लेखमाला -
आठवणीतलं गाव-परभणी -
लेख-१५ वा - श्रीराम नगर ",कारेगाव रोड
------------------------------ ------------------------------ -----
नमस्कार , मित्र हो ,
नोकरी आणि घर ..दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्याला स्थिरता देणाऱ्या असतात , आताची पिढी जी 65 + किंवा या पेक्षा अधिक वयोगटातील आहे , तुम्ही -आम्ही आणि मी सुद्धा -प्रतिनिधी असलेल्या पिढीचे आयुष्य तसे एका आखीव मार्गावरूनच गेलेले आहे ,
जसे- शिक्षण , नोकरी , नोकरी लागली की पारिवारिक जबाबदाऱ्या "न सांगता स्वीकारून त्यांना निभावणे ", आणि हे करीत असतांना स्वतःचा संसार त्यातील जबाबदारी पार पाडण्यात मानसिक शक्ती आणि आर्थिक शक्ती यांचा मेळ साधून सगळं व्यवस्थित निभावणे ..यातच आयुष्याच्ची महत्वाची वर्षे कधी आणि कशी निसटून गेली..हे कळायचे नाही.
मित्रांनो , हा अनुभव कमी-अधिक प्रमाणात सर्वांनी घेतलेला आहे.त्यामुळे स्वतःचे एक छान घर असावे ही स्वप्नवत कल्पना प्रत्यक्ष रुपात येणे " ही मोठी कठीण गोष्ट होती. त्याकाळात नेमक्या या गोष्टीसाठी आम्ही बँकेतले लोक खरेच खूप नशीबवान होतो असे म्हणावे लागेल .. " घर होण्यासाठी जे कर्ज लागयचे ते ..सामन्य लोकांसाठी सोपी गोष्ट नव्हती ..पण, आम्हा बँक कर्मचार्यांना घरासाठीचे कर्ज होणे ..म्हणजे "अपने घर की तो बात थी ".
ज्यंनी नोकरीतली ५ वर्षे पूर्ण केली त्यांना हौसिंग लोन "मिळणार .अशा अटीचा समावेश असलेले परिपत्रक हेड ऑफिस जारी झाले ..आणि परभणीला आणखी एक बँक कॉलोनी आकारास आली पाहिजे " या मुद्द्य्यावर सहमती झाली ...
वसमत रोड वर असलेल्या रामकृष्ण नगर -बँक कॉलोनी नंतर ....त्यावेळी कारेगाव रोड या तशा न गजबजलेल्या परिसरात ..८० च्या दशकात .. साधारणपणे १९८५ नंतर ..पाण्याच्या टाकी जवळ .. आमची नवी कॉलोनी उभारण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता ..आमचे श्रीरामनगर गजबजून गेले . ही "श्रीराम नगर -बँक कॉलोनी "अशी आरंभीची ओळख .काही दिवसच होती ..जरी आम्ही सर्व रहिवाशी बँक कर्मचारी होतो , तरी .त्यातील बँक कॉलोनी हा शब्द प्रयोग ,सवयीने " न करण्याचे ठरवले " आणि आमची ही कॉलोनी आता "श्री राम नगर " या नावाने सर्व परिचित झाली आहे.
मी परभणीत १९८६ ला आलो ..आणि राहिलो रामकृष्णनगर बँककॉलोनीत असलेल्या वडिलांच्या "पंचदीप" या बंगल्यात , इकडे श्रीराम नगर मधले सहकारी स्नेहीजन ..मला ..माझे घर लौकर सुरु करा आणि स्वतःच्या घरात राहायला या " असा आग्रह करीत .यात त्यांनी आपलेपणाने केलेली दटावणी जास्त असायची .सगळी सोंगे आणता येतात पण "पैश्याचे सोंग आंत येत नसते " जीवनातील एक महत्वाचे सत्य नाकारण्यात काहीच आर्थ नाही ..हे आता इतक्या वर्षांच्या आयुष्य-प्रवासातून शिकण्यास मिळाले आहे.
हे लक्षात घेता ..घर बांधणे , , त्या साठी लोन घेणे " हे पुढे पुढे ढकलण्यात मी माझे दिवस ढकलत असे , पण, असे जास्त दिवस करणे जमणार नाहीये " हे ओळखून .श्रीरामनगर मधील माझे मित्र -गजानन उर्फ गजाभाऊ देशमुख यांना विनंती केली की.. तुम्हीच हे प्रोज्केत पूर्ण करण्यात मदत करा . गजाभाऊ मला नाही म्हणू शकत नव्हते , आणि त्यांना माझ्या स्वभावाची चांगलीच जाण होती ",माझी स्लो -स्पीड लक्षात घेत , त्यांनी माझे पालक-मंत्री " होण्याचे मान्य केले .आणि या पुढे आम्ही बोलवू तेंव्हा श्रीरामनगर मध्ये होणारे पारिवारिक समारंभात सामील होत जा " असा हुकुम फर्मावला ,त्या प्रमाणे वागण्याचे मैत्रीपूर्ण बंधन आमच्यावर होते.
अशा रीतीने रामकृष्ण नगर -वसमत रोड ते - श्रीराम नगर -कारेगाव्रोड " अशा दोन्ही नगरात आमचे येणे-जाणे सुरु झाले .. श्रीराम नगर मधील सर्वांची घरे बांधून पूर्ण झालेली होती , फक्त मी तेव्हढा राहिली होतो ..या कॉलोनीत रहाणे सहकारी मित्र - परभणी सिटी मध्ये असलेल्या हैद्राबाद बँकेच्या चार शाखेत काम करणारे कर्मचारी होते .
परभणी मेन ऑफिस , एडीबी , नानलपेठ आणि एम के व्ही " या चार शाखेत श्रीरामनगर मधील रहिवासी .- ऑफिसर , हेड- क्याशियार , स्पेशल -असिस्टंट, , आणि काशियार -कम -क्लार्क अशा पोस्टवर , विशेष आणि अभिमानास्पद असे सांगायचे झाले तर - श्रीराम नगर मधील हे मित्र आपापल्या शाखे मध्ये अतिशय कुशल कर्मचारी तर होतेच ,प्रभावशाली व्यक्ती देखील होते ..त्यामुळे .लोकल शाखेतील स्टाफ मध्ये श्रीराम नगर मधील स्टाफचा खूप मोठा असा कार्य्प्रभाव होता.ज्याला "वरचष्मा " असेच म्हणता येईल.
त्या काळात - परभणी मेन ऑफिस चे हेड क्याशियार म्हणजे - श्री.गिरगावकर " हे चित्र सर्वांच्या मनात कायम असायचे .सुंदर अक्षरात शांतपणे , काही न बोलता , अजिबात न हासता ,आणि नियमांचे पालन करायला लावणारे श्री.रापतवार , हेड-क्लर्क "आणि स्पेशल -असिस्टंट " कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे श्री.गजाभाऊ देशमुख , सर्वांच्या काळजीने स्वतहा शीड-शिडीत असलेले योग पारंगत ,आणि कोलोनीच्या बागांचे निसर्ग - रक्षक श्री.गीरीबबा ,
, लष्करी व्यक्ती वाटणारे रुबादार आणि कर्तव्य-कठोर " असे लेबल ज्यांच्या चेहेर्यावर असते ..पण मनात काही नसणारे प्रेमळ असे कर्नल -रोड्रिग्ज - म्हणजेच श्री.प्रभाकर पाठक , एक नंबर कुशल - अविनाश मैराळ , श्रीकांत जपे , सोमाणी बंधू , वाईकर काका , जी.टी.कुलकर्णी , रामढवे, आणि इतर ,
ही नावे आणि ते कार्यरत असलेल्या त्यांचा शाखा आज ही आठवून पहा ..या मित्रांच्या कार्य-कुशलतेच्या गोष्टी आवर्जून ऐकण्यास मिळतील.
विमानातून जर फोटो काढला तर आमच्या श्रीराम नगर मधील मित्रांच्या घरांच्या नकाशा इंग्रजी अक्षर " ई- E ",
असा दिसेतो .. या - " E" " या चित्रातली मोठी उभी रेषा म्हणजे -प्रवेश करतांना लागणारे चार घरे.. यातील ..पहिले - अविनाश मैराळ , दुसरे - "राजस "- अगोदर - हे घर राजू- बी.के. संगारेद्दीकार यांचे होते ..आता श्री.चौधरी यांचे घर आहे.
या दोन घरांच्या समोर ..श्रीराम नगरचे मुख्यालय -आणि .मुखिया - असलेले श्री.अरविंद गिरगावकर यांचे निवास्थान आहे . इथे हर दिनी -मित्र-दरबार भरतो त्यांच्या बाजूला ..श्रीरामनगर मधील महत्वाचे व्यक्तिमत्व -प्रभाकर पाठक चे घर .....आहे.
मित्रांनो, आताचे ..श्रीरामनगर नव्या पिढीच्या वास्तव्याने गजबजून गेले आहे. आम्हा सर्व मित्रांचे निवृत्ती -पर्व सुरु झालेले आहे, "आजी-आणि आबा " या भूमिकेत आनंदाने आहोत , नोकरीच्या निमित्ताने आमची मुले -बाळे ज्या ठिकाणी आहेत , त्या ठिकाणी .."मुलांच्या अडचणीच्या वेळी आधार म्हणून जाणे " हा एक कलमी कार्यक्रम बहुतेक सर्वांचा आसतो ,
१९८५ ते हैद्राबाद बँक इतिहास जमा होई पर्यंत -२०१७ ..अशी तीन दशकांचा काल ..म्हणजे ..श्रीराम नगर या पारिवारिक विजय नगराचा वैभवशाली इतिहास आहे ..या सुवर्ण पानावर किती तरी आठवणी आहेत , प्रसंग आहे , याच श्रीराम नगर मध्ये आम्ही स्थिरावलो , आमच्या मुलांची पिढी घडली , हा प्रवास खूप रोचक आहे,,भावनिक आहे , एकाच लेखात हे मावणारे नाहीये ,
श्रीरामनगर मध्ये मी कसा आलो..आणि माझे घर ..कसे झाले ..हे पुढच्या लेखात.....
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
लेखमाला -
आठवणीतलं गाव-परभणी -
लेख-१५ वा - श्रीराम नगर ",कारेगाव रोड ,
- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342
------------------------------ ------------------------------ -----
No comments:
Post a Comment