Sunday, July 16, 2017

म.टा- पुणे टाईम्स मध्ये प्रकाशित लेख - आम्ही अचानक भेटलो आणि ...!

पुणे टाईम्स मध्ये - प्रकाशित लेख
आम्ही अचानक भेटलो आणि ...
--------------------------------------------------------
१९६५ सालातील -- हैद्राबाद मधील --काचीगुडातील सरकारी हायस्कूलमधील -हैद्राबाद - मराठी माध्यमाच्या १० वी - ड "च्या वर्गातील आणि ११ वीच्या (एच.एस.सी )वर्गातील विद्यार्थी ..आता २०१७ साली कुठे असतील ..? याची कल्पना देता येणं अवघड आहे. ..पण.आमच्या त्यावर्षीच्या या वर्गातील आम्ही सात जण- २०१२ साली - ४५ वर्षानंतर अचानकपणे पुन्हा संपर्कात आलोत ..आणि बालगंधर्व नाट्यगृह परिसरात ..एकमेकांच्या समोर उभे राहिलोत ..आणि २०१२ पासून आम्ही पुण्यातल्या विविध भागात असूनही - २-४-महिन्यांनी भेटून दिवसभर जुन्या आठवणीत रमतो
आमच्या पैकी तिघे डिफेन्स -मध्ये -अकौंटं- विभागात कार्यरत होते ,आणि अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले.
रवी जोशी -,प्रदीप तुंगार, ,आणि हरीश काशिकर, पद्माकर धाट- , अशोक दळवी सुभाष काळे- आणि मी असे आम्ही सात मित्र .
.हैद्राबाद सोडल्यावर सुद्धा सुभाष काळे आणि मी -कायम संपर्कात होतो .सोबत होतो .त्याचे कारण- आम्ही दोघे ही स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीस होतो .२०१२ मध्ये -मुलुंड-मुंबई- ब्रांच-मनेजर असतांना सुभाष काळे निवृत्त झाला .मी २००६ मध्येच स्वेच्छा -निवृत्ती घेऊन परभणीहून पुण्यात आलो .
आता आमच्यापैकी कुणाला भेटीची इच्छा झाली -की , त्यादिवशी फोनाफोनी होते .लगेच -दुपारच्या निवांत वेळी आम्ही सारे "...
फर्ग्युसन कॉलेजरस्त्यावरील . " गुडलक -मध्ये जमतो . मग काय ...आमची हैद्राबादी मैफल जमते ..
शाळेच्या दिवसात .काचीगुडा परिसरात अनेक इराणी हॉटेल होती. ..बन-मस्का ,आणि सोबत हैद्राबाद्दी चहा -कटिंग .ज्याला .तिकडे चाय -पवना " म्हणत असत . मनात रेंगाळणारी , " ती चव अजून पुन्हा एकदा ", पुण्यात गुडलक मध्ये बसून अनुभवणे अतिशय आनंदाचं असतं
हिंदी फिल्म्स आणि त्यातील गाणी हा आमचा सर्वांचा आवडीचा विषय आहे - त्यामुळे मनाने आम्ही अजून ही हैदराबादच्या आमच्या लाडक्या थियेटर मध्ये असतो- दिलशाद ,रॉयल ,अशोक ,नवरंग ,बसंत , प्रभात , लिबर्टी ,जमरुद मेहल ,प्यालेस..या आणि अशा अनेक थियेटर ची नावं मनात रुंजी घालतात ..आणि ती वर्ष .हिंदी सिने -संगीताचा सुवर्णकाळ होता.
आता आम्ही मित्र ६५ -६७ या वर्षांच्या वयोगटात आहोत. कौटुंबिक जीवनात .आजोबा-आजीच्या भूमिकेत रमून गेलो आहोत ..कर्तबगार-मुलांच्या -लेकी-सुनांच्या संसारात लुडबुड न करता त्याना सोबत करत .निवृतीच जगणं आनंदाने जगत आहोत ..हा आमच्या मैत्री-जीवनातील आनंदाचा समान धागा आहे..
नुकतेच आम्ही काही मित्र सुभाषच्या घरी म्हणजे -डहाणूकर कॉलोनीत जमलो होतो ..मस्त गप्पा झाल्या .आमच्या मैत्रीबद्दल मला कायमच असं वाटतं की.- ये दोस्ताना .कभी ना होगा पुराना .
----------------------------------------------------------
लेख- आम्ही अचानक भेटलो आणि ....
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------
(फोटोतील मित्र- डावीकडून ... पद्माकर धाट , अरुण वि.देशपांडे , सुभाष काळे , हरीश काशीकर )
Comment

No comments:

Post a Comment