Sunday, June 24, 2012

अतीव समाधानाचा आणि गौरवाचा क्षण जीवनातला ..! दि.७ एप्रिल -२०१२. हैद्राबाद.

|| श्री||
अतीव समाधानाचा आणि गौरवाचा क्षण
जीवनातला ..! दि.७ एप्रिल -२०१२. हैद्राबाद.
--------------------------------------------------------------------------------------------

 मी "स्टेट बँक औफ हैद्राबाद " मध्ये  २७ फेब्रुवारी १९७३  ते ३० जून  २००६ -
अशी ३३ वर्षे नोकरी केली. बँकेतील नोकरी म्हणजे "रुक्ष आणि करड्या - कोरड्या  वातावरणात
केलेली नोकरी " हे जरी खरे असले तरी,
या दरम्यान "लेखनाच्या माध्यमातून थोडेफार सामाजिक उपक्रम करण्याचा यशश्वी  प्रयत्न केले.
लेखक-कवी आणि बालसाहित्यकार  आणि बाल-साहित्य चळ वळ मधील एक कार्यकर्ता  म्हणून
माझी थोडी फार ओळख सर्वांना झाली होती.
माझ्या बँकेकडून या कार्याची दखल मात्र घेतले जात नसे. याचे कधी -कधी वाईट वाटायचे.
कारण "घरचा आहेर" महत्वाचा असतो. असो.
निवृत्त झाल्यावर तर "विजनवासात" असल्याची भावना मनात असते.. पण अचानक वळवाच्या
पावसाच्या सुखद सरी" याव्या तसे सुखद क्षण माझ्या वाट्याला आले."
निमित्त होते" SBH  Rtd .Employees  Association च्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त
आयोजित विशेष मेळाव्याचे..  दि. ७ एप्रिल- २०१२ रोजी - या मेळाव्यात " माझ्या लेखन योगदानाची -
आणि समाजिक उपक्रम -कार्याची दखल" म्हणून "बँकेच्या MD  च्या हस्ते माझा सपत्नीक " शानदार
असा सत्कार करण्यात आला . श्री .एम .भगवंतराव - मानेजिंग डायरेक्टर  यांनी "शाल-श्रीफळ -
स्मृतीचिन्ह" देऊन आमचा गौरव केला.
सभागृहातील हजार -बाराशे उपस्तीथ मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात आमचे अभिनंदन -कौतुक केले.
मित्र हो- हा माझ्या जीवनातील अतीव- समाधानाचा आणि गौरवाचा आहे.
या प्रसंगाचे छायाचित्र सोबात आहे.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद चे , एम डी. श्री .एम. भगवंत राव - अरुण वि.देशपांडे - सौ- मीनाक्षी अरुण देशपांडे यांचा गौरव -सत्कार" करतांना.

No comments:

Post a Comment