Monday, May 14, 2018

आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २४ - लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ
------------------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार - परभणीच्या आठवणी लिहितांना खूप भारावून गेल्या सारखं होत असतं नेहमी , एखादा प्रसंग आठवतो , एखाद्या मित्राची आठवण होते , आणि मन पुन्हा त्या दिवसातला फेरफटका मारून येते .
आज जुन्या फायली पुन्हा एकदा संगतवार लावीत असतांना एक फायलीत मला माझे एम.ए. मराठी चे मार्क मेमो सापडले.आणि खूप छान आठवणी आठवल्या ..आज त्याच आठवणीचा हा आलेख तुमच्या साठी..
१९९८६ ते १९९६ या दरम्यान मी स्टेट बँके ऑफ हैद्राबाद च्या  नव्या मोंढा मध्ये  असलेल्या कृषी विकास शाखेत होतो .

मसाप परभणी शाखेच्या साहित्यिक उपक्रमामुळे , ग्रामीण कथा लेखक प्रा.आता (डॉ.) प्रभाकर हरकळ सर, तसेच प्रा.-कवी इंद्रजीत भालेराव सर, आणि सहर्द्य प्राध्यपक मित्र अशी ज्यांची ओळख आहे ते प्रा.अशोक खोत सर या सर्वांशी यांच्याशी माझे खूपच छान असे मैत्री -सूर जुळले होते . 
ज्ञानोपासक कोलेज नव्या मोंढ्यातील आमच्या बँके पासून तसे खूपच जवळ होते . प्रभाकर हरकळसर फावल्या वेळेत त्यांच्या स्कूटर वरून बँकेत येत ...त्यांची स्कूटर आली की .आमचा प्यून म्हणयचा ..साहेब ..तुमच्या या मित्राच्या स्कूटरचा नंबर एकच आहे. पहिल्यांदा हा योग पाहून खूप मजा वाटली.. बँकेचा फोन नंबर -२२९७  होता आणि हरकळ सरांच्या स्कूटरचा नंबर  MH-२२ - २२९७  असा होता . हरकळ सर येतांना दिसले की .कुणी तरी अगोदरच म्हणयचे .२२९७  चे सर आलेत बघा .

बँकिंग आणि कॉमर्स  विषयाचे प्राध्यापक असलेले हरकळसर बँकेत आले म्हणजे उपयुक्त संदर्भ आवर्जून माहिती करून घेत , नंतर बँकेच्या  समोर असलेल्या छोट्याश्या टपरीवर  (तेंव्हा )..धुम्रपान अधिक चहापान सेशन होत असे.

हरकळसरांचा लाभलेला सहवास साहित्यिक दृष्ट्या खूप काही देणारा असाच होता .  लेख्नाब्द्द्लची त्यांची  मत नेहमीच संयत आणि स्पष्ट असल्यामुळे साहित्य आणि लेखन याबद्दल एका अर्थाने गंभीर ऐकायला मिळत गेले " ते किती महत्वाचे आहे" हे आता समजले आणि हरकळसरा मधील जाणीवेच्या लेखकाचे दर्शन होते.
हरकल सरांनी साहित्यिक लेखन करीत असतांना शैक्षणिक ग्रंथ लेखन देखील दीर्घ काल केले . उद्योजक विकास संस्थे साठी एका वार्ता-पत्राचे   संपादन ते करीत असत 

एका  खूप छान ट्रीपची आठवण सांगतो-  मानवतला  प्रकाश मेदककरसर यांच्या मुलीचे लग्न होते , त्या लग्नाला साहित्य सम्मेलन वाटावे इतके लेखक-कवी आले होते ,  ही मंडळी येणार कारण मेदकसरांचा गोतावळा होताच खूप मोठा ,  परभणीहून अनेकजन मानवतला निघाले , अशा वेळी हरकळसर म्हणाले ..चला -अरुणराव .आपने गाडी पे जायंगे ..! 
आयडीया छानच होती ..मानवत अगदी जवळ असलेले गाव.. बँकेत रजा टाकणे वाचले . मेदककर सरांकडील कार्यास हजेरी लावून लगेच दुपारी वापीस ..असा प्लान ठरला .  २०-२५ वर्षापूर्वीचा उन्हाला आजच्या इतका भीषण नक्कीच नव्हता ..तरी त्या वर्षीच्या कडक उन्हात आम्ही मानवतला गेलो , लग्न समारंभ आणि साहित्यिक भेटी  दोन्ही खूप आनंद देणारे .प्रकाश मेदककर सरांनी केलेले आपलेपणाचे स्वागत ..हा प्रसंग मनात जशाचा तसा आहे.  त्या दिवशी दुपारी हरकळसरांना  कोलेजात ,आणि मला बँकेत येणे  आवश्यक होते 

 म्हणून लग्न घरच्या  मेजवानीचा आस्वाद  घेऊन आम्ही भरदुपारी तळपत्या उन्हात परभणीला परत निघालो , गप्पाच्या नादात ..उन्हाचे चटके बसत आहेत याचा आम्हाला विसर पडला होता , गाडी तापली म्हणून मध्येच एका ठिकाणी चहा साठी थांबून झाले .. .एरव्ही कमी आणि मोजकं बोलणारे हरकळसर नर्म -विनोदी पण बोलू शकतात याचा अनुभव मी मानवत -परभणी-मानवत या ट्रीप मध्ये घेतला ..आणि पुढे अनेक वेळा ,अनेक प्रसंगी घेतला आहे.

परभणीच्या त्यावेळच्या साहित्यिक मित्रांमध्ये कवी-मित्र बहुसंख्येने असायचे .अशा साहित्यिकात फक्त कथा लेखन करणारे  लेखक अशी ठळक ओळख हरकळसरांची होती . त्यांच्या ग्रामीण कथांनी समीक्षक आणि वाचक अशा दोघांची पसंतीची पावती मिळवलेली आहे . त्यांची नवी कादंबरी " पांगाडी " ,ग्रामीण साहित्यात लक्षवेधी ठरली आहे याचा मला खूप आनंद वाटतो.
अशीच एक आठवण - " जागतिक  कथा -शताब्दी वर्ष " होते त्या वर्षी . या निमित्ताने ..श्रीरामनगर मध्ये माझ्या घरी ..कथा लेखकांचा सहभाग असलेला एक विशेष कथा -चर्चा "असा कार्यक्रम झाला ..त्यात हरकळसरांनी कथे बद्दल खूप महत्वाचे विश्लेषक असे मनोगत व्यक्त केले होते.

एकदा हरकळसरांनी ज्ञानोपासक महाविद्यलयात .वाणिज्य विभगा तर्फे .बँक आणि कर्ज पुरवठा " या विषयावर चर्चा -सत्र आयोजित केले होते , या चर्चा सत्रात बँक -प्रतिनिधी " या स्वरूपात मी व्य्ख्यान दिले ",  माझ्या बँकेतील नोकरीत अगदी समर्पक वाटावा असा हा एकमेव योग हरकळसरां मुळे मी अनुभवला  आहे.

परभणीतील साहित्यिक उपक्रम असो ,मराठवाडा साहित्य संमेलन , परभणी जिल्हा साहित्य संमेलन .अशा सर्व उपक्रमात हरकळसर नेहमी सोबत असायचे ,एका अर्थाने त्यांच्या लेखकीय सोबतीची चांगलीच सवय झाली होती.
आता परभणी सोडून एक तप होते आहे ..पण परभणीत जे जे अनुभवले त्याला तोड नाही..
फेसबुक आणि इंटरनेटवर हरकळसर सक्रीय आहेत त्यामुळे अधून मधून भेट होते .

२०१५ -२०१६ मधली घटना .. चिरंजीवांनी फर्मान सोडले ..आपल्याला प्रत्येकाचे पासपोर्ट काढून रेडी ठेवायचे आहेत , त्या साठी शाळेचा किंवा कॉलेजचा टीसी आवश्यक आहे. माझी शाळा सुटून ५० वर्ष झालीत , शाळा हैदराबादची ,सरकारी हायस्कूल . तिथे आता मराठी मिडीयम अस्तित्वात तरी असेल की नाही ? 
मग अचानक आठवले ..आपण १९९५- १९९६ या वर्षात ज्ञानोपासक कोलेजात एम .ए .मराठी साठी विद्यार्थी म्हणून प्रवेस्च घेतला होता , या कोल्जेचा टीसी चालेल .

लगेच हरकळसरांना फोन लावला ..प्रोब्लेम  सांगितला ..आवश्यकता सांगितली ..सरांनी लगेच दुसरे दिवशी चौकशी करून पुन्हा फोन लावीत म्हटले ..या तुम्ही ..टीसी तयार असेल . तुमची सेल्फ सही आवश्यक आहे  म्हणून तुम्ही यायचे आहे.
मी ठरल्या प्रमाणे गेलो .दुपारच्या वेळी .सर वाटच पाहत होते , टीसी घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांचे सध्याचे नवे आणि मोठ्ठे घर पहिल्यांदाच पहिले , हरकळ सरांच्या मोठ्ठ्या मनाला शोभेल असेच हे घर आणि यातली माणसे आहेत , हे अगोदरही अनुभवले ,पुन्हा या नव्या घरात तेच अनुभवले .
सर, तुमच्या या मदतीने नव्या पिढीला एक उदाहरण देता आले की.. बघा पोरांनो ..अंतरीचा जिव्हाळा ..अंतरंगात सतत पाझरणारा जिवंत निर्मल झऱ्या अखंड वाहता असतो.".
प्रभाकर हरकळ सर - तुमच्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment