Sunday, July 28, 2013

लेख -आपण असे असावे..!

लेख- आपण असे असावे .....!
-------------------------------------------------------------------------------------------
इतरांनी कसे असावे ?'" या प्रश्नाचे उत्तर देताना आपण अगदी मन-मोकळेपणाने
सांगत असतो  की ,"  कुणी कसे बोलावे, कसे वागावे, सारासार विचार कसा करावा, काय भले- आणि

काय वाईट ?
समोरच्या एखाद्या व्यक्तीला ."असे समजावून सांगण्याची  संधी आपण
सहसा सोडीत नाहीत , कारण "आपल्याला सांगणे आवडत असते.
पण -कधी "आपल्यावरच  कुणी सांगितलेले ऐकण्याची वेळ आली तर ?,
मग मात्र -आपण आपल्या सोयीचे जे आहे,जेव्हढे आहे", तेच  ऐकत असतो .
पण ऐकत  सगळे मात्र आहोत", असे भासवत असतो.
मित्रांनो " आपण आपल्याला फसवत आहोत असे वाटत नाही का ?
 आता आपल्या घरातील मुले आणि त्यांचे आई आणि बाबा

  यांच्यात मनमोकळा असा सुसंवाद    
चालू असेल तर घरातील वातावरण प्रसन्ना असणार ,
निर्मल भावना, मोकळ्या अपेक्षा ,परस्पर जिव्हाळा ,
आणि नात्यातील ओढ, ही कुटुंब -जीवनाची सुखी लक्षणे आहेत.
घरातील वातावरण नेहमी मन-मोकळे ,सुखद असायला हवे आहे आणि ,
ते आनंदी आणि हसरे -खेळकर ठेवणे" सर्वांचे काम असते.
आपण एकमेकांचे आहोत" ही सुखद भावना नातेबंध
अधिक पक्के करणारी  असते.
या साठी आई-बाबांनी मुलांसाठी वेळ द्यावा , आणि मुलांनी
आपल्या आई-बाबांच्या प्रेमावर विश्वास ठेवावा ,
म्हणजे "घर" आणि घरातील माणसे सुखी आणि आनंदी असतील
हे सांगण्याची सुद्धा गरज नाही.

वरील विवेचनावरून ,तुम्ही म्हणाल ,"आपण असे असावे ",
हे सांगायला काय जाते, रोजच्या जगण्याच्या कटकटी इतक्या
आहेत की - कुणाजवळ वेळ आहे ?
पण- खरेच विचार तर करून पहा, - आपल्या वागण्यामुळे इतराना
आनंद होण्या ऐवजी "त्रास होत असेल" तर काय उपयोगाचे ?
एकमेकाच्या सहवासाने प्रेम वाटावयास पाहिजे. आणि आपले बोलणे,
आपले शब्द नेहमी मनाला सुखावणारे असतील तर ,लोकांना ही बोलण्यास
नक्कीच आनंद वाटेल,नाहीत तर "विसंवादाची मोठी दरी निर्माण झाली तर ",
दुरावा वाटणारच.
तेव्न्हा चांगले झाले नाही कुणाचे -हरकत नाही, वाईट मात्र कधी होऊ नये ,"
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- आपण असे असावे
-अरुण वि.देशपांडे -पुणे
मो-९८५०१७७३४२
------------------------------

No comments:

Post a Comment