Thursday, December 28, 2017

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी - लेख-१२ वा - हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
लेख-१२ वा -
 हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!
-------------------------------------------------------------------------
नमस्कार रसिक हो ,
या लेखमालेच्या निमित्ताने दर आठवड्याला तुमच्याशी लेखन-संवाद करण्याची छान सवय लागली आहे, तुम्ही माझ्यासाठी श्रोते आणि रसिक वाचक आहात ..तुमचा प्रतिसाद आहे म्हणून ..हे सारे खुलवून सांगण्यात मजा आहे ,

आजच्या लेखात .आता इतिहासात जमा झालेल्या हैद्राबाद बँकेतील माझ्या सहकारी मित्रांच्या आठवणी बद्दल सांगावे असे वाटते आहे..कारण ३३ वर्षे मी या हैद्राबाद बँकेत नोकरी केली .अनेक  गावी फिरलो ..अनेक शाखामधून काम केले ,त्या वेळी जे सहकारी लाभले ..त्यांची आठवण नेहमीच होते .,समक्ष भेटी भले ही होणे शक्य नाही ..पण, अंतरीच्या भेटी आठवणी स्वरूपाने होतच असतात ..ही अनुभूती आपण सारेजण घेतच असतो.

तसे म्हटले तर ..हैद्राबाद बँक ..माझ्या आयुष्यात ..माझ्या जन्मा पासूनच सोबत होती ..माझे वडील ..विठ्ठल हनुमंत देशपांडे -लोहगावकर , यांनी याच बँकेत माझ्या आठवणी प्रमाणे ..१९४८  ते १९८९ ..अशी ४०-४१ वर्षे नोकरी केली .आणि नंतर मी देखील १९७२ मध्ये बी.काम झालो आणि फेब्रुवारी -१९७३ ते जून -२००६ अशी ३३ वर्षे नोकरी करून स्वेच्छा -निवृत्ती घेतली..या दोन्ही कार्यकाला मुळे..हैद्राबाद बँक आणि आमचे एक भावनिक नातेबंध होते असे म्हणणे योग्य ठरेल.

या दरम्यान अनेक गावं फिरून झाली ..एका जागी स्थिर न राहणाऱ्या , आणि नोकरीत सतत बदली होत असलेल्या  माणसांची एक मनोवृत्ती तयार होऊन जाते , या भावनेला  "एक कोरडी तटस्थ -भाववृत्ती " म्हणू या ...अशी माणसे ज्या  गावात असतात .तोपर्यंत तिथले होऊन जातात ,पण, बदली झाली की ..अगदी निर्लेप मनाने त्यागावातून ..पुन्हा नव्या गावाकडे जाण्यास तयार असतात ..आमचे अगदी असेच होत असे ..बदली झाल्याच्या दिवशी ..हमखास हे गाणे आठवत असायचे ..चल उड जा रे पंछी..के अब ये देस हुवा बेगाना ..! 
आणि मग नव्या ठिकाणी नव्या उत्सहाने समरस व्हायचे ..हे शिकवण जणू वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने मिळत गेली ..आणि पुढे माझ्या बदल्या होत गेल्या त्या वेळी हीच शिकवण मी आचरणात आणीत गेलो. असो.

निझाम राजवटीत ..हैद्राबाद बँकेत ..जे कर्मचारी नोकरीत असायचे त्यात मुस्लीम कर्मचारी मोठ्या प्रमाणात असणे स्वाभाविक  होते .. १९५५ ते १९६० ..माझ्या लहानपणीच्या दिवसात मला बँकेतील वडिलांचे सहकारी मित्र आठवतात ..ज्यांचा पोशाक ..शेरवानी , पायजमा , आणि डोक्यावर  लाल गोंडे असलेली मोठी टोपी ,असा होता  हे सगळेजण आपापसात उर्दू जबान मध्ये बोलत , बँकेतले कामकाज उर्दूमध्ये पाहिल्याचे मला आठवते ..शाई भरलेया दौती , मोठे टाक .आणि ब्लोतिंग पेपर चा झुलता स्टेंड.टेबला टेबलावर असे.अतिशय आद्बीची आणि कानाला मिठी मिठी वाटणारी उर्दू ..तेंव्हा पासून माझ्या मनात घर करून बसलेली आहे.
ईद-मुबारक आणि शीर-खुर्मा ", लजीज बिर्याणी ..यांची लज्जत लहानपणापासून घेत आलो आहे . ईद  की वो मुबारक -बाते आणि  " इत्र् की खुशबू " ..माहौल ..जैसे के वैसा .कायम है सरकार...

माझ्या नोकरीच्या वर्षात मला माझ्या अनेक मुस्लीम सहकारी मित्रांचा सहवास लाभत गेला ..यात काही माझे अधिकारी -आणि साहेब म्हणून होते ..तर यातले काहीजण .माझ्या सारखे कारकून श्रेणीतले आणि काही चपराशी  म्हणून कार्यरत होते .. आमची क्याटेगरी ..कोणतीही असो, आम्हे खूप छान मित्र म्हणून सोबत राहिलो ..हीच आठवण खूप आनंदाची आहे.

माझी सुरुवातीची शाखा - अंबाजोगाई .वर्ष - १९७३-१९७५ . इथे माझे हेड -बाबू होते ..महम्मद अफजल साहेब , यांनी माझ्या  उमेदवारीच्या काळात बँकेतील काम समजावून दिले ..ते परभणीचे .आणि मी पण परभणीचा ..हा आमच्या मैत्रीतला प्रेमळ धागा होता ..याच अफजल साहेबांच्या सोबत दोबारा काम करण्याचा योग पुढे अनेक वर्षांनी आला ..जेंव्हा आम्ही बँकेच्या कृषी विद्यापीठ शाखेत एकत्र काम केले ते १९९६ ते १९९९ या दरम्यान .

माझ्या वडिलांची बदली उदगीरला झाली आणि मी तिथून २० किलो मीटर अंतरावर असलेल्या .कमालनगर-जी.बिदर या गावी आलो .. तिथे मला मनेजर म्हणून जनाब -अहेमद मोहियुद्दिन हे गृहस्थ होते . कोहीर या गावचे हे मोठे श्रीमंत परिवारातील ..या साहेबांचा परिवार हैद्राबाद ला होता . साहेब एकटेच कमालनगर ला राहत असत. मोहिउद्दिन साहेबांना  एकदम शाही आणि जानदार व्यक्तिमत्व लाभलेले  होते .. सफाईदार इंग्रजी आणि नफीस उर्दू ..असे बोलायचे की ऐकत राहावे.  हैद्राबादी वातावरणात राहिलेले हे साहेब ..छोट्याश्या खेड्यात एकटेच राहायचे ..कधी त्यांना विचारले तर .. शांतपणे म्हणयचे ..देखो बाबू .तुम्हे  तो अभी सब सिखना है ..
याद रखो ....जिंदगी सब सिखा देती है ..भीड मे रहो ..या अकेले  रहो ..खुद को कभी अकेला न छोडो ..बस !.फिर क्या ..दिन तो निकल  ही जाते है ...

त्यावेळी बँकेचे वर्ष अखेर कामकाज ..डिसेंबर होते .. या महिन्याचे शेवटचे दिवस .आम्ही या मोहिउद्दिन साहेबांच्या सोबत बँकेतच मुकामी असायचो . अशा वेळी ..हे साहेब वडीलधार्या सारखी स्टाफची  खाण्या-पिण्याची काळजी घेत असत ..१९७६- ७८ दरम्यानचे हे दिवस असावेत ..आता चाळीस वर्ष झालीत या गावाला सोडून .. पण. या अह्मेद मोहिउद्दिन साहेबांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली ..आणि मुहाब्ब्त्से खिलायी हुवी " मसूर दाल -और दुध " मे पकायी हुई वो लजीज बिर्याणी ,"आठवली की डोळ्यात पाणीच येते ..पुन्हा ऐसे होणे नाही.

पुढे कमालनगर या गावाहून ..माझी बदली  याच बिदर जिल्ह्यातील ..औराद -संतपुर ..या तालुक्याच्या गावी झाली.
इथे असतांना एक नवा क्लर्क  रुजू झाला .. त्याचे नाव ..फिरासत आली खान ..बिदरचा राहणारा .. एकदम हसतमुख नवयुवक ..खूप छान सूर जुळून आले होते , 
बिदरला त्याच्या घरी तो घेऊन जायचा ..तेंव्हा .आमची जी खातिरदारी होत असायची की काय सांगावे .अशा "मेहमान नवाजी " साठी तकदीर -वाले मेहमान असावे लागते . 
औराद्ला हा फिरसात अलीखान ..छोटासा कमरा किरायेपर ..घेऊन राहायचा . एखाद्या संध्याकाळी त्याच्या सोबत त्याच्या खोलीवर गेलो की .. साब ..दाल-चावल " पकाता हुं अबी .! फिर . टेस्ट कर के जायीएगा .आपको -  ना बोलणे की गुंजाईश नाही है असे समझो ...!
त्याचा आग्रह करण्याचा "अंदाज " इतका नजाकतदार असायचा ..की त्याला "नाही " म्हटले तर ? त्याच्या गोर्या पान चेहऱ्यावर नाराजी पाहूच शकणार नाही " असे वाटायचे. मग काय . फिरासात अली खान " या मित्राने बनवलेला ..दाल चावल " खाणे के बाद दिल खुश होता ही था.

कर्नाटक मधून माझी सुटका झाली १९७८ मध्ये ..आणि मी थेट माझ्या आजोळी - जिंतूर या गावी आलो. जिंतूरच्या शाखेत तर काय सगळेच ओळखीचे आणि घरचे वाटावे असे सहकारी मित्र होते .. या जिंतूर शाखेत ..शेख हुसेन ..हा तरुण मित्र लाभला ..होता चपरासी - पण प्यून " म्हणून त्याला कधी वागवले नाही . एकदम हजरजबाबी .आणि हर फन मी माहीर " असा हा उस्ताद मित्र होता . काही प्रोब्लेम येऊ द्या .. हुसेन ला सांगा .. पोर्ब्लेम फिणीस .
त्याचे बोलणे , हसणे , आणि त्याला शोभून दिसणारी ..काळी-भोर दाढी ...एकदम हिरो के माफिक राहायचा हा हुसेन मिया . मला तर त्याला पाहिले की ..हिरो झालेल्या मेहमूद ची ..आठवण व्हाव्यची ..टाईट पेंट, तसाच मस्त रंगीत शर्ट, या हुसेन ला सगळे "बाबू " या नावाने पण बोलत . 
छान आणि सरळ साध्या स्वभावाने वागणारा माणूस ..इतरांना नक्कीच आवडतो .. जिंतूर ला लाभलेला हा शेख हुसेन- बाबू .हा मित्र याचेच उदाहरण आहे.

जिंतूर हून माझी बदली छावणी शाखा -औरंगाबाद ला झाली .. या शाखेत हेड क्याशियार होते..याह्या अझीझोद्दिन ,
 ..शायराना तबियत असलेले  सिनियर सहकारी होते .. हिंदी फिम- आणि हिंदी गाणी ..या समान आवडीवर आमचा दोस्तांना एकदम गहिरा झाला होता. शनिवारी बँकेतून निघालो की .. एखादा पिच्चर ..हो जाये .असा हुकुम करीत ..त्यांच्या फर्माईश की तामील..करणारे आम्ही तीन चार दोस्त लगेच हो म्हणत असुत 
याह्या अझीझोद्दिन ..रिटायर झाल्यावर ..आम्हाला याद करायचे ..औरंगाबाद ला रॉक्सी तोकीज च्या जवळ त्यांच्या मुलाचे छोटेसे दुकान होते .. तिथे त्यांना भेटायचो .. हातात हात घेऊन ते ..म्हणायचे "शुक्रिया ..आप आये तो ..!
त्यांच्या चेहेर्यावर जे हसू उमटायचे ..बस ..भेटीचे सार्थक व्हायचे.

१९८६ मध्ये परभणीला आल्यावर अगोदर पासून परिचित असलेल्या अनेक मित्रांच्या सोबत प्रत्यक्ष्य काम करण्याचा योग आला .. अफजल साहेब . मेहेबुब ,  अमीर अली, अब्दुल हादी , सैद अहेमद , हकीम फारुकी , महमद अब्दुल कादर , 
यांच्या सोबत अनेक वर्ष काम केले , या सर्वांनी वेळो वेळो त्यांच्या पारिवारिक समारंभात मोठ्या प्रेमाने मेहमान म्हणून बोलावले .यांच्याकडील .ईद-मुबारक आणि मेजवानी कधीच चुकली नाही ..किती आठवणी आहेत या सर्वांच्या..!
या सर्व मित्रातले  एक खास नाव आहे.. कॉमरेड - एम ए गफार . गफार साहेब आमच्या ए आय बी ई ए " या बँक कर्मचारी संघटनेचे मोठे पदाधिकारी होते . त्यांच्या लोकप्रिय असण्यात आमच्या या युनियनचा मोठाच वाट आहे . सर्वांना सोबत घेऊन काम करणारे .गफार साहेब .म्हणजे ..हर दिल अजीज -अशी शाख्य्सियत आहे.
आमची युनियन आणि बँक .या दोन गोष्टी शिवाय गफार साहेब आमचे दोस्त झाले ते ..फिल्म आणि फिल्म संगीत या आवडीमुळे . 
परभणीला स्टेडीयम मध्ये त्यांच्या मुलाचे नॉव्हेल्टी" हे व्हिडीओ-पार्लर आहे.. माझ्या वास्तव्यात या दुकानाचे आम्ही प्रमुख कस्टमर होतो .. किती पिक्चर पाहिले याची गणतीच नाही  . व्हीसीपी आणि पिक्चर कॅसेट "आमच्या साठी नेहमीच तयार असायची.  संध्याकाळी ..गफार साहेब सोबत ..चहा आणि सिगरेट ..आणि आवडती फिल्मी गाणी ..क्या माहौल होता होगा . 
गफार साहेब ..तुमसा नही देखा . "ये लम्हे .यादगार है हमेशा .आपका शुकर गुजार हुं.
 बहोत शुक्रिया परभणीवाले  दोस्तो.  जवाब नही आपका 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
लेख-१२ वा -
 हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!
-अरुण वि.देशपांडे .
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------

No comments:

Post a Comment