Wednesday, December 6, 2017

लेख क्र-१३ हितगुज लेखमाला - लेख- मनापासून -------------------------------------------------

लेख क्र-१३ 
हितगुज लेखमाला -
लेख-
मनापासून 
-------------------------------------------------
नमस्कार मित्र  हो , 
हितगुज "लेखमालेच्या निमित्ताने आपल्या भेटी होत आहेत .संवाद साधला  जातो आहे ,आपल्या भेटी साठीचे हे किती छान निमित्त आहे हे. 
तुम्हा सर्वांना हे लेखन आवडते " अशी  पावती मला मिळते आहे , तुम्हा सर्वांचा हा प्रतिसाद जसा "मनापासूनचा आहे", त्याचा आनंद मी मनापसून घेतोय..
मन करुणेचा डोह , 
मन मायेचा सागर
मन सरिता प्रवाही , 
 मनात भरती प्रेमाची ...||
अशी अवस्था मोठी आनंद देणारी आहे.

"मनापासून " या शब्दातूंच  आपल्याला उत्स्फूर्त-भावनेचा स्पर्श होत असतो .आता हेच बघा की ,  मी काय, तुम्ही काय ,अगदी कुणी असो,  आपण जे कार्य आपल्या हातात घेतो ते पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण अगदी मनापासून करीत असतो , 
-तन-मन-धन " अर्पण करून स्वतःला कार्यात झोकून देतो  .अशी अवस्था कधी असते ? याचे  उत्तर आहे" जेंव्हा आपण काम मनापासून करीत असतो." आपले काम पाहून बघणारे म्हणतात ..क्या बात है..इसको बोलते काम. !.अगदी मनापसून काम केलाय "जाणवले बरं का .

ज्या कामात आपले मन नाही, आणि त्याची  आवड पण नाही  ? या उपर ही .काम  करावे लागले ..तर त्या कामाला काहीच अर्थ रहात नाही, "पाट्या टाकूनही काम. होतातच की , गम्मत म्हणजे  .हे काम पाहून तुम्हालाच ते "निर्जीव ", बेजान काम वाटेल , कारण "मनापसून -अगदी जीव ओतून .जे काम आपण पूर्ण करतो ..त्याचे तेज" काही वेगळेच असते ..जे लगेच मनाला भावते आणि डोळ्यांना दिसते .

आपण व्यावहारिक आयुष्यात वावरतांना .मनाला फार वेगळे करू शकत नाही..हे लक्षात ठेवायला हवे ..अनेकजण असे आहेत  की जे म्हणतात ."आम्ही भावना आणि व्यवहार यांची गल्लत करीत नाही . दोन्ही दोन बाजूला "ठेवूनच व्यवहार करतो , तुमच्या सारखे  भावनिक गोंधळ आम्ही घालीत नाहीत ,काही मर्यादेत हे बरोबर असेलही , 
पण, सगळेच कारभार आणि व्यवहार असे  .रुक्षपणे आणि पैशांच्याभाषेत  नाही होऊ शकत .आणि सगळेच लोक काही अशा कोरड्या मनाचे लोक नसतात ".वरवर आणि तोंडदेखले व्यवहार भावनेच्या जगात कधीच चालत नाहीत ..
कारण -- या जगात आपण नेहमीच आपल्या माणसांसाठी जे -जे काही करतो ते आपलेपणाने आणि मनापसून करतो " हे गृहीत धरलेले असते , असे जर नाही झाले तर ,आपलीच माणसे बोलून दाखवतील की - बघा ..परक्या सारखं वागला माझ्याशी , मनापसून केलं असता तर किती बरं झालं असत. "..! ,
"मन जिथे नाही ..तिथे काही नाही..! 
 मन सदा रिते रिते, काय मिळे कुणा तिथे ?
असे असता कामा नये , ....!

.म्हणतात ना "जीव भावाचा भुकेला असतो..प्रेमाचा भुकेला असतो ..तुम्हीच एक दृश्य द्लोया समोर आणून पहा. "आपण ज्यावेळी आपल्या एखाद्या मित्राकडे , पर्रीचीताकडे , नातेवैकाकडे जातो .तिथे गेल्यावार त्यांच्या .घराचे दार उघडल्यावर तुम्हाला जाणवते " माझे स्वागत या घरतल्या माणसांनी अगदी मनापसून आणि आनंदाने केले आहे ", ,मग, नंतरची भेट आणि बोलणे .आपण  आपल्या आठवणीत साठवून ठेवतो. आणि याच्या विपरीत अनुभव खूप वाईट वाटायला लावणारा असतो..पुन्हा अशा घरी  जावे ? असे मनापसून वाटेल का ? याचे उत्तर तुम्हीच द्या. 

आपल्याला करावयाचे एखादे काम असो , विद्यार्थी म्हणून शाळा -कॉलेजचा अभ्यास  असो, परीक्षेची तयारी असो ..कलेची साधना असो, साहित्याचे लेखन असो ,वा साहित्याचे वाचन असो या सगळ्या गोष्टी ."मनापासून करायच्या असतात .तरच त्याचा काही उपयोग ."वरवर कितीही करा..काही साध्य होत नाही ".तसे पाहिले तर अगदी कलत्या वयापासून ते अगदी मोठे झालो तरी .कुणी न कुणी आपल्याला सांगणारा असतो,आणि तसा भेटत असतो.. जो म्हणतो .."बाबा रे .जे करायचे ते व्यवस्थित कर,अगदी मनापसून कर , मग, काही काळजी करू नको.सगळं काही नीट होईल ", या सांगण्यात किती आश्वासकता आहे , हे सकारत्मक सांगणे मनाला मोठे क्रियाशील होण्याचे बळ देणारे आहे.."असे कुणी नेहमीच भेटावे ..जो तो मनापसून काम करू लागेल ".

आपल्या मनाच्या इतकी प्रचंड शक्ती असते की .." या उर्जेचा वापर मनापसून ज्याला करता आलायं  त्यांच्या हातून चमत्कार वाटावेत अशी कार्य सफल-पूर्ण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत . पद्धत एकच -विचार एकच ..
"जे करावे ते मनापसून , जे करायचे तेही मनापसून .
"भक्ती, श्रद्धा , या दोन्ही भावना ..देखील "मनापासूनच्या असल्या तर श्रद्धेला फल आहे , भक्ती आणि श्रद्धायुक्त मनाने .मनापसून जो भगवंत -स्मरण करतो " त्याचे रसाळ फल तो अनुभवत असतो . या उलट ,ज्याचे असे मन नाही ..करायचे म्हणून जो करतो .त्याला काहीच मिळणार नाही .

कार्य कठीण व सोपे ..हे कधीच महत्वाचे नसते , महत्वाचे असते ते .या कामात आपण मनापासून असणे 
या संदर्भात माझ्या चार ओळी --मनापसून आपल्याला सप्रेम सादर ..

कार्य पूर्ण करण्या 
जिद्द असावी मनाची 
जिद्दी सोबत असावी 
तयारी मनापासूनची ...||

आजचा हा लेख .तुम्हा सर्वांना "मनासून आवडावा " हीच इच्छा .तुमचे अभिप्राय जरूर कळवावे 
शुभेच्छा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हितगुज -लेखमाला 
लेख-
मनापसून .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 

No comments:

Post a Comment