Tuesday, December 5, 2017

लेखमाला - आठवणीतली गावं - गंगाखेड

लेखमाला - आठवणीतली गावं -

लेख-
माझी आठवणीतले गाव-
गंगाखेड 
-----------------------------------------------------------
बदलीची नोकरी असली की ..अनेक गावी जाण्याचा आणि तिथे वास्तव्याचा योग असतो बदलीवाल्यांच्या बाबतीत असेही म्हणता येईल की. "" जिथे दाणा -पाणी असते  ..तिथे जावेच लागते ," माझ्या बाबतीत  असा दुहेरी योग माझ्या वाट्याला आलेला होता , माझे वडील ती.(कै)- विठ्ठलराव हनुमंतराव देशपांडे -लोहगावकर , हे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीस होते ..त्यांच्या अनेक गावी बदल्या झाल्या , नंतर मी देखील याच बँकेत १९७३ साली लागलो ,आरंभीच्या नांदेड ,अंबाजोगाई , कमालनगर-, औराद -संतपुर (ही -दोन्ही -गावं  जी.बिदर -कर्नाटक  मधली होती ), तिथून पुन्हा आपल्या एरियात - जिंतूर , औरंगाबाद ,असे करीत .१९८२ साली मी संत जनाबाई च्या गावी - गोदाकाठच्या - गंगाखेडला आलो..
इथे येण्यापूर्वी ..बस आणि रेल्वे प्रवासात लागणारेपरभणी जिल्ह्यातील एक महत्वाचे गाव अशी आणि इतकीच नोंद माझ्या मनात गंगाखेड या गावाबद्दल होती .
१९८२ ते १९८५ अशी तीन वर्षे गंगाखेड या गावाला  माझे सहकुटुंब वास्तव्य होते ,गंगाखेड मधील माझे हे वास्तव्य माझ्या वैयक्तिक आयुष्यास खूप वेगळे आणि अर्थपूर्ण  कलाटणी देणारे आहे,अशा काही  आठवणी माझ्या नव्या पिढीतील मित्रांशी शेअर करू इच्छितो ...

त्यावेळी - गंगाखेड हे मोठा बाजार आणि व्यापार आणि आर्थिक उलाढाल असणारे मोठे केंद्र होते ,ते आज ही तसेच असेल याची खात्री .आहे.  मी या गावी ३०-३२ वर्षापूर्वी असतांना -आसपासची  लहान मोठी सर्व खेडी .सर्वार्थाने गंगाखेड बाजारावर अवलंबून होती , गंगाखेड गावातील लहान -मोठे जवळपास सगळेच व्यापारी बंधू त्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या निमित्ताने रोजच बँकेत नियमितपणे येत असत ..,त्यावेळी  स्थानिक असणारे अनेकजण आमच्या बँकेत नुकतेच लागले होते , या स्थानिक-रहिवासी असलेल्या सहकारी मित्रांच्या मुळे इतर सगळ्या कर्मचारी -सहकाऱ्याप्रमाणे मार्केट मधील बहुतांश व्यापारीबंधूशी  आवर्जून आमच्या भेटी होत असायच्या . आज इतक्या वर्षानंतर कुणा एकाचे नाव घेणे म्हणे इतर सर्वांना विसरलो असे होईल ..या सर्वाबद्दल एकच सांगेन - हे सर्वजण अतिशय मोठ्या मनाचे ,आणि स्नेह-भावना जपणारे मित्र होते, अशा दिलदार मनाची माणसे मला पुन्हा पुन्हा भेटली नाहीत .
एक पारिवारिक स्नेहसंबंध बँकेतील सर्वच  सहकारी मित्रांशी जुळून आले होते ..त्यावेळच्या काही सहकारी मित्रांची नावासहित आठवण -उल्लेख करणे उचित ठरेल .सर्वश्री सुधाकर टाक, उत्तमचंद नखत , दिलीप शिरपूरकर , माणिक पाठक , भिमाशंकर पाठक , कमलकिशोर मणियार - हे सर्व लोकल  कर्मचारी , त्यांच्या सोबत माझ्या सारखे बाहेरगावाहून बदलून आलेले - जी -आर -कुलकर्णी , डी आर चिनके , विश्वनाथ थोरवट, जी.टी.कुलकर्णी , माने , व अनेक इतर ..आणि अधिकारी म्हणून त्यावेळेस - भास्करराव हुंडी , आबासाहेब वाघमारे , प्रकाश गौड , के.जी.लोया -कार्यरत होते ,
या सर्वांसोबत गंगाखेड येथील वास्तव्य फारच आनंददायक आणि सुखद होते.
या कार्यालयीन आठवणी काळाच्या ओघात विरळ आणि पुसट होत जातात हे खरे असले तरी या सहवास आठवणी ,हैद्राबाद बँक -शाखा गंगाखेड आठवणीत अगदी ठळक असणार आहे..मग भले ही आता तर आमची हैद्राबाद बँक " हे नाव  इतिहास -जमा झालेले आहे.असो..
वाचन आणि लेखन -माझ्या या आवडीबद्दल माझे मित्र दिलीप शिरपूरकर यांना कल्पना होती .हे लक्षात ठेवून त्यांनी  .प्रा .दिनानाथ फुलवाडकर , आणि प्रा .मधुकर देशपांडे .या दोन साहित्यिक जेष्ठ मित्रांशी माझा परिचय करून दिला , आणि माझ्यातील साहित्यिक -व्यक्तिमत्वाला घडविणारे हे दोन गुरुतुल्य -मित्र आणि त्यांचा स्नेह मला मिळाला " ही गंगाखेड गावाची मला मिळालेली सर्वात मोठी आणि महत्वाची देणगी आहे.
. .
माझ्या लेखनाचा खर्या अर्थाने श्रीगणेशा झाला तो संत जनाबाईच्या या पावन क्षेत्री -गंगाखेड गावात " हे मी अगदी आनंदाने आणि अभिमानाने गेली ३५ वर्षे सांगत आलो आहे आणि या पुढे सांगत राहीन.
फुलवाडकर सर, देशपांडे सर , शिरपूरकर अनिल रामदासी , शरद कुलकर्णी मांगलेकर , शिवाजी मरगीळ, बाबा कोटम्बे  अशा काही लेखन -मित्रांनी  "कथा -नाद मंडळ " सुरु करून मनमुराद लेखन केले . 
या कथानाद मंडळाने ..आमच्यातील साहित्यिकावर लेखन-संस्कार केले, कथा , कविता यावर साधक बाडक चर्चा ,आणि एकमेकेंच्या लेखनाचे वाचक होऊन .जे प्रोत्साहन मिळाले ..त्यातूनच आम्ही आज साहित्यिक क्षेत्रात थोडेफार कार्य करीत आहोत .

प्रा ,मधुकर देशपांडे -हे पुणेकर ,जनाबाई कॉलेजातील प्राध्यापकाच्या नोकरी निमित्ताने गांगाखेडी वास्तव्यास होते , पण इथे राहून त्यांनी माझी सारख्या अनेक लेखक-कवींना मोलाचे मार्गदर्शन केले ,हीच महत्वाची भूमिका प्राचार्य फुल्वाडकर सर अजूनही तितक्याच आस्थेने पार पडत असणार हे मी सांगू शकतो .
त्यावेळी गंगाखेडला .देशीकार -लेणी " हे साप्ताहिक प्रकाशित होत असे ..त्यातून आमचे लेखन .प्रकाशित होत असे.
गंगाखेडला असतांनाच माझी पहिली कथा - काचेचे हिरे .. परभणीच्या  "दिलास "मध्ये १५ ऑगस्ट -१९८४ किंवा १९८५ ,या वर्षी प्रसिद्ध झाली .

श्री.शंकर इंगळे संपादक असलेल्या .काहूर "साप्ताहिकाची विनोदी लेखन -स्पर्धा .१९८८-८९ मध्ये झाली होती .त्या कथा-स्पर्धेत .माझ्या कथेला प्रथम -पुरस्कार मिळाला " हा माझ्या साहित्यिक जीवनातील पहिला-वाहिला साहित्य पुरस्कार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे ,मी  अजून ही संपादक मित्र - शंकर इंगळे यांच्या "काहूर -दिवाळी -अंकातून  हक्काने लेख करतो आहे .

वकील कॉलोनीत - आदरणीय किशनराव चौधरी वकीलसाहेब .यांच्या वाड्यातील समोरच्या तीन रूम मध्ये मी सहकुटुंब वास्तव्यास होतो , स्वतः वकीलसाहेब एक उत्तम साहित्यिक होते ,आणि ज्यावेळी माझ्या घरी .कथा -नाद मंडळ .जमत असे ..त्यात वकीलसाहेब स्वतःचे साहित्य सदर करीत असत .
घरमालक म्हणून आम्हाला वकीलसाहेब कधीच जाणवले नाहीत .पण "वडिलधारे -अण्णा " हे त्यांचे व्याक्तीरूप मनात अढळ आहे , या घरातील वास्तव्यात आम्हे भाडेकरू नव्हतो तर चौधरी परिवारातील एक सदस्य "म्हणून वावरलो.हे आवर्जून सांगावे वाटते .
फेब्रु- २०१७ या महिन्यात  पुण्यातील एका पारिवारिक विवाह-समारंभात .अगदी अचानक श्री.उदय चौधरी -वकीलसाहेब व त्यांचे कुटुंबीय भेटले , २० वर्षानंतर आमचो समोरासमोर भेट झाली , आणि "गंगाखेडी दिवस आठवले ,खूप छान वाटले त्यादिवशी .

अम्बाजोगैला मी कोलेजात असतांना म्हणजे -१९६८ ते १९७१ -या काळात होस्टेल वर माझा मित्र एक ..गंगाखेडकर -होता त्याचे नाव - भगवान आंबेकर , गंगाखेडला त्याचा पुन्हा सहवास मला लाभला , आणि अलीकडे पुण्यात त्याची सुखद पुनर्भेटझाली 
गंगाखेड सुटल्यावर मी माझ्या गावी परभणीला ..१९८६ ते २००६ अशी २० वर्षे होते ..या काळात .गंगाखेद्ची स्नेही मंडळी परभणीला येत असत तेंव्हा भेटी व्हायच्या .. श्री.सुर्यकांत जेठुरे, गोविंदराव आळनुरे वकीलसाहेब  न चुकता भेटून ख्याली-खुशाली विचारीत ...

श्री.चंद्रकांत मुधळावाडकर , श्री .रावसाहेब राजेंद्र , श्रीनिवासराव राजेंद्र ..ही माझी पारिवारिक नातेवाईक मंडळी,, यांच्याकडे गेलो म्हणजे गोदाकाठी फिरून येण्याचा आनंद घेत असे.
गंगाखेडच्या नवरात्री उत्सवात ..श्री बालाजी दर्शन ,अंबाबाई दर्शन ..या साठी आम्ही सगळा स्टाफ सह-परिवार जात असुत , खूप भव्य असा हा सोहोळा स्मरणात जशाचा तसा आहे. माणिक पाठक यांच्य्मुळे "श्री बालाजी ला प्रसाद -गंगाळ " सेवा आम्हाला घडली ,आणि वेगवेगळे प्रसाद मिळाले 

प्रिय सह्कारीमित्र -श्री चिनके ,आणि सौ.उषाताई चिनके - यांच्या गीता -मंडळाच्या कार्यक्रमात मी एकदा येऊन गेलो , आम्ही पाहिलेल्या चिनके वाहिनी .आज गीता-परिवाराच्या कार्यामुळे. सर्वपरिचित झाल्या आहेत , त्यांच्या या पवित्र कार्याला अभिवादन करतो.
सध्या फेसबुक आणि इंटरनेटवर लेखन करीत असतांना -गंगाखेडकर असलेले -. श्री.राजेश्वर शेट्ये - वकील आणि चित्रकार , आणि मेघराज मोकाशी -कवी-चारोळीकार - हे दोन कलाकार मित्र नियमित भेटत असतात . ही दोन्ही माणसे पुन्हा भेटली म्हणजे गंगाखेड च्या आठवणी होतात ..
मित्र हो .आता आयुष्याचे निवृत्ती पर्व "सुरु झाले आहे .पण, मी अजून स्वतःला कार्यरत ठेव शकलोय .ते लेखनामुळे .आणि मी लेखक -साहित्यिक झालोय ते फक्त "गंगाखेडमुळे ".
माझ्या आठवणीतले गंगाखेड .म्हणजे गोदामाईच्या निर्मल प्रवाहासारखे ..अखंड प्रवाही .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(साभार - काहूर दिवाळी अंक -२०१७ मध्ये प्रकाशित . आभार .संपादक श्री.शंकर इंगळे )
लेख---
माझ्या आठवणीतले गाव -
गंगाखेड.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------

No comments:

Post a Comment