लेखमाला -आठवणीतील गाव -परभणी -
लेख- १४ वा -
आठवणी - एसबीएच - कृषी विद्यापीठ शाखा -
------------------------------ ------------------------------ -------------
परभणीत १९८६ साली आल्यावर ..पहिल्यांदा मी काम केले ते नव्या मोंढ्यातील - कृषी विकास शाखेत ..या शाखेत मी १९८६ ते १९९६ असे सलग दहा वर्ष होतो .. नंतर मला स्पेशल असिस्टंट- विशेष सहायक ..या पोस्टवर बढती मिळाली आणि माझी बदली त्यावेळच्या "मराठवाडा कृषी विद्यापीठ - परिसरात असलेल्या हैद्राबाद बँकेच्या - एमकेव्ही- ब्रांच,म्हणजेच कृषी विद्यापीठ शाखेत झाली..
अगोदरच्या एडीबी या शाखेत शेतकरी आणि शेती संबंधितकर्ज हे प्रमुख स्वरूपाचे .कामकाज होते...पंचक्रोशीतील गावे आणि तेथील शेतकरी यांच्या पुरते मर्यादित बँकेचे कामकाज होते ..एक अर्थाने बँकेचे हे कस्टमर हे साधे आणि ग्रामीण परिसरातील होते .
माझ्यासाठी ही नवी शाखा - म्हणजेच कृषी विद्यापीठ शाखा .सर्वार्थाने वेगळी होती .. इथे कृषी विषयक शैक्षणिक पातळीवर चालणारे कार्य होते ..आणि विद्यापीठ यंत्रणेच्या सर्व आर्थिक व्यवहार पूर्ततेसाठी हैद्राबाद बँकेची ही विशेष अशी अतिशय महत्वाची कार्यरत शाखा आहे " हे या शाखेत आल्यावरच मला समजण्यास सुरुवात झाली.
, प्राध्यापक , विद्यापीठाच्या विविध कार्यालय आणि विभाग यात असलेले सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी ..असे सगळे सुशिक्षित आणि उच्च-शिक्षित -कस्टमर ..माझ्या साठी नवीन होते .
शिक्षणासाठी देशातील विविध प्रांतातून आलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी हे देखील बँकेत येणारे आमचे कस्टमर असायचे.
पहिले पाच-सहा वर्ष मी प्रामुख्याने काम केले ते ..विस्तारित सेवा कक्ष - Extension Counter - ईसी काउंटर- या नावाने ओळखले जात असे. अग्रीकल्चर -कोलेजच्या इमारतीत ..आमच्या बँकेचे हे ईसी काउंटर होते.
एक कॅशियर, एक पासिंग ऑफिसर आणि एक क्लार्क , एक प्यून .असा चार जणांचा स्टाफ ..
यात मी सर्वात जास्त काम केले ते माझे सहकारी मित्र .श्री.श्यामसुंदर वैद्य , श्री.सुभाष काळे , श्री.रामकृष्ण वाघमारे यांचे बरोबर . यातील श्री.वैद्य आणि वाघमारे ही जोडी या ईसी काउंटर ला खूप जुनी होती आणि त्यांना त्यावेळच्या बहुतेक सगळ्या कस्टमर लोकांची नावं आणि खाते नंबर तोंडपाठ होती ..अनेक प्राध्यापक , विभाग-प्रमुख , सिनियर सर मंडळी ..ईसी काउंटरच्या आत आल्या बरोबर हे वैद्य साहेब त्यांचे अगदी आपुलकीने स्वागत करीत .आणि त्यांच्या चेकचे पैसे त्वरित देत..
आमचे हे दोन सहकारी मित्र -रामृष्ण वाघमारे आणि शामसुंदर वैद्य - विद्यापीठा-स्टाफ च्या पगार द्यायच्या आठवड्यात कितीही वर्क लोड असू द्या .बिलकुल न डगमगता .कामाचा फडशा पाडीत , त्यांचे कार्यकौशल्य अनुकरण करावे असेच होते . मी माझ्या या मित्रांचे नावं .शामसुंदर वैद्य -गोडबोले "असेच ठेवले होते , केवळ या स्वभावाच्या भांडवलावर वैद्य ईसी काउंटरला अनेक वर्ष होते .
घरून बँकेत येतांना .आणि बँकेतून घरी जातांना .विद्यापीठातील कुणी ही परिचित कस्टमर वैद्य साहेबंना त्यांच्या घर पर्यंत आनंदाने सोडीत असे.त्यामुळे या परिसरात शाम्सुन्देर वैद्य यांना स्वतःची गाडी चालवत येण्याचा योग काही आला नाही.
महिन्याच्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी विद्यापीठाला सुट्टी असे ..हे दोन शनिवारी . ईसी काउंटर ला एकदम शांतता असे. कॉलेजमध्ये.कुणीच नसे ..मागच्या बाजूस असलेल्या आमच्या ईसी काउंटर मध्ये असलेल्या आम्हा चार स्टाफच्या बोलण्याचा आवाज सुद्धा त्या शांततेत खुप मोठा वाटत असे.
श्री शाम्सुन्देर वैद्य यांची औरंगाबादला बदली झाली , त्यांच्या जागी आलेले श्री .सुनील देशपांडे हे तसे लोकल परभणीचे रहिवासी असलेले मित्र , यांचा खूप मोठा मित्र-परिवार विद्यापीठ परिसरात होता. त्यामुळे माझे परिचय क्षेत्र मोठे होण्यास सुनील देशपांडे यांचे मोठेच योगदान होते.
सुनील देशपांडे यांचे पिताश्री ..ती.एन जी देशपांडे -(महातपुरीकर ) हे एनजी -सर "या नावाने सर्वपरिचित असणारे व्यक्तिमत्व होते , एनजी सर ..आलेत हे त्यांच्या ऐकू येणाऱ्या आवाजाने कळत असे.
याच ईसी काउंटरला माझे सहकारी -अधिकारी म्हणून माझे कवी -मित्र -श्री तुकाराम खिल्लारे यांचा सहवास लाभला , या सहवासात ..एक कवी आणि त्याचा कविता प्रवास मी खूप जवळून अनुभवला ..आज श्री.तुकाराम खिलारे कविता क्षेत्रातील एक प्रसिध्द आणि मोठे नावं आहे.
हे ईसी काउंटर ज्या बिल्डींग मध्ये होते त्याच बिल्डींग मध्ये ..विद्यापीठातील डॉ.रावसाहेब चोले यांचे ऑफिस होते , चोले सर एक अत्यंत प्रतिभावंत असे कवी म्हणून प्रसिध्द होते , त्यांना वेळ असेल तेंव्हा ..आमच्या अनेक वेळा साहित्यिक संवाद -भेटी होत असत . त्यांच्या केबिन मध्ये ..नामवंत चित्रकार -कवी -सूर्यभान नागभिडे , आणि हिंदीचे प्राध्यापक आणि कवी - डॉ.मनोहर नलावडे सर ,यांची भेट होत असे .
ईसी काउंटर चे काम आटोपून इथे काम करणाऱ्या आम्हाला पुन्हा होम सायन्स कोलेजच्या समोर असलेल्या आमच्या ब्रांच ऑफिसला यावे लागे .कारण रोजच्या कामकाजात ईसी काउंटर चे व्यवहार हिशेबात धरून मगच दैनंदिन कामाचा ताळमेळ -हिशेब पूर्ण होत असे.
या शाखेतील सर्व स्टाफ स्पीड-वर्क करणारा असा अतिशय कुशल श्रेणीतील होता..कारण विद्यापीठ शाखेत वेळा आणि वेळापत्रक अतिशय चोखपणाने पार पडायची मोठीच जबाबदारी असे.
सुरुवातीला इथे प्रमुख-रोखपाल - हेड- कॅशियर म्हणून श्री.अरविंद गिरगावकर ,तसेच श्री.दिलीप वैद्य ..या सिनियर स्टाफचा सहवास लाभला .
श्री.नरेंद्र -एन.एस.कुलकर्णी , अविनाश मैराळ , जी.टी.कुलकर्णी , एम.एन.अन्त्वाल , महम्मद अफजल साहेब , अब्दुल हादी, अशी काही नावं अजून आठवणीत आहेत.
सर्वश्री -.भगवान पाडळकर ,बालमुकुंद पुरोहित , टी.एन.चौलवार , सुभाष येवलेकर ,हे मला लाभलेले Branch Manager .
विद्यापीठातील मोठ मोठे अधिकारी , जेष्ठ प्राध्यापक , आणि अनेक विभगातील कर्मचारी या सर्वांशी अनेकवेळा गप्पा आणि बोलणे होण्याचे छान प्रसंग आले .
शहरापासून दूर असलेला विद्यापीठ परिसार आणि आमची बँक ..आणि त्या दिवसांच्या आठवणी आज १५ वर्षानंतर ही,तिथल्या वातावरणा सारख्या फ्रेश आहेत.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
लेखमाला -आठवणीतील गाव -परभणी -
लेख- १४ वा -
आठवणी - एसबीएच - कृषी विद्यापीठ शाखा -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------
No comments:
Post a Comment