Friday, December 15, 2017

हितगुज लेखमाला - लेख क्र.२० लेख- कामाची माणसं ...!

हितगुज लेखमाला -
लेख क्र.२० 
लेख-
कामाची माणसं ...!
----------------------------
एखाद्याच्या हाताला ,कामाला असलेला उरक " पाहून लोक त्याच्या कार्य-क्षमतेबद्दल मत व्यक्त करीत असतात ,त्यामुळे "कामाचा माणूस -इतके कौतुक पुरेसे नसते ,याला जोड पाहिजे असते  ती. काळ-काम-आणि वेग ..यांचे गणित अचूकपणे सोडवणार्या कार्य- कुशलतेचे .
काहीजण खूप काम करणारी असतात , पण ,ते कधी,कसे ,किती वेळात संपवायचे ? या टाईम-टेबलशी त्यांना  देणे-घेणे नसते ,कारण काही कार्य-प्रकल्प असे असतात की, ते निरंतर स्वरूपात ते कार्य चालू रहाणारे असतात, त्या कामात काम करणारी येतात आणि जातात .त्यांचा कार्यभाग संपला की.त्यातून ते बाहेर पडतात .अशा ठिकाणी तुमच्या कामाचा उरक कसा आहे ते फारसे पाहिले जात नसते , काम चालू असणे महत्वाचे समजले जाते.

पण सर्वच कामाच्या बद्दल आपल्याला असे म्हणता येत नाही ..दिलेल्या वेळेत , ठरलेल्या दिवशी , ठराविक मुदतीत जी काम करायची असतात , तिथे काम करणाऱ्या माणसांची ,त्यांच्या काम संपवण्याच्या कुशलतेची कसोटी असते..
अशा ठिकाणी "काळ -काम आणि वेग " असे  कठीण आणि अवघड गणित सोडवायचे असते ..अशा ठिकणी होणार्या परीक्षेत जे पास होऊन दाखवतात ..ते अर्थातच .नजरेत भरणारी ,लक्षवेधी कामगिरी करणारे ,आणि सगळ्यांना सोबत घेऊन कार्यपूर्ती करणारी .अशी नेतृत्व -गुण असणारी "नायक-मंडळी" असतात .

कामच्या माणसांना  ..नेहमीच कामचुकार आणि काम-चोर माणसांशी एक छुपी लढाई लढावी  लागत असते .कारण "कामाची माणसे ..फक्त काम-एके -काम "अशा समर्पित वृत्तीने काम करीत असतात ..पण कामचुकार आणि काम-चोर "ही चतुर आणि बेरकी माणसे .फक्त कामाचा देखावा करून .साहेब-लोकांच्या नजरेत कसे भरता येईल ..या खटपटीत असतात ,त्यांची  नाटकं सगळ्यांना काळात नाहीत असे थोडेच असते , पण साहेबलोक -सोयीस्करपणे त्यांना बाजू करून ..अगोदर काम करून घेऊ .मग यांचा हिशेब .करू असे करतात , , अशा धरसोड -धोरणामुळे खूपवेळा ..खूप मरमर करून काम करीत रहाणार्या .कामाच्या माणासावर .अशा संधी-साधू कामचुकार माणसांमुळे अन्याय होतो ..हे निमुटपणे पहावे लागते.

कामाच्या माणसांचे दोन प्रकार - एक असतात ..कोणतीही तडजोड न करता ..इमाने-इतबारे काम पूर्ण करून नामा-निराळे होऊन जात बाजूला रहाणे , आणि दुसरे असतात ते..साहेबांच्या मर्जीतले खास .कामाची माणसे - ज्यांच्याकडे नेहमीच विशेष कामगिरी असते ..या कामाचे स्वरूपच असते की ..कशी ही , किती ही .तोड-जोड , जोडा-जोड  करावी लागली तरी ती करा ..पण, हे काम आपल्या हातून जाता कामा नये ..अशा पद्धतीने काम फत्ते करून दाखवणारी "कामाची माणसं ..ज्यांना "कार्य-मुत्सदी ", डिप्लोमसी-तज्ञ " , अशा भारी-भारी नावाने ओळखले जाते ,
 पडद्यामागे असो वा बाहेर खुलेआम ..सूत्रं यांनाच  हलवायची असतात .आणि जितके जोखीम -भरी कामगिरी .तितकी यांची कसोटी , अर्थात हे एक प्रकारे आर्थिक-मिशन असते  , त्यामुळे इथे फक्त ..यश आणि यश "अपेक्षित असते , ही कामाची माणसं .. वेगळ्याच मनोवृत्तीची असतात ..सामन्या माणसाशी यांची तुलना होऊ शकत नाही.

कामाच्या माणसांची कदर केली जातेच ..फरक इतकाच आहे की .कधी ती वेळेवर होते, कधी वेळ पाहून होते , 
एक मात्र नक्की ..कामच्या माणसांना कामाशिवाय इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ नसतो ..!
वर्क इज वरशीप " ..असे म्हणात ते या वृत्ती मुळेच.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेख -कामाची माणसं 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment