Friday, December 15, 2017

लेखमाला - हितगुज लेख - १६ वा श्री गणेश उत्सव - एक सार्वजनिक महोत्सव .

लेखमाला - हितगुज 
लेख - १६ वा 
श्री गणेश उत्सव -
एक सार्वजनिक महोत्सव -
------------------------------------------------------------

गणपतीबाप्पा मोरया " या जयघोषात श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी " मंगलमूर्ती श्री गणनायक " .विघ्नहर्ता-गणराया " यांची प्रतिष्ठापना करण्यात येते . आणि मग पुढे  .."अनंत चतुर्दशी -पर्यंत  विविध कार्यक्रमांच्या आयोजनात लहान -मोठ्या आणि भव्य ते अतिभव्य "अशा सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा ,..कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा सार्वजनिक उत्सव धमाल उत्साहात साजरा करण्यात येतो.
आपल्या मराठमोळ्या -सांस्कृतिक जीवनात .या गणेश-उत्सवास फार मोठे मनाचे स्थान आहे. सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा गणेश उत्सव  शतकोत्तर -रौप्य -महोत्सव वर्षात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो आहे .हे एक फार मोठी अशी सामाजिक आणि सांस्कृतिक अशी घटना आहे.
श्री गणेश देवता ६४ कलांची देवता म्हणून -कलावंतांचे आराध्य दैवत आहे ..गणेश -उत्सवामुले  .कलावंतांना प्रोत्साहित करणारे एक महत्वाचे व्यासपीठ मिळते आणि यातूनच अनेक कलावंत  आपली ओळख निर्माण करून जातात 
सार्वजनिक स्वरूपात  गणेश उत्सव .साजरा करतांना त्यामागचा .प्रमुख  उद्देश जो ..होता आणि तोच अजूनही आहे ..तो म्हणजे .
समाज-प्रबोधन करणे आणि समाजिक उपक्रम करून -समाजसेवेचे कार्य  करणे ". या दोन्ही उद्देशांची पुरती होते आहे " हे आपण सर्व पाहतो आहोत.
कालामानानुसार या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे ..समाजातील बदलत्या रुचीचे  -संकल्पनांचे प्रतिबिंब या उत्सवात पाहण्यास मिळते ...
जुन्या काळात गणेश-उत्सवात ."सादर होणारे मेळे" हे प्रमुख आकर्षण होते , त्याशिवाय .शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि सर्व-प्रिय फिल्मी-संगीत ..विषयक कार्यक्रम सादर करणाऱ्या गायक -कलावंतांना या महोत्सवाने फार मोठी ओळख निर्माण करून दिली ..फिल्मी-गाणी सादर करणारे -संगीत -समूह -ग्रुप.
ऑर्केस्ट्रा " गावोगावी कमालीचे लोकप्रिय झाले होते , नाटकवेड्या -रसिकांना .नामवंत नट-संचातल्या नाटकांची मेजवानीअसे, लोक-संगीत कार्यक्रम धडाक्यात होत असत  यावरून महोत्सवात फक्त ..मनोरंजन आणि करमणूक "  साधले जात असे असे मात्र मुळीच नाही,
अनेक गणेश -मंडळातून .."बौद्धिक -खुराक देणारे , आध्यत्मिक आणि वैचारिक वृद्धी करणारे , धार्मिक- आख्याने-आणि कीर्तन .असे प्रभोधन आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम आवर्जून सादर केले जायचे ..
सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे स्वरूप ..पुणे-मुंबई .या शहरापुरते होते ..असे नही. महाराष्ट्राच्या लहान -मोठ्या सर्व गावातून गणेश-उत्सव म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम " हीच ओळख समाज मनावर  पक्की ठसलेली आहे 
या झाल्या जुन्या काळातील गणेश-उत्सवाच्या आठवणी ..
आता गेल्या काही वर्षात ..सार्वजनिक गणेश उत्सव ",मंडळ " या नावालाच ..वेगळा अर्थ निर्माण होत जातोय ,समाज-प्रबोधन " हा उद्देश ..बाजूला राहून जातोय की काय.अशी चिंता .सामान्य जनाच्या मनात आहे. कारण .या उत्सवाचे दर्शनी रूप दिवसे दिवस अधाकिक .भव्य , आणि खर्चिक स्वरूपाचा उत्सव "असे दिसू लागले आहे. आर्थिक आणि राजकीय .आश्रय " यामुळे"या उत्सवाचे "अर्थ-कारण " हे कुतूहलाचा विषय आहे.
नव्या सार्वजनिक मंडळांचे हे उत्सव ..कला-संगीत -सांस्कृतिक 'कार्यक्रमास प्राधन्य देण्या पेक्षा दिमाखदार सजावट , आणि ध्वनी -वर्धक यंत्रांच्या गराड्यात हे उत्सव साजरे होऊ लागले आहेत , या उत्सवातून अल्प प्रमाणात दृक-श्र्व्या .माध्यमातून काही सांस्कृतिक  कार्यक्रम सादर केले जातात असे दिसते  . 
सार्वजनिक उत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रम फार कमी झाले असतील .तरी.. मोठ मोठ्या सोसायट्या मधून .आपल्या आठवणीत असलेल्या गणेश उत्सवाचे स्वरूप आणि ते कार्यक्रम ' सोबतीला आधुनिक तंत्र-ज्ञाच्या मदतीने होणारे खेळ आणि सपर्धा " यामुळे गणेश-उत्सवाचे उत्साही वातावरण अनुभवता येते.
असो, गणेश-उत्सव म्हणजे आपले सांस्कृतिक जीवन संपन्न करणारा कला-उत्सव आहे ..इतक्या वर्षांची संपन्न परंपरा लाभलेला हा उत्सव .बदलत्या स्वरूपात का होईना .साजरा होतो आहे ..ही त्या -गणाधिपती -कलाधिपती -गणरायांची कृपाच आहे .आपण याचा आनंद घेत राहू या .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख--
श्री गणेश उत्सव -
एक सार्वजनिक महोत्सव 
अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment