Friday, December 15, 2017

लेखमाला -हितगुज - लेख क्र- १८ " सूर जुळणे ...!

लेखमाला -हितगुज -
लेख क्र- १८ 
" सूर जुळणे ...!
----------------------------------------
एक व्यक्ती म्हणून , एक माणूस म्हणून आपण सतत अनेकांच्या संपर्कात येत असतो ,दोन व्यक्तींचे भेटणे असो, की , अनेक व्यक्तींशी एकाच वेळी बोलणे असो ..या प्रसंगी .कधी मनापासून बोलायचे असते , काही ठिकाणी .सहभाग आहे म्हणून काही व्यक्त करायचे असते , तर काही वेळा ..अत्यंत महत्वाच्या गोष्टी बद्दल चर्चा करून ..निर्णय घेण्याची जबाबदारी पार पडायची असते. हे सगळे प्रसंग ..आपली परीक्षा पाहणारे असतात ,यात  आपली कसोटी असते ...साहजिकच .आपली मानसिक अवस्था चमत्कारिक असणे वावगे समजले जाणार नाही . अशा वेळी समोरच्या माणसाशी ,व्यक्तीशी .कसे बोलायचे , काय काय बोलायचे ? याची कितीही तयारी  केली तरी ..आतून कुठे तरी धाकधूक वाटत असते .की.समोरचा बाबा .कसा असेल ? ..काहीच अंदाज करता येत नाही शेवटी आपणच  ठरवतो- जे होईल ते होईल, आर या पार .., !

आणि मग समक्ष संवाद होतांना ,चर्चा करतांना ..हळू हळू जाणवत रहाते की ..अरेच्च्या .आपण समजलो तितके काही हे अवघड नाहीये ..आपल्या अपेक्षे  पेक्षा समोरचा माणूस खूपच रिझनेबल आहे ", किती शांतपणे ऐकून घेतोय , आणि चेहेरा किती प्रसन्ना आणि बोलका आहे.पाहून वाटतंय की ..याला आपल्या मनातील समजलंय .." वा - पहिल्याच भेटीत झकास सूर जमलेत की ...!

मित्र हो - अगोदरचे  टेन्शन किती सहजपणे कमी झाले ..याचे सगळे श्रेय .त्या समोरच्या व्यक्तीचे आहे .त्याच्यातील .स्वभाव-गुणांचे आहे. आणि ...समजा , असे नसते .तर काय झाले असते .?
. चर्चा -आरंभ होण्याआधीच वातावरण गंभीर झाले असते , आपण काय बोलतो,याकडे जर त्या व्यक्तीने ."मी ऐकतोय असे दाखवून .थंड आणि मक्ख चेहेर्याने बसून राहिला असता तर काय झाले असते ..? अर्थातच ..निरास आणि बेसूर अशा या भेटी ने  ..आपल्या पदरात .काही पडले नसते .कारण .इथे .संवाद झाला नसता ..सूर जुळूनच आले नाहीत ...तर .काय होणार ? नाही का .
हे तर तद्दन व्यावहारिक उदाहरण झाले ..त्यासाठी आपल्या पारिवारिक आणि दैनदिन जीवनातीलच उदाहरण घेऊ या ..

जसे ..आपल्याला खूप मित्र असतात .पण, या मित्रांपैकी  ..खास मित्र , सख्हे मित्र , जिवलग मित्र ,.असे उप-प्रकार असतातच ना ? का बरं असे ? .मित्रच आपलेच आहेत तरी पण यात असा भेदभाव का  करतो आपण ?
याचे उत्तर पुन्हा हेच ..ज्याश्याशी मनाचे सूर जुळले ..त्याच्याशी हृदयाची तार जुळते ...नाते मधुर होऊन जाते ..
कुणी कोणत्याही वयोगटातील असुद्या , हे असेच चालू असते .कारण .जो मनाला भावतो ..ज्याच्याशी आपण मनमोकळे करून त्याला आपल्या मनातल्या गोष्टी , आपली गुपितं सांगत असतो ..अस माणूस .साधासुधा कस असेल ? तो तर व्हेरी-व्हेरी स्पेशल  असतो ..कारण त्याच्याशी ..आपले आंतरिक सूर जुळून  आलेले असतात .
पती - पत्नी -.नवरा-बायको " हे नाते बेसूर  झाले असेल तर ते किती असह्य असते..याची उदाहरणे आपल्याला बघायला मिळत असतात , असे असूनही ..ही नाती आपण निभावून नेतोच ना. यालाच तडजोड असे म्हणायचे असते या उलट ..सामंजस्य आणि सहकार्य हे ज्य्नाच्या स्वभावाचे भाग असतात  अशा कुणाही स्त्री आणि पुरुष यादोघांच्या आयुष्याला जुळून आलेल्या मनांची साथ लाभते .अर्थातच त्याचे सहजीवन म्हणजे एक सुरेल आणि मधुर असे युगल-गीत होणारच.
संगीत -सूर आणि शब्द ..हा सगळा संयोग सुरेल होण्यासाठी ..शब्दांची रचना करणारा , त्याला संगीत साज देणारा ,आणि त्या रचनेला आपल्या मधुर आवाजातून सादर करणारा " अशा  वेगवेगळ्या कलावंतांचे  सूर जुळून येतात ..त्यावेळी .रसिकांच्या समोर नाद्ब्र्हम " साकारून येणारच .
एखाद्या संगीत मैफिलीत आपण अनुभवतो ..अचानकच एखाद्या गायकाची मैफिल बेसूर होते आहे असे रसिकांना जाणवते ..गायक गात असतो, वादक  वाजवत असतात , त्यांची साथ-सांगत नेहमी सारखीच असते .तरी पण हे त्या दिवशी तरी ..त्यावेळे पुरते तरी यांत्रिक वाटू लागते ..." पता नही आज क्यू मूड नही ..! असे म्हणून सगळेच ,"सूर न जुळल्याचे एक प्रकारे कबूल  करीत असतात "..असे नेहमी नसते होत ..पण, कधी तरी असे होतच असते ,
सगळं काही सुरात असतांना एकदम ..सूर -बेसूर होतात ..
आपले आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा सगळ्यांची असते ..पण अश्या बहारदार जगण्यातले .सूर नेहमी जुळून आलेले असावे लागतात ..आणि आपल्याला सोबत अशीच माणसे असायला हवीत ..ज्यांच्याशी आपले सूर जुळून आलेले असतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -हितगुज .
लेख क्र- १८ 
सूर जुळणे "!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 

No comments:

Post a Comment