कविता - "हे बघ ---! -अरुण.वि.देशपांडे-पुणे
हे बघ !
मनाच्या देव्हाऱ्यात
मनापासून आवडणारी
एक प्रतिमा असावी
ती कुणाची असावी ?
हे बघ..!
अशी नियमावली अजून तरी नाही .
कुणी-कुणाच्या मनात भराव
हे असे ,कधी ठरवून का होत असत ?
हे बघ !,
विचित्र वाटावेत ,
असे अपघात नेहमी होतच असतात
तसा हाही अपघात कधीच झालाय -
यात जखमी झालोय मी -
तू नाही...!.
--------------------------------------------------------------------------------------
कविता -" हे बघ --! अरुण.वि .देशपांडे -पुणे
chhan
ReplyDeletethanks Archana K.
Deletelekhnaa saathi neiymit abhipray dene.