Sunday, March 10, 2013

लेख- रुखरुख मनाची आपल्या...!

लेख- रुख रुख  आपल्या मनाची ....!
-अरुण वि..देशपांडे  -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------
, या दोन्ही अवस्था आपल्या मनाशी  आणि मनाच्या अवस्थेशी
संबंधित आहेत. एखादी  गोष्ट  वेळेवर न केल्याने , किंवा एखादी प्रतिक्रिया
सांगण्याचे अगर व्यक्त करण्याचे मनात असूनही राहून जाते"  ",
अशा वेळी  मनाला विलक्षण अशी "रुखरुख लागून राहते ", आणि नंतर
एकांती असता मनाला मोठीच "हुरहूर लागून रहाते. ".
खरे म्हणजे हे दोन्ही आपण टाळू शकतो, त्यासाठी  परस्पर उत्तम असा संवाद हवा,
आणि  समोरच्या व्यक्तीची भावना " समजंस -श्रोता  होऊन ऐकण्याची आपली  तयारी हवी."
बहुतेक वेळा - आपण ऐकून घेण्याच्या बाजूने नसतोच. आणि पुष्कळांना तर नेहमी
"आपलेच घोडे पुढे पुढे दामटण्याची  दांडगी हौस  असते".
 या अशा सवयीच्या  लोकांनी नीटपणे ऐकून घेतलेले नसते, महत्वाचा भाग राहून जातो,
आणि मग योग्य प्रतिसादा  अभावी  भावना पोन्हाचत नाहीत.,सांगणारी व्यक्ती नाराज
होऊन निघून जाते. थोड्यावेळाने  मग, आपणच मनाशी म्हणतो-
अरे- तो असे म्हटला काय..!
चुकलेच जरा ..! आणि मग मनाला विलक्षण टोचणी लागते, ही रुखरुख ", अपराधीपणाची
जाणीव  फार त्रासदायक असते.
तेव्न्हा - ऐकणे तत्परतेचे असावे म्हणजे ', योग्य वेळी योग्य प्रतिसाद देता येतो.
थंड आणि मक्ख चेहेरा ठेवून समोरच्या "आपल्या माणसाला निराश करून नका ".
 तुमच्या मनात काही नसेल ही ,पण तुमच्या दर्शनी रूपाने  विनाकारण तुमच्याबद्दल गैरसमज  होणे",
 नक्कीच बरे नव्हे.
 मनाची ही रुखरुख वेळे अगोदरच संपवा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- रुखरुख आपल्या मनाची ....!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment