Friday, December 15, 2017

लेखमाला -हितगुज लेख क्र-१९ दसरा सण मोठा ...!

लेखमाला -हितगुज 
लेख क्र-१९ 
दसरा सण मोठा ...!
----------------------------------------------
नमस्कार मित्र हो - 
नवरात्रीची जागरणं, आरती ,गरबा ,सांस्कृतिक कार्यक्रम ..घरात नवरात्रीचे  पवित्र -मंगलमय वातावरण , एक माहौल बन गया हर तरफ ", असेच म्हणवे वाटत असेल नाही ! , बघा ना , गणेश उत्सव , महालक्ष्मी पूजन ,नवरात्र -घट-स्थापना ,आणि विजयादशमी ..दिवस कसे आले आणि कसे गेले ..एकदम .भारलेले आणि झपाटलेले .! बरोबर ना ?

आपल्या दैनंदिन जीवनातल्या एक सारख्या वेळा -पत्रका प्रमाणे वागून आपले मन एकसुरी आयुष्य जगात असते , आणि मन ,ते देखील सवयीने डोळ्यावर झापडं बांधून वागत असते ..अशा वेळी ..आपले हे सणवारांचे दिवस आणि महिने सुरु होतात ..जादूच घडते ..सगळीकडे एक चैतन्य येते ..भक्तीभाव .एक चेतना निर्माण करतो .आणि मनाला उत्साहाचे उधाण येते , आपल्या सांस्कृतिक जीवनात आपण हे सण घरगुती स्वरूपात .परिवारात साजरे तर करीतच असतो , त्या पेक्षा जास्त  हे सगळे सण- उत्सवी स्वरूपात .सामुहिक स्वरूपात साजरी केली जाण्याची जे आपली परंपरा गेल्या शेकडो -हजारो वर्षापासूनची आहे ..त्यात आपल्या विशाल अशा सामुहिक समाज-जीवनाचे प्रतिबिंब दिसून येत असते .
दरवर्षी भारतीय महिना -अश्विन -शुध्द -प्रतिपदा -या दिवशी ..शारदीय नवरात्र आरंभ होते - आणि पुढे १० दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो अश्विन शुद्ध -दशमी .म्हणजेच ..विजया दशमी- दसरा ..हा मोठा सण असतो .दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा " अस बहुमान या दिवसाला प्राप्त झालेला आहे.

विजयादशमी .म्हणजे अनेक अर्थाने यशोगाथा आहे..आपल्या सांस्कृतिक ठेव्यातून .विजयादशमीच्या विजयी -गाथा आपल्याला वाचायला मिळतात ..सुष्ट -आणि दुष्ट यांच्यातील युद्धात .नेहमीच दुष्ट प्रवृतीचा नाश होतो .असा संदेश या दसरा -सणातून मिळतो ..राम-रावण युद्ध त्यातील श्रीरामाचा विजय ,  आणि आपल्या भक्तांना त्रास देणाऱ्या महिषासुर नामक राक्षसाचा -दैत्याचा ,दुर्गा -मातेने केलेला  वध "  या घटना विजयादशमीच्या दिवशी झालेल्या म्हणून हा दिवस विजय साजरा आणि आनंद साजरा करण्याचा . नवरात्री -विजयादशमी -दसरा " हे पर्व आपल्या देशभरात साजरे केले जाते , नवरात्र अर्थात -दुर्गापूजन -देवी पूजन असते 
प.बंगाल मध्ये दुर्गा -पूजा मोहोत्सव , उत्तर भारतात .रामलीला -उत्सव .असे या नवरात्रीचे स्वरूप असते ,
म्हैसूरचा दसरा "तर जगभर प्रसिद्ध आहे. या दिवशीची दसरा -महोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक म्हैसूर येथे येत असतात. असो.

नवरात्र-आरंभ होते आणि आपण सारे आतुरतेने वाट पाहू लागतो -विजयादशमी -ची ..लहानपणापासून आपण एक प्रसिध्द हाक ऐकत आलो आहोत .. "मोरूचा बाप मोरुस म्हणाला - मोरू उठ - नवरात्र सरले ..दसरा उजाडला ...!
दसरा -पहाट-उजाडते आणि आपण सगळे मोठ्या आनंदाने दसरा सण साजरा करण्याची तयारी करू लागतो ..
शुभ-कार्य आणि शुभ-योग म्हणून असलेल्या "साडेतीन मुहूर्त पैकी - दसरा -हा पूर्ण असा अत्यंत जनप्रिय असा शुभ-मुहूर्त आहे. या निमित्ताने -हर एक जण- त्याच्या योजनेप्रमाणे - संकल्पने प्रमाणे  नवे उद्योग, नवे व्यवसाय , नवे घर, नवे वाहन .नवे दागिने ..नव्या गोष्टीं, यांचा शुभारंभ ..करीत असतो ..आणि दसरा मुहूर्त - भरभराटीचा - यशाचा -भाग्याचा आहे " अशी श्रद्धा आपल्या सर्वांच्या मनात असते 
आपल्या गावाच्या सीमा उल्लघन करून .तिथे असलेल्या मंदिरात देव-दर्शन घेऊन , शमी पूजन करून एकमेकांना .आपट्याची -शमीची पाने देऊन शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला जातो . 
आताच्या नवीन परिभाषेत आपण असेही म्हणू या की ..नव्या नव्या कार्य क्षेत्रात सीमा ओलांडून कार्य-पुरती करून यश मिळवत नवी क्षितिजे  काबीज करीत पुढे जात राहायचे ..हे असे सीमा-उल्लघन आपल्या साठी विजयाची कहाणी असेल ..याला आपण विजयादशमी म्हणू शकतो की.
आपणा सर्वांना दसरा -विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ,
लेख-क्र-१९ 
दसरा सण मोठा !
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 

No comments:

Post a Comment