Sunday, June 24, 2012

लेख- हे असे का होते ?

||श्री|                                                                         -अरुण वि .देशपांडे -पुणे.
लेख- हे असे का होते ?
---------------------------------------
मित्र हो,
आपण सारे सर्वजण सामान्यजन " आहोत, हे मान्य केले की ,बाहेरच्या
जगातील अनेक गोष्टींचे जे अदृश्य असे "दडपण " आपल्या मनावरती आलेले असते
ते कमी होण्यास मदत होते. पण अनके वेळा आपणच आपले स्वतःचे मूल्यमापन करतांना
झुकते माप देऊन, आपल्या बद्दलच्या भ्रामक - कल्पनांना  अधिक बळकटी देतो. हे असे का होते ?
तर सभोवतालीच्या वातावरणाचा पुरेसा अभ्यास नाकारता, आणि स्वताच्या मर्यादा न ओळखता ,
चार- चौघात वावरतांना ज्या काही चुका होतात, त्यमुळे आपले वावरणे ,वागणे, आणि बोलणे  हे
सारे काही " हास्यास्पद " होऊन जाते.-- हे असे का होते..?
तर, आपण स्वतःला "अभ्यासोनी प्रकटावे " या पद्धतीने  सादर करीत नाही. आणि त्यामुळे "चार -चौघात"
फजिती होते". त्यामुळे "प्रसंगी श्रोत्याची भूमिका घेऊन, समोरच्या व्यक्तीची ऐकून घेणे  श्रेयस्कर .
अपुऱ्या- माहितीवर आधारित आपले संभाषण ऐकून लोकांची करमणूक होते आहे" ,हे मान्य करण्याची
सुद्धा काही जणांची तयारी नसते.. हे असे का होते ?
स्वतःकडे कमीपणा घेऊन, दुसऱ्यांचे मोठेपण मान्य करण्याची तयारी ज्या वेळी आपल्या मनाचे होईल,
त्यावेळे पासून खूप फरक पडेल.  अगोदर श्रोते व्हा , साठ्वेलेले ज्ञान तुम्हाला आपोआपच बहुश्रुत बनवेल.
घाईघाईने स्वतःचे "प्र- दर्शन " करण्याच्या वृत्तीवर अंकुश ठेवता आला तर बरेच .., नसता ,
"अपयश आले के- माझ्याच बाबतीत - हे असे का होते ?" हा प्रश्न सुटणार नाहे.
काय वाटते तुम्हाला -? सांगा बरे ?
***********************************************************************************************************************************
लेख- "हे असे का होते ?                                                                                             -अरुण वि .देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment