Sunday, June 24, 2012

लेख- आठवणीत हरवणे ...|

|| श्री ||                                                                                     अरुण वि. देशपांडे -पुणे.
लेख- आठवणीत हरवणे ...|
--------------------------------------------------------------------
तुम्हा -आम्हा सर्वांच्या मनात आठवणीच -आठवणी साठ्लेया असतात .
"व्यक्ती तितक्या प्रकृती "- तसे आठवणींचे असते. कुणाच्या आठवणीत
काय असेल ? सांगता येत नाही.
"आठवणीत  हरवून जाणे "- हे आपल्या स्वभावातील हळवेपानाचे लक्षण आहे.
कारण आठवणी ह्या बहुतांशी " निकटच्या - आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तीशी
निगडीत असतात. त्या अनुषंगाने घडलेले "प्रसंग किंवा घटना " या आपल्या
मनात , स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या असतात. सहाजिकच त्या
क्षणांना आपण कधीच विसरू शकत नाही."
हे पुन्हा पुन्हा आठवणे सुद्धा मनाला एक हळवे समाधान देणारे सुखच आहे."
मनाच्या हुरहुरत्या अवस्थेत "आठवणीत हरवून जाणे" ही हमखास घडणारी एक
मानसिक प्रक्रिया आहे.
"आपण आपल्यातच हरवून जाणे," आजूबाजूच्या दुनियेचा विसर पडून जाणे " असे
हे आठवणीत हरवून गेल्यावर होऊन जाते.
या  आठवणी "कधी डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणाऱ्या असतात, कधी अस्फुट असे
हुंदके घशाशी आणणाऱ्या असतात." तर "कधी आठवणी मनाला नवी उमेद देतात ",
आठवणी पुन्हा ताज्या झाल्या की "मनाला हुरूप आल्या सारखे वाटून जाते."
"जुन्या जखमा कुरवाळीत बसणे..." म्हणजे "आठवणीत हरवून जाणे " एवढेच नसते.
"सहवासात येऊन  गेलेल्या माणसांना  भरली मनाने आठवणे "-ही सुद्धा आठवणी आहे.
"आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांपासून बोध घेणे  आणि त्या
  दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून पाहणे" हे ही घडून जाऊ शकते ते
केवळ "आठवणीच्या पाठबळावर ." कारण त्या घटना , ते घडून घेलेले
 प्रसंग " आपल्याला जीवनानुभव " देऊन गेलेले असतात. ते पुन्हा -पुन्हा
 आठवणे ' आणि मनाला "नव्याने काही शिकण्यास मिळणे ", हे आठवणींचे
आपल्या उपकारच आहेत ", असे म्हणावेसे वाटते.
 "एक- एकट्याचा एकांत - आणि आठवणी" यांचे अतूट असे नाते आहे. दूरवर
 नजर लावून विचारात गढून गेलेले कुणी दिसले के समजावे" आठवणीच्या
आठवणीत हरवून गेलेला दिसतेय स्वारी.'!
      " आठवणीचे ."-हे येणे
        झुल्यावारचे झुलणे
        हिंदोळ्यावर  झुलावे
        मनालागी सुखवावे .......||
 हे लेखन वाचून तुम्ही तुमच्या आठवणीत हरवून जाल हे नक्की .आणि कळवा
मला तसे.नमस्कार ,
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- "आठवणीत हरवणे -                                              -अरुण वि. देशपांडे -पुणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment