Sunday, June 24, 2012

" हे पटलं तर होय म्हणा ...:

नमस्कार आणि शुभप्रभात मित्रांनो -
 " हे पटलं  तर होय म्हणा ...:
"प्रपंच करावा नेटका " हे संतवचन ध्यानीमनी ठेवून
 घरातील वातावरण समतोल ठेवणारे अनेक कुशल
 कुटुंबवत्सल व्यक्ती आपली सभोवताली असतात.
ते नेमके काय करतात, घरातील" माणसांशी ते नेमके  कसे
वागतात,?" हे प्रश्न आपल्या मनात उत्सुकता निर्माण करतात.
या पालकांची बालके , ती देखील कौतुक वाटावे अशा स्वभावाची
असतात." या साऱ्यांचे  रहस्य काय असेल ?
मित्रहो- या साठी आवश्यक असलेले " अनेक स्वभाव विशेष "
हे या गृहस्थांचे आणि गृहिणींचे स्वभाव-विशेष असतात.
उदा-. हिशेबीपणा , काटकसरीपणा , आणि कंजुषपणा "
यातील अंतर त्यानी कुशलपणे मिटवलेले असते."
योग्य ठिकाणी  योग्य खर्च करणे- हिशेबीपणा , हाच खर्च
कमीतकमी पैशात जो करू शकतो तो "काटकसरी "असतो, आणि,
घरातील सर्वांचा विरोध -पत्करून ,  नाराजी ओढवून घेऊन सुद्धा जो
"पैसा खर्च करू इच्छित नाही-" -तो कंजूष -म्हणवला जातो
"घरातील सर्वांच्या आवडी-निवडी पूर्ण करणारा कुटुंब -प्रमुख अर्थातच
सर्वांना प्रिय असणार-  बायकोला नवरा प्रिया असणार, पतीला पत्नी
प्रिय असणार, आणि मुलाना "आई-बाबा "आवडणारे असणार" हे उघड आहे.
"योग्य वेळी खर्च  करणे-गरज असेल तेव्न्हाच खर्च करणे, ही चांगली सवय आहे.
 पण  उसनवारी करून, "मनात आले म्हणून " चैन करणे" परवडणारे नसते.
कर्ज घेऊन हौस-मौज करणारे -" हे या स्वभावापायी अडचणीत येतात, पण
वरील दोन्ही प्रकार न करणारे "महाभाग " आहेतच. खिशातील पैसा "बाहेर
काढणे" यांच्या जीवावर येत असते.  ही माणसे स्वतः साठी  तर सोडाच, इतर
कुणा साठी देखील "पैसा खर्च करू इच्छित नाहीत, परिणामे यांच्या घरातील
वातावरण नेहमी "असमाधानी असते." अशा घरातील मुले -दुसर्यांच्या घरात
गेली की -"काय काय खाऊ आणि किती खाऊ"..? असे वागतात,आणि ते सर्वांना जाणवणारे
असते" हे फार वाईट आहे.
आपपल्या घरातील सर्वांना "आनंद देणे, समाधान देणे " हे आपले कर्तव्य असते ,
ते कोणत्या पद्धतीने द्यायचे हे  विचारपूर्वक ठरवले तर, घरातील वातावरण छान राहू शकेल.
हे पटलं तर होय म्हणा ..!
|| जय श्री स्वामी समर्थ ||
**********************************************************************************************************
"हे पटलं तर होय म्हणा ...!                                                          -अरुण वि . देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment