Monday, December 18, 2017

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी . लेख-११ . परभणी -माझे मुख्यालय

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी . 
लेख-११ . परभणी -माझे मुख्यालय 
----------------------------------------------------------------------

नमस्कार मित्र हो , माझ्या आठवणी तुम्हाला सांगत असतांना  आज पुन्हा ते दिवस जसेच्या तसे आठवून मन खूपच भारावून जाते आहे. 
परभणीच्या वास्तव्याने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले आणि एक सुंदर असे भावविश्व उभारले यात शंकाच नाही. या आठवणी म्हणजे मन- मोराचा सुंदर पिसरा आहे असेच म्हणावे लागेल.

४१ - वरदान -श्रीराम नगर -, कारेगाव रोड -परभणी " हा माझा वास्तव्य पत्ता सर्वपरिचित होण्याचे श्रेय माझ्यातील साहित्यिकास देतो ,कारण कॉलनीत पोस्टमन येत असे तो माझे टपाल आहे म्हणून ..एरव्ही ..त्याला अधून मधून आले असते तरी चालले असते .पण तसी संधी  फार कमी वेळा मिळाली असेल..कारण रोज माझे साहित्य विषयक टपाल असायचे .पत्र , मासिक , पेपरचा अंक .कधी चक्क मनी ओर्डेर- मानधन म्हणून येत असे ..त्यामुळे .आज टपाल काय येते ? याची उत्सुकता मला कायम उत्तेजित ठेवीत असे .गावाला जरी गेलेलो असलो तरी ..आलेले टपाल हा पोस्टमन सांभाळून ठेवीत असे,आल्यावर ..आठवणीने माझ्या हवाली करीत असे .. .गेल्या काही वर्षात ..ई-मासिक - ई-पेपर साठी लेखन करीत असल्यामुळे ..पोस्टमन "या जिवलग मित्राच्या सहवासाला दुरावलो आहे ..एक मात्र नक्की ..परभणीच्या "त्या पोस्टमन मित्राची -आठवण .नित्य नेमाने होत असते .

पारिवारिक कुलाचार मध्ये ..श्री महालक्ष्मी पूजन " हा सण खूप मोठ आणि महत्वाचा ..परभणीला या सणाचे महत्व घरोघरी आहेच आहे ..त्यामुळे एक छान वातावरण या दरम्यान असते ..३०-३५ वर्षापूर्वीच्या दिवसात तर हे सण आणि कुलाचार अगदी यथासांग आणि सार्ग-संगीत पार पाडायची पद्धतच होती ..गृहिणींना यात कुठलीच तडजोड करणे मंजूर नसायचे ..त्यामुळे .श्री गणेश उत्सव ,, महालक्ष्मी ,नवरात्र , दिवाळी ,  मकर -संक्रांत , रथ सप्तमी , श्रावण महिना ..हे महिने म्हणजे परभणीचा परिसर भक्तीरसपूर्ण आणि संस्कारशील होऊन जात असे ..आता पण यात फारसा फरक पडला नसेलच .
परभणीत माझा पारिवारिक परिसर खूप मोठा होता ..हे या अगोदरच्या लेखातून मी तुम्हास सांगितले आहे , सन- -सुदीच्या निमित्ताने या सगळ्याकडे आमचे जाणे -येणे होत असायचे .थोडक्यात आमचे वेळापत्रक तसे कायमच व्यस्त असायचे ..मुळात या सगळ्यांची आवड असल्याने.याचा आनंद घेणे सोडीत नसे.

माझे आई-वडील आणि धाकटे बंधू त्यावेळी औरंगाबादला होते ..एकदा सर्वानुमते ठराव पास झाला ..की "आपल्या महालक्ष्म्या .या पुढे ..परभणीच्या घरी - श्रीराम नगर -वरदान " मध्ये होतील .. आणि या निर्णयाने  पुढे अनेक वर्ष ..श्री महालक्ष्मीचा सण..आमच्या परिवारातील सर्वांच्या सहभागाने मोठ्या थाटामाटात पार पडला .. ..असे सर्वांनी एकत्र येऊन ..एकमेका साह्य करू ..या उक्ती प्रमाणे ..श्रम -सहकार्य करून ..आनंद अनुभवणे ..कसे असते ..हे या अनेक वर्षात आम्ही सर्वांनी तर अनुभवले .हाच अनुभव त्यावेळी माझ्या अनेक स्नेही -आणि मित्रांनी पण घेतला .
या सणामुले ..एका अर्थाने - परभणी - हे आमच्या साठी माझे मुख्यालय " झाले असेच म्हणता येईल.

परभणी - हे  रेल्वे  आणि बस ..दोन्ही मार्गांनी ये-जा करण्यासाठी खूपच सोयीचे असणारे आणि वाटणारे गाव आहे ..
मी परभणीला होतो त्या काळात मोजक्या रेल्वे -गाड्या होत्या ..अगदी चार-पाच ..म्हटले तरी चालेल,.आणि नुकतेच पाहिले -..अबब...!  ..किती रेल्वे ये-जा करतात . .किती आहे हे तर मोजता आले नाही ..उलट रेल्वे गाड्यांची नावं वाचू शकलो नाही ..अर्थात ..हा मोठा बदल सुखद वाटावा असाच आहे.

हायकोर्ट ट्रेन सुरु झाली .त्याचे अप्रूप खूप होते ..त्यानंतर तपोवन आली .. एलोरा आणि अजिंठा ..यातर होत्याच ,वेगवान होतानाची परभणी अनुभवतांना खूप छान वाटत असे ..मी खूप रेल्वे स्टेशन पाहिली ..पण.. परभणी जंक्शन ची मजा कुठेच नाही .. स्टेशनवर मिळणारी पुरी-भाजी , बाहेर असलेल्या कुंजबिहारी हॉटेलचे भजे .." मेजवानी दिल्याच्या रुबाबात मी माझ्या दूर दूर गावाहून आलेल्या मित्रांना आवर्जून खिलवले आहेत.

आम्ही राहायचो तो श्रीराम नगर हा परिसर .सुरुवातीला ..गावापासून खूप दूर आहे असे वाटायचे ,पण जस जसे दिवस जाऊ लागले ..आणि मनाने अम्हे रमत गेलो .तसे तसे ..या परिसराबद्दल खूप आत्मीयता वाटत गेली ..ती इतकी की ..परभणी -आणि श्रीराम नगर ..याशिवाय इतर ठिकाणी फार वेळ राहणे नको वाटू लागले.

बँकेच्या कामकाजात कम्प्युटर येण्यास अजून वर्षे होती ..बँकेचे कामकाज ..हाताने होत असे .. आणि परभणीच्या सगळ्या हैद्राबाद बँकेच्या शाखेत भरपूर काम असायचे .. त्यामुळे ..कॉलोनितले सगळेच तसे बिझी असायचे ..संध्याकाळी .बँकेतून आले की ..मोगलाई वेळापत्रक ..दुसरे दिवशी सकाळ पर्यंत अमलात असायचे .
आमच्या सोयी प्रमाणे घड्याळे  देखील आरामशीरपणे घंटा-घंटाभर फिरत ..असे वाटायचे.

असा हा सुखद काळ परभणीत अनुभवला .या आठवणींची उबदार रजई लपेटून घेतली की थंडीचा हिवाळा सुखकर वाटू लागतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment