Sunday, July 28, 2013

लेख- स्वप्न जरूर पहावीत ....!

लेख- स्वप्न  जरूर पहावीत …!
-अरुण वि. देशपांडे - पुणे
मो- ९ ८ ५ ० १ ७ ७ ३ ४ २
------------------------------------------------------
माणसाचे मन मोठे अगम्य चीज आहे." मनाला काय हवे आहे ?
याचा शोध घेणे फार अवघड असते , कारण चंचल -वृत्ती " हा मनाचा
एक मोठा अवगुण आहे , त्यामुळे अशा मनाला आवरणे कठीणच असते ,
किंबहुना  वेळेवर मनाला सावरता येणे ", हे ज्याला जमले ,तो एक खरा
गुणी माणूस समजला जातो.
"आवडणाऱ्या  गोष्टींची प्राप्ती व्हावी वाटणे - अगदी सहाजिक आहे , आणि
हे सारे कल्पनेत खरे झालेले पाहणे आपल्याला सर्वांना आवडणारी गोष्ट आहे ,
यालाच 'स्वप्नातल्या दुनियेत रमणे " असे म्हणू या.
खरे म्हणजे - आपली स्वप्ने खरी होतील ", हीच मोठी आशादायी भावना आहे.
स्वप्ने आपल्याला उमेद देतात , मनातल्या कल्पना भरारी घेऊ पाहतात ", तेव्न्हा
याच कल्पना आपली स्वप्न बनतात .
स्वप्ने मनाला आनंद देणारी असतात , स्वप्नात रममाण झालेले मन आपले
एखादे दुख  ही विसरू शकते , स्वप्नात  मनाचे रंजन करण्याचे सामर्थ्य असते,
त्याच वेळी "आपल्या भव्य कल्पना साकार होऊ शकते याचे आत्मिक बल मिळवून
देते ते आपले स्वप्नच असते."
लहान -थोर  सारेच स्वप्न पहातात , जो तो आपल्या मानसिक कुवती प्रमाणे स्वप्न
पहातच असतो. थोर समाज -पुरुषांची स्वप्ने  दूरदृष्टीची चाहूल असते,अनेक विधायक -
-कार्य पूर्ण होण्याची स्वप्न पाहणे , त्यानुसार कार्य करणे - हे त्यांच्या "स्वप्नांचेच फलित असते."
धेय्य -पूर्तीचे स्वप्न पहाणारे सदा कार्यरत असतात , आपल्या
स्वप्न-पुरती साठी ते सतत धडपडत असतात , यश- अपयश या
दोन्ही गोष्टी आयुष्यात येतच असतात , पण खचून गेलेल्या  मनाने
उभारी घेतली तर उत्तुंग -स्वप्ने पाहणारी आणि ती प्रत्याक्ष्यात
आणणारी "जिगरबाज माणसे ", आपल्याला बल देणारीच असतात .
आपण आहोत त्यापेक्षा अधिक दिव्य  अधिक संपन्न , भव्य आणि उदात्त
संक्ल्पना -यांची स्वप्न पहाणारे " सर्वांची जीवन सुखदायक आणि आनंददायक
बनवू शक्तात.
स्वप्ने प्रत्येकजण पाहू शकतो , कोण कशाचे स्वप्न पाहिलं याचा
अंदाज करणे खरेच कठीण असते . कर्तबगार माणसे स्वप्ने पहातात ,
ती सर्वांच्या भल्यासाठी असतात , म्हणून त्याचे महत्व आहे.
संशोधक , कलावंत ,वैज्ञानिक , शास्त्रज्ञ , गुरुजन , यांची स्वप्ने हीतकारी
असतात असे म्हणू या.
आळशी माणूस देखील स्वताच्या आनंदासाठी स्वप्ने पाहतो , पण लोक
म्हणतात - रिकामी -त्याची स्वप्ने -बिनकामी ." तरीही तो आपल्या
स्वप्नाच्या दुनियेत आनंदीच असतो ना ।!
थोडक्यात काय- आपल्या आनंदसाठी  स्वप्न जरूर पहावीत .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- स्वप्न जरूर पहावीत …!
-अरुण वि .देशपांडे - पुणे .
मो- ९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment