Tuesday, January 15, 2013

कविता - खंत ना त्याची - खेद कशाचा नाही ..!

कविता - खंत ना आता त्याची- खेद कशाचा  नाही ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे
-----------------------------------------------------------------------
डाव झाला खेळून , मज थांबणे आता  आहे
खंत ना आता त्याची - खेद कशाचा  नाही  ।।
जमीन पायाखालची  तीच होती , तीच आहे 
निळेशार आकाश ही तेच होते ,  तेच आहे
डाव झाला खेळून , मज थांबणे आता आहे
खंत ना आता त्याची  - खेद कशाचा नाही ...।
दिवस  उमेदीची होते माझे  तेव्न्हा
संकटांना  झेलून घेतले  -कमी पडलो नाही
लोक आले सोबती माझ्या  ,काही आले नाही
खंत  ना आता त्याची -खेद कशाचा  नाही ....!
स्वप्ने पाहिली तेव्न्हा  मनापासुनी
सत्यात आले काही - काही  आले नाही
नशिबात होते  मिळाले ,बाकी आपले नाही
खंत  ना आता  त्याची - खेद कशाचा  नाही ....!
लोक भेटले मजला जे -जे  चतुर सारे होते
 मीपण  माझे"- एक खेळणे त्यांना होते
 निरोपयोगी  ठरता त्यानी सोडूनी मज दिले
खंत ना आता  त्याची - खेद कशाचा नाही....!
मित्र आणि सोबती  पुन्हा पुन्हा आठवती
सोबती त्यातले  काही, कायमचे निघून घेले
ते सुख-दु:खांचे  क्षणही कधी विसरत नाही
खंत ना  आता  त्याची - खेद कशाचा  नाही......!
----------------------------------------------------------------------------------------------
-कविता - खंत ना आता त्याची - खेद कशाचा  नाही ..!
- अरुण वि. देशपांडे - पुणे.
------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment