Monday, July 3, 2017

लेखमाला - हितगुज - ले- पथ हा चालतांना ..!

वाचक मित्र हो -
साप्ता.हितगुज अंकामध्ये दि.२० मे- २०१७ पासून दर शनिवारी -माझी लेखमाला - हितगुज "सुरु झाली आहे.
ही लेखमाला सुरु करून माझ्या लेखनास वाचकांच्या पर्यंत पोन्च्ण्याची संधी दिल्या बद्दल ..
संपादक -सौ.उज्वला शेट्ये  व संपादक टीम यांचे मन:पूर्वक आभार..
या लेखमालेतील पहिला लेख -आपल्या अभिप्रायार्थ
------------------------------------------------------------------------------------------------
लेख-१
लेखमाला -
"हितगुज "
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------


लेख-
पथ हा चालतांना ...!
-------------------------------------------------------------------
मित्रांनो, आपल्याला लाभलेले आयुष्य हाच एक प्रवास आहे..प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे  हा प्रवास करीत असतो,या प्रवसात अनेक पाउल -वाटा असतात ,काही पायवाटा असतात ,असतात  रुळलेले रस्ते ,,जे समोर येईल ते स्वीकारून पुढे चालायचे असते हे स्वीकारले की मग पथ कुठला चालणे  आहे ",हे महत्वाचे  नाही.तर आपल्या मनाच्या ठायी असलेला निर्धार महत्वाचा असतो.,स्वतःवर असणारा  विस्वास पथ-क्रमणेस बळ देत असतो.,मग ही मार्गक्रमणा किती खडतर असो..आपण ती पूर्णपणे करू शकतो .

आपली -पथ -यात्रा ,चालणे आपल्या हातात असते ,पण, चालतंना आपल्या मार्गातले रस्ते कसे लागावेत ?हे कुठे आपल्या हातात असते ...कारण ..
"कधी सरळ कधी फाकडा
 कधी तिरका कधी वाकडा
असा हा रस्ता असतो
,आपण सगळा प्रवास एकट्याने करायचा नसतो ,कुणी सोबती असला म्हणजे "काटेरी पथ "चालणे फुलांच्या पायघड्यावरून गेल्या सारखे वाटणारे होईल
 साथ सावली सोबत मिळता
 सुखकर झाला सारा रस्ता ...||
अशी साथ मिळाली तर..कितीही लांबची मजल गाठणे शक्य आहे .

आपल्या आयुष्य-प्रवसात अनेक चढ-उतार ,खांच-खळगे , भूल-भुलावे असतात , अशावेळी पथ-दर्शक लाभणे "यासारखी सुदैवी गोष्ट नाही.कारण मार्ग-दर्शवणारा तो मार्गदर्शक ",  "पथ -कसा आहे.."..त्यातील बारीक-सारीक धोके सांगणारा " तो पथ-दर्शक " ,अशा अनुभवी माणसांनी आयुष्य आणि त्यातील जगणे अनुभवलेले असते , म्हणूनच त्यांचे बोलणे ,त्यांचे सांगणे म्हणजे एक यथार्थ असा जीवनानुभव असतो.

पण असे ही म्हणतात की...ज्याचे डोळे उघडे असून तो पाहू शकत नाही, ज्याला कान आहेत पण त्यात सांगितलेले काही शिरत नाही ,तोंड आहे पण, तो चांगले बोलत नाही " अशा माणसाच्या आयुष्याची वाटचाल किती खडबडीत रस्त्यावरून होणारी असेल .. त्यासाठी आपण आपल्याला बदलायला हवे आहे.

याच्या उलट ,सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा जो असतो तो म्हणतो ..
"बस यही अपराध मै हर बार करता हुं
 आदमी हुं आदमीसे प्यार करता हुं...!
असे असणार्या माणसांना मदत करणार्या सोबत्यांची कधीच कमी पडणार नाही.

प्रवास सारेच करीत असतात ,यात तुम्ही आम्ही सगळेच सामील आहोत ".पथिक "म्हणून आपण हे पथ चालत असतो ..हा प्रवास करीत असतांना आपल्याला पुढचा मार्ग सांगणारे अनेक फलक असतात ..त्यावर अनेक सूचना असतात..आपण बहुसंख्य लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून पुढे जातात ,हे आपले वागणे किती बेजबाबदापणाचे आहे ", हे कळत  असूनही वळत नाही",हे फार वाईट आहे. पथ-दर्शिका समोर असून आपण त्याकडे लक्षच देत नाही ..मग, या सर्वांचा काय उपयोग ?यातून एकच गोष्ट होते..ती म्हणजे जीवनात असे काही अपघात घडून जातात की,नंतर पश्चाताप करून ही काही उपयोग नसतो  .

आपण सारेजण प्रवासी ..प्रचंड संख्येने आहोत..पण.आपल्याला योग्य ते मार्गदर्शक ,दिशादर्शक , पथ -दर्शक ..सहजासहजी मिळत नसतात ..अगदी दुर्मिळ असते यांचे असणे .आणि म्हणूनच यांचे आपल्या जीवनात असणारे महत्व ओळखता आले पाहिजे , आपण असे करू शकलो तर आपलाच जीवन प्रवास करतांना .आपण कधी भरकटणार नाहीत हे निश्चित .

आपले आयुष्य अनिश्चितपाणाचे असले तरी..आपण निश्चितपणे आपल्या इच्छित गोष्टी साध्य करू शकतो..हे किती छान आहे.
या साठी सकारात्मकता असलेले आपले स्नेहीजन ,गुरुजन ,हे आपले पथ-दर्शक ,मार्गदर्शक आहेत हे लक्षात असू द्यावे.आणि असे ही म्हणतात की .जीवनानुभव हे सुद्धा एक उत्तम मार्गदर्शक असतात ..आपल्यासाठी काय भले आणि काय बुरे ..हे अनुभाव्तून शिकत शिकत आपल्याला हा जीव्नपथ चालायचा असतो.

शेवटीं एकच ..
जीने का अगर अंदाज आये
तो कितनी हसीन है जिंदगी
मरने के लिये जीना है अगर
तो कुछ भी नही है जिंदगी ...!

आपण एक करावे ..माहिती असेल  तेच मार्ग-दर्शन करावे.. माहिती नसेल तर अंदाजे काही बाही सांगून दिशाभूल करणे "असे कधीच करू नये....!
------------------------------------------------------------------------------------------
लेख- पथ हा चालतांना ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment