्या साहित्य प्रवाहाचे उगमस्थान भले ही गंगाखेड हे गाव असेल , पण हा प्रवाह विस्तारित झाला तो परभणीच्या वास्तव्यात .. याचा इथे सन्मानपूर्वक उल्लेख करणे मला गरजेचे वाटते आहे.
माझ्या साहित्य प्रवासाला  ज्यांची साथ-सोबत लाभली , ज्यांच्या सोबतीने माझी वाटचाल झाली आहे .अशा सहप्रवासी मध्येच साथ सोडून कधीचे दूरदेशी मुक्काम्मी निघून गेले गेले आहेत , त्यांच्या आठवणी मनाला मोठ्या व्याकूळ करणार्या आहेत..
साहित्य -लेखन करणाऱ्या एखाद्या नवोदिताला जेव्न्हा जाणत्या साहित्यिकाचा सहवास लाभात असतो ..ते क्षण मोठे भाग्यकारक असतात .. असे दिवस,माझ्या वाट्याला परभणीत असतांना खूप वेळा आले ..त्या पैकी काही आठवणीना आज पुन्हा उजाळा द्यावासा वाटतो..

गेल्या पिढीतील अनेक साहित्यिकांची मराठवाड्यातील साहित्यात आणि .. त्यावेळच्या समकालीन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात योग्य  ती नोंद झालेली नाहीये ..त्यामुळे त्यांच्या साहित्याची ..कार्याची .दखल घेणे राहूनच गेले असे म्हणावे वाटते.
अशा साहित्यिकात ..एक जेष्ठ लेखक-कवी  श्रीकांत सदावर्ते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे असे वाटते. माझ्या उमेदवारीच्या काळात ..सदावर्ते यांच्या घरी ..अनेकवेळा साहित्यिक संवाद भेटी होत असत ..त्यांच्या कौतुकास मी पात्र ठरत गेलो ..ही गोष्ट माझ्या मनास नेहमीच आनंद देणारी आहे.

श्रीकांत सदावर्ते आणि   रे.स.चौधरी यांच्या कल्पनेतून  साकार झालेले   कवितेचे व्यासपीठ .." काव्य रजनी मंडळ ", . या उपक्रमामुळे समस्त कवींना या दोन थोर व्यक्तींचे  कधीच विस्मरण होऊ शकणार नाही , परभणीच्या परिसरातील कवींची एक पिढी काव्य -रजनी मंडळ " या माध्यमामुळे साहित्य क्षेत्रात आत्मविस्वास -पूर्वक पुढे आली. काव्य-रजनीचे  कवी-समेलन , वार्षिक -मेळावे असे अनेक उपक्रम मराठवाड्यातील कविता रसिकांना नेहमीच आठवणीत राहतील.

काव्य-रजनी मंडळ आयोजित कवी- संमेलन असले की .एक श्रोता  म्हणून मी आवर्जून हजार असे ..याचे कारण  कवी समेलनसाठीचे "श्रीकांत सदावर्ते यांचा येणारा फोन ..ते म्हणत -
" या बरं का अरुणराव तुम्ही पण ..! , हे निमंत्रण माझ्यासाठी मी नेहमीच एक आदेश मानला होता. ते नेहमी म्हणत .अहो ,आपण साहित्यिक म्हणवतो न स्वतःला ..मग ,अशा ठिकाणी, अशा कार्यक्रमाला आपण  आलं -गेलंच पाहिजे त्याशिवाय आपली बांधिलकी आहे हे लोकांना कसे कळणार ? 

तुम्हे कथा लेखक आहात ..माहिती आहे ..याचा अर्थ तुम्ही या पुढे कविता लिहू नये असा थोडाच आहे ..चला ,तुम्ही पण कविता लिहा , चुकली तर चुकू द्या ..मी आहे ना..,मी शिकवीन तुम्हाला कविता, मग तर झालं ? 
तुमच्या कवितेला हसणार नाही, की तुम्हाला हसणार नाही,
अहो..प्रत्येक कवीला हे असे सहन करावेच लागते ..मी सुद्धा सुटलो नाहीये  या चक्रातून.

अरुणराव ..एक लक्षात असू द्या ..लेखन करा.ते कोणते ही असू द्या ..पण..त्यावर तुमची निष्ठा असू द्या ..मगच लेखन करा , तरच तुमचे लेखन "जान -दार " होईल ..सत्व असेल त्यात ..ते निर्जीव लेखन नसेल ...
मराठी इतकेच त्यांचे उर्दू वर प्रेम होते ,प्रभुत्व होते ..शेरो-शायरी आणि नजाकत "मी नेर्ह्मीच अनुभवलीय त्यांच्या बोलण्यातून .

श्रीकांत सदावर्ते यांचा  बराचसा लेखन काळ हा निझाम -कालीन मराठवाड्यातला , त्यानंतर मराठी-मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रात त्यांनी कथाकार -आणि कवी म्हणून विपुल लेखन केले .
श्रीकांत सदावर्ते मोठ्या ताकदीचे कथा लेखक होते ..याची प्रचीती त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींनी  वाचकांना आलेलीच आहे . एक कवी म्हणून त्यांनी विपुल कविता लेखन केले ..भाव कविता हा त्यांच्या कवितेचे आकर्षक असे रूप होते ,अनेक कवी- संमेलनातून त्यांच्या कवितांनी रसिकांना आनंद दिला आहे..

मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर प्रतिष्ठा परभणी ..या  महत्वाच्या साहित्य संस्थांनी साहित्यिक श्रीकांत सदावर्ते यांच्या साहित्य योगदानाची दखल घेतली .. झरी येथे संपन्न झालेल्या .परभणी जिल्हा साहित्य समेलन चे श्रीकांत सदावर्ते हे अध्यक्ष होते .. या संमेलनात कथा-कथन सत्राचे सूत्र संचलन माझ्या कडे होते - माझ्या आठवणी प्रमाणे - याच संमेलनात एक नवा कथाकार मराठवाड्याला लाभला ..त्या तरुण कथाकाराचे नाव- राजेंद्र गहाळ .

श्रीकांत सदावर्ते सारख्या -  सहृदय मार्गदर्शक आणि एका लिहित्या साहित्यिकाच्या सहवासाचा लाभ मला झाला हे माझ्ये भाग्यच.
 यांच्या प्रेरणेमुळे मी कविता लेखन सुरु केले ..आणि काव्य -रजनी मंडळाने वेळोवेळी मला कविता सादर  करण्याची संधी दिली .केवळ या बळावर .आज इंटरनेटवर मी एक परिचित कवी झालो आहे ..माझ्या कविता आणि बाल-कविता , चारोळ्या , हायकू रचना " असे विपुल काव्य लेखन ई-बुक स्वरूपात ओन-लाईन उपलब्ध आहे. , याचे श्रेय मी श्रीकांत सदावर्ते आणि कवी रजनी मंडळ यांना देईन.

श्रीकांत सदावर्ते यांना माझ्या बद्दल आपुलकी असण्याचे आणखी एक पारिवारिक -भावनिक कारण होते ..ते म्हणजे 
माझे सासरे प्रभाकरराव बसोले -हिंगोली , आणि श्रीकांत सदावर्ते हे नोकरीतले सहकारी-मित्र , या नात्यामुळे सदावर्ते सर माझ्याशी नेहमीच अतिशय आपलेपणाने बोलत असत ..त्यांची कौतुकभरी नजर , आणि शब्द माझ्यासाठी त्यांची शाबासकीची थाप असायची . माझ्या कथा लेखनाचे ते वाचक होते तसेच ते माझे टीकाकार होऊन , माझ्या लेखनात असलेले दोष मोठ्या प्रेमाने दर्शवून देत .."त्यांच्या या दिशा -दर्शनाचा मला माझ्या पुढील लेखन प्रवासात नेहमीच उपयोग होत आलेला आहे.

मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर प्रतिष्ठा परभणी ..या  महत्वाच्या साहित्य संस्थांनी साहित्यिक श्रीकांत सदावर्ते यांच्या साहित्य योगदानाची दखल घेतली .. झरी येथे संपन्न झालेल्या .परभणी जिल्हा साहित्य समेलनचे श्रीकांत सदावर्ते हे अध्यक्ष होते .. या संमेलनात कथा-कथन सत्राचे सूत्र संचलन माझ्या कडे होते - माझ्या आठवणी प्रमाणे - याच संमेलनात एक नवा कथाकार मराठवाड्याला लाभला ..त्या तरुण कथाकाराचे नाव- राजेंद्र गहाळ .

परभणीच्या साहित्यिक उपक्रमात श्रीकांत सदावर्ते यांची उपस्थिती नेहमीच प्रेरक असे. समवयस्क असो व माझ्या सारखे नवोदित ..सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधने हे त्यांच्या वागण्यातला मोठा विशेष गुण होता .सर्वाप्रती स्नेह " हे त्यांची शिकवण मला नेहमीच भावली. या लेखाच्या निमित्ताने या जेष्ठ साहित्यिक स्नेह्याचे हे स्मरण .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - 
लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ 
श्रीकांत सदावर्ते .
--------------------------------------------------
-अरुण वि.देशपांडे - पुणे.
९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment