Wednesday, December 6, 2017

लेखमाला - हितगुज - लेख-१२ वा - श्रावण महिना -अगाध महिमा ..!

लेख-क्र- १२ 


लेखमाला -
हितगुज -
लेख-
श्रावण महिना -अगाध  महिमा ..!
------------------------------------------------------------------------------
उन्हाळा सरतो आणि पावसाळा सुरु होतो .कोरड्या रुक्ष वातावरणात जादुई बदल घडून येतो ..ग्रीष्माच्या काहिलीने सारी सृष्टी .प्राणी-पक्षी ,मानव सारे तहानलेले जीव.. वर्षा आगमन झाले की ..आकंठ तृप्त होऊन जातात .बोडके डोंगर हिरवाईने झाकून जातात , कोरड्या नद्या ,लहान -मोठे ओढे -नाले .दुथडी भरून वाहू लागतात ,डोळ्यांना आल्हाददायक असा सुंदर निसर्ग दिसू लागतो ..आणि मोराच्या मोरपंखी पिसारा  -नृत्यावर अवघी  सृष्टी थिरकू लागते ..
आपल्या सांस्कृतिक जीवनातील एका मोठ्या आनंद-पर्वाचा आरंभ वर्ष ऋतूत होतो ..श्रावण महिन्यात  आपल्या सांकृतिक -जीवनातील आनंदाचे -आणि परंपरेचे  इंद्रधनुष्य आकारून येते ..श्रावणातील  सगळे उत्सव हे आपल्याला सहजीवनाचे महत्व पटवून देतातच त्याच बरोबर समूह -जीवनाचे संकार सुद्धा या श्रावणातील सणांच्या निमित्ताने आपण सर्व अनुभवत असतो.
श्रावण महिना सुरु होतो आणि मग ..थेट दिवाळी पर्यंत ..आपल्या घरात आणि सभोवताली उत्सवाचे ,आनंदाचे ,जल्लोषाचे  चैतन्यदायक असे वातवरण असते.  श्रावण महिन्याचे महात्म्य - येणाऱ्या सणांचे महत्व आपल्याला साहित्यातून मिळते , साजर्या होणार्या उत्सवातून मिळते ..बघा ना - या श्रावण महिन्यात आपण कोण-कोणते सण साजरे करून आनंद मिळवत असतो आणि आपल्या संपन्न सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घेत असतो....

व्रत -वैकल्ये , उपास-तपास , देवदर्शन ,  विविध सण.यांचे रेलचेल श्रावणात असते .श्रावणात पाने-फुले बहरून आलेली असतात  पूजा -अर्चा आणि देवापुढे सजावटीसाठी अनेकरंगी फुलांच्यी सजावट केली जाते .
श्रावण-सोमवार "चे उपवास अत्यंत श्रद्धाआणि भक्तिभावाने केले जातात ...
भगवान श्रीशंकर - अर्थात भोलेनाथ ,महादेव " यांचे दर्शन घेण्यासाठी ज्योतिर्लिंग -स्थांनी आणि इतर ठिकाणी दर्शन घेण्यासाठीचे जाणे "हा प्रवास आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारा आहे.." ही जाणीव तुम्हाला निश्चितच अध्यात्मिक अनुभूती देणारा अनुभव ठरेल ....

नाशिक- त्र्यंबकेश्वर, वेरूळ -श्री घृष्णेश्वर , श्री.क्षेत्र -भीमाशंकर आणि औंढा -नागनाथ ,ही ठिकाणे   ,आणि इतर अनेक ठिकाणी आपण देवाधिदेव-महादेव यांचे दर्शन घेण्यासाठी नक्कीच जात असतो ..या श्रावणात आणि इथून पुढे नेहमी ..दर्शन -यात्रा करीत असतांना ..भोवतालीच्या   नयनरम्य  निसर्गास  डोळसपणे पहावे - म्हणजे - निसर्ग-यात्रा आणि दर्शन्यात्रा " दोन्ही सफल झाल्याचा आनंद तुम्ही नक्कीच अनुभवाल.

उन्हाळ्याच्या दिवसात ..अनेक गोष्टींचे सरसकट दुर्भिक्ष्य असते .त्याउलट श्रावण सुरुझाला की-दुष्काळ संपून जातो आणि सर्वत्र भरभरून आले आहे अशी भावना आपल्या मनाची होऊन जाते .
 बाजारात आलेल्या नव्या-नव्हाळीच्या हिरव्यागार भाज्या आपले लक्ष वेधून घेतात ..या चवदार भाज्या -मन आणि पोट -दोन्हीना तृप्त करून टाकतात .

श्रावण महिमा - अर्थात "श्रावणातील कहाण्या " यांना घरा घरात महत्व  आहे .आपल्या अनेक पिढ्या या श्रावण --कथांचे मनोभावे श्रवण करीतच जीवनानुभव घेत आहेत ..या  महिन्यातील दररोजचा दिवस  जणू " एक सण " म्हणून साजरा होत असतो ..
..सोमवार नंतरचा "मंगलवार - श्रावणातल्या मंगळवारी ...श्री मंगळागौरीचे पूजन "केले जाते . नव -विवाहित जोडप्यासाठी  हा उत्सव असतो .सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी .नववधू मंगळागौरीचे पूजन करीत असते .अलीकडे तर मंगळागौरीचे-पूजन " एक मोठा इव्हेंट " झालाय  साग्र-संगीत स्वरूपात साजरा होणारा उत्सव म्हणजे सर्वासाठी स्नेह-संमेलनच असते. मंगळागौर- पूजा आणि ,त्या निमितानेचे "रात्र-जागर " महिला -भगिनी वर्गासाठी जणू आनंदमय जागर "असतो..
"नागपंचमी " या सणास आपल्या परंपरेत खूप मोठे स्थान आहे .ग्रामीण-भागात "नागपंचमी "च्या सणा-निमित्ताने "माहेरवाशीण -लेक " माहेरी जाण्यास अतीव उत्सुक असते , मैत्रिणी सोबत -हा सण.आणि त्यांच्या सोबत "झुल्याव्रचे झोके घेणे " या लेकी -बाळी साठी गोड स्वप्न असते .
राखी -पौर्णिमा - या सणाला .भाव-बहिणीच्या नात्याला "राखीच्या रेशीम-बंधनात " अधिक दृढ करण्याच्या दिवशी आवर्जून भेटणे -ख्याली-खुशाली, विचारपूस करणे " हे सहज साधले जाते .. याच दिवशी कोळी-बांधव .दर्या -वरती "-आपल्या लाडक्या समुन्दरा वरच्या प्रेमाची -नारली-पौर्णिमा मोठ्या आनंदात साजरी करीत असतात .."नारली-पूर्णिमा आणि  नारळीभात - हे एकरूप झालेले समीकरण आहे.

जन्माष्टमी -अर्थात -गोकुळ-अष्टमी  .-आणि गोपाल -काला - दही हंडी " ,कान्हा आणि गोपाल यांची ही दही -हंडी "खूप दणक्यात संपन्न होतात ..मोठ्या शहरात गेल्या काही वर्षात .."दही हंडी " हा उपक्रम अतिशय भव्य -प्रमाणात संपन्न होतांना आपण पाहतो आहोत . सर्व थरातून मिळणारा लोकाश्रय "यामुळे दही-हंडी " लोकप्रिय झाली आहे.

श्रावणचा महिना , सावन का महिना " या दोन्ही प्रतीकांना  आपल्या कला आणि साहित्यात मुक्त कंठाने गौरवण्यात आलेले आहे ..मनभावन श्रावण ",रिमझिमश्रावण ..सावन का महिना .आणि पाउस .यांचे भावनिक नाते कवी आणि गीतकारांनी आपल्या लेखनातून  रेखाटलेले आहे .ही गीतं  मनामनात आहेत..हरेकजण  जणू आपलेच भावना -प्रतिबिंब या श्रावण गाण्यात बघत असतो .. विरह, दुरावा , मिलनाची ओढ , व्याकूळ मनाची पतीक्षा " अशा आणि अनेक भावना श्रावणातील पावसासोबत मनाशी एकरूप होऊन जातात..
माझ्यातील कवीला देखील या श्रावणाने मोहित केलेले आहे.काही कविता अंश ..
१. "श्रावणधारा पाहुनी 
हर्ष उसळतो मनी 
यावीस सखये आता 
आला श्रावण गहिरा ....(श्रावणझुले )
२.
पावसा सोबत येतात या 
प्रसन्न अशा पाउससरी
चिंब भिजवून टाकणार्या 
सरीवर सरी...                 (पाउससरी )..
३.
येणार नाही पुन्हा 
पुन्हा असा पावसाळा
ये सहेली ,मुक्त मनाने 
पाहण्या श्रावण सावळा .... (श्रावणसावळा ),

असा हा श्रावणसावळा ",त्याची ही वेगवेगळी रूपं आणि त्याच्या सहवासात .आपल्या मनाला मिळणारा आनंद आणि उत्साह ,रोजच्या  जगण्याला आलेली मरगळ नक्कीच झटकून टाकतो ..
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- क्र- १२ 
--लेखमाला -
हितगुज -
लेख-
श्रावण महिना -अगाध  महिमा ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------

No comments:

Post a Comment