Thursday, March 7, 2013

कविता - स्त्रीला घेऊ समजून ...!

महिला-दिनाच्या  निमित्ताने -
कविता - स्त्री ला  घेऊ समजून ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------------------------
स्त्रीत्वाचा तिच्या कधी
नका करू  अपमान
असावा हो अभिमान
मनी मानसी आपुल्या ....।।
तिचा  वावर नानारुपात
म्हणून अर्थ आयुष्यात
विसरू नका  हे सारे
असुद्या सदा ध्यानात ...!!
वर्षातुनी  हा  एकदा 
भावनांचा  महापूर
शब्दांचे  पतंग आकाशी
दिसती छान -सुंदर  ........!!
वेदना -दु:क्ख  मनीची
व्यथा घेऊ समजून
संवाद साधू तिच्याची
स्त्रीला घेऊ  समजून .........!!
--------------------------------------------------------------------------
कविता - स्त्रीला घेऊ समजून ....!
-अरुण वि.देशपांडे ---पुणे
--------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. अर्चना - कविता अभिप्रायाबद्दल आभार.
    आणिक एक विनंती...
    बाल-साहित्याची माझी ३ पुस्तके आली आहेत. मुलांना गिफ्ट देण्या साठी उपयुक्त आहेत.
    १.आली आली परीराणी - बाल कविता , २.रेणूची गोष्ट ३- सोहम ची गोष्ट- बाल कथा.
    या ३ ही पुस्तकांची किंमत फक्त १००/- रु. आहे.
    तुमी मला पत्ता कळवल्यास मी कुर्रीअर टपालाने पुस्तके पाठवीन.
    पुस्ताकंचे पैसे तुम्ही नंतर चेक ने/ मनी ओर्देर ने / किंवा नेत बेन्किंग मधून पाठवावे.
    ही सूचना आणि विनंती आहे.
    स्नेहांकित -
    अरुण वी.देशपांडे -पुणे.
    मो- ९८५०१७७३४२

    ReplyDelete