Tuesday, July 11, 2017

लेख- दशकपुर्ती निवृत्त जीवनाची ..

साप्ता.पथदर्शन मध्ये प्रकाशित लेख..

लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची
---------------------------------------------------
निवृत्ती "एक वृत्ती असते असे म्हटलेले सहजतेने पटेलच असे नाही., मित्र हो- निवृत्ती  नंतरचे जीवन मी माझ्या मते -अगदी आनंदात,सुखात आणि समाधानी मनो- अवस्थेत  घालवतो आहे , मला सेवा-निवृत्त  होऊन थोडेथोडके नाही तर तब्बल ११ वर्षा झालेली आहेत ..थोडक्यात निवृत्तीची दशकपूर्ती माझ्या खात्यात जमा झालेली आहे.या दशक-पूर्तीचे अनुभव मी आवर्जून तुमच्याशी शेअर करतो आहे.

 मी बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालो ते वर्ष होते २००६ ..आणि मी व्हीआरेस घेतले ..कोणतीही आर्थिक-लाभ योजना नसतांना . मनाची इच्छा झाली आणि मी एका अर्थाने स्वेच्छा-निवृत्ती घेतली. मुलीचे लग्न झाले , मुलाचे लग्न झाले , लौकिक अर्थाने जबाबदारीतून मी मुक्त झालो होतो ,.

नोकरी निमित्ताने मुलांचे वास्तव्य आता  नेहमी  साठी पुण्यातच असणार हे निश्चित होते .
.आमच्या पारिवारिक चर्चेत असा ही एक मुद्दा होता की - रिटायर झाल्यावर  तुम्ही दोघांनी गावाकडे राहण्याचा उगीचच हट्ट करू नये .आणि इथेच पुण्याला शिफ्ट व्हावे ,
तुम्ही इथ आलात म्हणजे .सगळे सण-वार, कुलाचार ,आणि सगळा घरगुती उपक्रम इथे व्यवस्थित होतील असे नाही केले  तर ..या पुढे प्रत्येक लहान सणआणि उत्सव - ,समारंभ  यासाठी आम्ही तिकडे यावे असे तुम्हाला वाटत रहाणार ,आणि या साठी म्हणून दरवेळी सुट्टी काढून येणे आम्हाला बिलकुल शक्य होणार नाही
दरवेळी , १२-१५ तासांचा प्रवास करणे , या  प्रवासा साठीचा खर्च होणार तो वेगळाच .या सर्व गोष्टीने सर्वांनाच शारीरिक आणि मानसिक त्याच बरोबर आर्थिक बाबीचा ताण हा येणार ,हे सर्व टाळणे आपल्या हिताचे असेल.

मुलांचे सांगणे आम्हा दोघांनही पटले आणि त्यावर्षातले सगळे सण गावाकडे साजरे करून .डिसेम्बर -२००६ ला सगळे सामान-सुमान घेऊन .. पुण्यास कायमचे रहाण्यास आलो. तुम्हाला खरेच सांगतो .या एका निर्णयाने  .आमच्या .सगळ्यांच्या मनावरचा एक मोठा ताण नाहीस झाला
 

गेल्या दहा-अकरा वर्षात .लहान-मोठे सगळे सण-आणि-समारंभ आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे साजरे केले आहेत..
एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून मी माझ्यापुरते ..आपण सगळ्यांशी कसे वागायचे ? याबद्दल थोडे फार ठरवले होते ..त्याप्रमाणे गेली दहा -अकरा वर्ष झालीत  या फार्मुल्या प्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो..यापुढे ही हे प्रयत्न चालूच रहातील.
निवृत्ती नंतर घरातल्या गोष्टींचे निर्णय घेण्याची जबाबदारी " कर्ता-पुरुष म्हणून-मुलावर  सोपवली आहे.
   त्याच्या बरोबरीने सुनबाई या कामात लक्ष घालते ..मार्गदर्शनासाठी जेष्ठाच्या भूमिकेत माझी पत्नी मुलांच्या सोबत प्रत्येक निर्णय-प्रक्रियेत असते. तिच्या अनुभवाचा फायदा या तरुण जोडप्याला निश्चित होत असतो. नंतर , मी काय आणि कसे ठरले ?या बाबतचे अपडेट्स घेत असतो..

या पुढे मुलांनी घरातले बदल कसे करायचे ,, हे मला विचारात घेऊनच केले पाहिजे असे नाही ,फक्त करण्या अगोदर सांगत जावे-कल्पना देत जावे ..म्हणजे या बद्दल कमी-जास्त, चांगले वाईट "काय असेल हे सांगता येते.
सगळ्या गोष्टी मी सांगेल तशा पद्धतीने झाल्या पाहिजेत , मी जसे ठरवलेल्या  वेळेत सगळ्या गोष्टी करीत असे ,अगदी तसेच टाईम-टेबल यापढे पाळला गेला पाहिजे " हा हट्ट मी करीत नाही ,कधी तसा  आग्रह सुद्धा करायचा  नाही असे ठरवले आहे ..त्या प्रमाणे वागण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत असतो...

माझ्या कारकिर्दीत मी काय काय "तीर मारले " याचे सुरस कहाण्या ऐकवणे टाळावे असे माझे मत.,त्याऐवजी आता धडपड करणार्या कार्यरत पिढीचे कौतुक करणे ,त्यांना प्रोत्साहन देणे "हे मी आवर्जून करीत असतो.
मी,माझे ,मुझे गिनो ", इतरांना त्रासदायक वाटणारे असे माझे वागणे नाहीये ना ? हे मी स्वतःला तपासून घेत असतो..आपल्यामुळे इतरांच्या दैनदिन जीवनात -वेळा-पत्रकात बदल नाही झाला पाहिजे " असा मी आटोकाट प्रयत्न करीत असतो.
आपल्या आवडीचे छंद - साहित्य -संगीत -कला .मनापासून जोपासावेत .. ताण-तणाव या पासून मुक्त राहू शकतो.

वयपरत्वे .शारीरिक आजार तर होणारच ..ते आटोक्यात राहवेत यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन मनापासून करावे ..तरच आपले जगणे सुसह्य होते आणि आपल्याला होणार्या त्रासाचा घरातील इतरांना त्रास होणार नाही .हे महत्वाचे लक्षात असणे गरजेचे आहे.
मित्र हो .मी  एक सामन्य व्यक्ती आहे.,वयपरत्वे काही अनुभव नक्कीच आलेले आहेत ,त्यातून जे काही सुचले त्या प्रमाणे जगतो आहे .अगदी आनंदाने -समाधानाने हे मात्र नक्की.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment