Wednesday, December 13, 2017

लेखमाला -लेख १० वा आठवणीतील गाव-परभणी - लेखन पर्वास आरंभ .

लेखमाला -लेख १० वा 
आठवणीतील गाव-परभणी - 
लेखन पर्वास आरंभ
----------------------------------------------------

१९८६ मध्ये   आगमन झाले त्यावेळी ..मी एक होतकरू लेखक. माझ्यालेखन - वाटचालीस आरंभ झालेला होता . त्यावेळी मी कथा लेखन करीत असे . कविता लेखन करण्यासाठीची कवीमनाची मानसिक अवस्था त्याकाळात तरी मला अजिबात लाभलेली नव्हती  त्यामुळे कथा लेखन , अधून मधून ललित लेख लिहिणे असे काही चालू होते.

१९८० - ९० च्या दशकात साहित्यिक वर्तुळात परभणीचा मोठाच बोलबाला होता ..लिहित्या लेखक कवी- यांच्या कामगिरीने सर्वत्र नावलौकिक मिळवलेला असल्यामुळे ..परभणीकर साहित्यिकांचा दबदबा जाणवेल असाच होता.
साहजिकच माझ्या सारखा नवोदित लेखकू -माणूस .इथल्या वातावरणात कसा रुळतो ? हा प्रश्न माझ्या मनात काय असायचा .

त्यावेळी ज्यांनी आपल्या लेखनाने परभणीचे नाव दुमदुमते ठेवले होते .अशा साहित्यिकात उत्तोमात्त्म कवी-मंडळी आघाडीवर होती.. उदा- रेणू पाचपोर , इंद्रजीत भालेराव ,श्रीकांत उमरिकर ,  मोहन मु.कुलकर्णी , डॉ.धुंडीराज कहाळेकर .प्र.द. जोशी , शिवाजी मरगीळ, 
आणि देविदास कुलकर्णी , अविनाश सालापुरीकार ,  ,केशव बा.वसेकर , रमेश चिल्ले , तुकाराम खिल्लारे , आणि कृषी विद्यापीठात असलेले रावसाहेब चोले,  सूर्यभान नागभिडे , मनोहर नलावडे , काव्य रजनीचे -रमेश पारवेकर , 

तसेच कवयित्री - कमलताई कुलकर्णी , वसुधा देव , मंदा वळसंगकर , प्रणिता देशपांडे , ही नावे प्रातिनिधिक स्वरूपात आठवली तितकी लिहिली ..
त्यावेळी कविता लेखनात कवी म्हणून नारायण बोरुलकर ,रे.रा. सनपुरकर , श्रीकांत सदावर्ते , .,या कवींचे स्मरण व त्यांच्या लेखनाचा उल्लेख करणे उचित आहे.

या तुलनेत गद्य लेखन तसे कमी प्रमाणत होत असे .. यात मंगेश उदगीरकर , प्रभाकर हरकल ,डॉ.आनंद देशपांडे ,दिवाकर खोडवे , शरद देऊळगावकर , गणेश घांडगे , बाबा कोटंबे ,अशे नावे आठवतात ..
या निमित्ताने जेष्ठ विनोदी लेखक- प्रा.भास्कर कुलकर्णी यांची आठवण आवर्जून होते आहे.

अशा या मान्यवरांच्या मांदियाळीत माझा वावर आणि लेखन सहभाग सुरु झाला .. याच सुमारास म्हणजे १९८७-८८ च्या दरम्यान ..मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी -या संस्थेचा सभासद झालो आणि साहित्य सम्मेलन " हा नवा अवकाश माझ्यासाठी  खुला झाला .

परभणीच्या लेखक-कवींच्या सहवासात .माझ्यातील साहित्यिकाची जडण घडण झाली ..याचा फार मोठा प्रभाव माझ्यावर एकच झाला ..तो म्हणजे ..सातत्याने लिहिणे ..आणि वाचकांच्या पर्यंत पोन्च्ने ..सुरुवातीचा हा धडा .मी आज ही गिरवतो आहे..
त्यामुळे ..इंटरनेट वरील इ-पेपर , ई-मासिके आणि ई- दिवाळी अंकातून -कथा - कविता , ललित लेख, आणि बाल-साहित्य असे माझे विविध लेखन प्रसिद्ध होत असते , यामुळेच .ई-बुक स्वरूपात देखील माझे विपुल साहित्य ओनलाईन उपलब्ध झाले आहे..
मी अगदी नव्या  मासिक-पेपर पासून ते नामवंत पेपर आणि मासिक, दिवाळी अंकासाठी लिहित गेलो .आज पण असेच चालू असते.यामुळे मराठवाड्यात आणि मराठीतल्या दूर दूर ठिकाणहून प्रकशित होत असलेल्या नियतकालिकातून माझे साहित्य  आरंभापासून प्रसिध्द होत आले आहे.

परभणीच्या - दिलीप वसमतकर यांनी  दीपप्रभा -साप्ताहिकात माझे साहित्य आवर्जून प्रकाशित केले , सुरेशचंद्र गुप्ता यांच्या -साप्ता.लोक्व्यथा अंका साठी मी नियमित लिहित असे , हेमाताई रसाळ आणि डॉ.रवींद्र रसाळ यांनी त्यांच्या गोदातीर समाचार साठी लिहित रहा -असे म्हणून ..मला वेळोवेळी संधी दिली ...अशीच संधी ..मित्र -मल्हारीकांत देशमुख यांनी ..लोकमत - त्रिधारा "साठी लेख लिहा ..असे सांगून माझे ललित लेख प्रकाशित केले ..
या सगळ्या लेखनामुळे ..नियतकालिक -लेखन " हा प्रकार शिकण्यास मिळाला .ज्यात ..मुद्देसूद लेखन, विषयानुरूप लेखन ,आटोपशीर लेखन , वाचनीय लेखन " याचे कृती -ज्ञान मिळत गेले असे म्हणेन .. म्हणून माला लेखन संधी दिलेल्या वरील सर्व स्नेहीजनांची मला नित्य-नियमित आठवण होत असते 

 काळात - लोकल परभणी शिवाय ..मराठवाड्यातील सर्वच पेपर आणि  दिवाळी अंकासाठी मी लिहिले आहे..
रविवार पुरवणीतून माझे साहित्य येत असे त्यात - दै.मराठवाडा , दै.अजिंठा , सामना , देवगिरी तरुण भारत 
 लोकमत ,आणि  सकाळ , हे औरंगाबाद चे पेपर  , त्याच बरोबर - एकमत-लातूर ,नांदेड येथील - लोकपत्र , प्रजावाणी , गोदातीर समाचार , सप्ता.सत्याप्रभा  या काही महत्वाच्या नावांचा उल्लेख करावा लागेल 

माझे लेखन-पर्व जोमाने आणि  उत्साहाने चालू असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे .परभणीला होत असणारे अनेकानेक साहित्यिक उपक्रम ..यात आपला सहभाग असलाच पाहिजे ..हे निखळ भावना मनात असायची ,शिवाय सोबतच्या सृजनशील अशा कवी-लेखक मित्रांच्या समोर आपले लेखन सदर करण्यात एक वेगळाच आनंद होता ..
वाचक आणि श्रोते म्हणून दर्दी आणि जाणकार असायचे..त्यांची दाद देखील मोठी प्रेरक आणि लेखन प्रेरणा देणारी होती. वकीलसाहेब - वसंतराव पाटील , वि.शं. गौतम ,रवींद्र गंगाखेडकर  यांची आठवण होते ,

वकीलसाहेब -अनंतराव उमरीकर , शरद देऊळगावकर , पद्माकर पेडगावकर ,लक्ष्मणराव वाईकर , गोविंद कात्नेश्वारकर , अशोक खोत , श्री व.सौ. मंगेश उदगीरकर ....असे अनेक मान्यवर माझे प्रेरक म्हणून लाभले.

परभणीचे माझे वास्तव्य होते त्या वर्षात  ..परभणी -सम्मेलन नगरी  म्हणून विख्यात झालेली होती ..मसाप परभणी , आणि अ.भा.मराठी साहित्य सम्मेलन भरवणारी अक्षर-प्रतिष्ठा ..या दोन संथांनी अनेक सम्मेलने परभणीत आयोजित केली .. हे प्रत्येक सम्मेलन ..एका लेखाचा विषय आहे , तसेच .परभणी जिल्हा साहित्य सम्मेलन ,मराठवाडा साथिय सम्मेलन ..या बद्दलही खूप छान आठवणी आहेत ..
यापुढील लेखात ते येणारच आहे..

माझ्या लेखन प्रवासात ..१९८६ ते २००६ या कालखंडास  अतिशय महत्वाचे स्थान आहे.. मसाप परभणी आणि अक्षर -प्रतिष्ठा आणि जेष्ठ मित्र- प्रभाकर पाठक काका आणि मित्र देविदास कुलकर्णी यांनी मला कायम गुंतवून ठेवीत . अनेक उपक्रम करण्याची संन्धी दिली , जबाबदार्या सोपविल्या ..त्या मी माझ्या कुवतीप्रमाणे पार पाडल्या  .याचे समाधान खूप मोठे आहे ..
पुढच्या लेखात असेच काही.....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
लेख १० वा -
आठवणीतील गाव-परभणी - लेख- लेखन पर्वास आरंभ
-अरुण वि.देशपांडे 
मो- 9850177342 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment