Sunday, July 28, 2013

लेख- प्रवास-

लेख- प्रवास ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे
मो- ९८५०१७७३४२

---------------------------------------------------
बहुतांश वेळा प्रवास हा काही बघण्या साठी  केलेला असतो. कधी एखादे स्थळ, कधी प्रसिद्ध वास्तू,
कधी निसर्ग-सानिध्यात  रहाण्यासाठी  आपण प्रवास करीत असतो.
या प्रवासातील अनुभव आपल्याला जीवनाकडे  पाहण्याची नवे दृष्टी  देऊन जातात , आणि आपण
अधिक अनुभवसंपन्न  होऊन जातो, या साठी प्रवास महत्वाचा आहे.
प्रवास म्हणजे एका ठीकानाहून दुसर्या ठिकाणी जाणे ", एवढाच नाही. प्रवास ", म्हणजे अनेक
अनुभव घेत -घेत स्व:ताहात  बदल घडून येण्याची प्रक्रिया आहे.
सोबतीचे महत्व, आणि सह-प्रवासी  यांचे असणे किती गरजेचे आहे "ही गोष्ट प्रवासामुळे  कळते.,
तसे म्हटले तर आपले  जगणे हा ही एक प्रवासच असतो.".
म्हणून तर या प्रवासाला "आनंद -यात्रा" असे म्हणावेसे वाटते .
या प्रवासातील रस्ते कसे असतात पहा ...-
" कधी सरळ कधी फाकडा
   कधी  तिरका कधी वाकडा
  साथ सावली सोबत मिळता
  सुखकर झाला सारा रस्ता......||
असा ही प्रवास आपण करतो खरे , पण तो एकट्याचा प्रवास
कधीच नसतो. अनेकजण सहप्रवासी म्हणून या वाटेवर सोबत
करतात ," या माणसांना जाणून घेण्याचा प्रवास", हा देखील काही
कमी महत्वाचा प्रवास नसतो.
जीवनाच्या वाटचालीत जे अनुभव येतात, ते हे अनुभव आपली
शिदोरी असते. ही शिदोरी पाठी घेऊन आपण पुढचा सारा प्रवास
अधिक सजगपणे करीत असतो.
म्हणून तर एक व्यक्ती म्हणून आपली जी जडण-घडण " होत असते ,हे घडणे
म्हणजे देखील एका आंतर-बाह्य  अशा बदलाचा एक प्रवासच असतो.".
अशा प्रवासात आपल्या विचारांना नवी दिशा मिळते, जाणीवांना नवे धुमारे
फुटू लागतात , जुन्या धारणा बदलून , नव्या धारणा स्वीकारण्याची मनाची
तयारी होऊ  लागते.
आपण एका जागी स्थिर राहिलोत की , एक जडशीळ  अवस्था येउन  जाते ,
अशा वेळी  बदल घडवून आणू शकणारा असा  "प्रवाही -प्रवास", आपण
करायलाच हवा. यामुळे आपल्या आयुष्याला आलेली "मरगळ ", नाहीशी
होऊन, एक ताजेपणा नक्की  येतो.
पहा अनुभव घेऊन.....!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- प्रवास ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे
मो- ९८५०१७७३४२

No comments:

Post a Comment