Wednesday, July 12, 2017

लेखमाला -हितगुज - लेख- जिद्द -कठोर -परिश्रम ..वगेरे ..

साप्ता-पथदर्शन अंकात प्रकाशित लेख-( मे- २०१७ )



लेखमाला - हितगुज
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
-------------------------------------------------------------------
मित्र हो- नमस्कार..
तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे आहोत ,साधे सरळ असे जगणे आपल्या वाट्याला आलेले  असते, ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट-गाडगे अगदी सामन्या -पणे चालू असते ,अशा परिस्थतीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते ,कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात ,
असे खुपजण असतात की त्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात ,  मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे  निखारे धगधगत असतात . अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या जाणत्या आणि जबादार अशा मार्गदर्शकाची.

आपल्याकडे खुपजण असे आहेत की ..त्यांच्या मनात स्वप्नवत कल्पना असतात ..पण..त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात ",हे त्यांच्या गावी नसते ..सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते.
आता तुम्हीच सांगा.."दे रे हरी पलंगावरी "..असे वागून काही मिळवता येईल का.
जो मेहनत करतो ..आणि अशी मेहनत करतांना अपयश आले तरी .त्याने अजिबात खचून न जाता ..नव्या दमाने ,नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होई पर्यंत परिश्रमात कमी पडत नाही.." त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फल मिळणारच .

मनात जिद्द " नसेल तर .मिळणारे यश सतत हुलकावणी देत असते .कारण..कार्यपूर्ती साठीची वाट पहाणे , त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे , या अधीर -वृत्तीमुळे कित्येकजण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात ..अशावेळी धीर देणारे , खचून  गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर ..कार्य होणे तर दूरच .ते पूर्णपणे भरकटून ..भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते.

जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्य सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते ..या साठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते ,त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना !  इतकेच असून चालणार नाही ..स्वतःच्या कार्यक्षमतेवर विस्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमीच जाणल्या पाहिजे.
शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे ..यात हाती निराशा  लागण्याची शक्यता अधिक असते.

मोठी स्वप्ने जरूर पहावीत ..पण ती सत्यात येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची ,परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे , या ठिकाणी फक्त "स्वप्नाळू -वृत्ती "असून काही उपयोगाचे नाही..तर.. मनाच्या ठायी जिद्द असावी लागते, परिस्थती अनुकूल असो वा प्रतिकूल असो ..यातून मार्ग काढणारा तो खर्या अर्थाने "बाजीगर "असतो, त्याची ओळख "मुकद्दर का सिकंदर "अशी आपोआपच होते.
मनगटाच्या बळावर काय काय करता येते "हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जांबाज " आपल्या अवतीभवती असतात . अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या "आपल्या साठी अचूक अशा मार्गदर्शक असतात.
जीवनात यशस्वी असणार्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो..परिश्रमाला पर्याय नाही.
------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ....
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment