Sunday, July 28, 2013

लेख- संयमशील श्रोता आणि प्रेक्षक ..!

लेख- संयमशील श्रोता आणि प्रेक्षक  ...!
-अरुण वि..देशपांडे  -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------
, या दोन्ही अवस्था आपल्या मनाशी  आणि मनाच्या अवस्थेशी
संबंधित आहेत. एखादी  गोष्ट  वेळेवर न केल्याने , किंवा एखादी प्रतिक्रिया
सांगण्याचे अगर व्यक्त करण्याचे मनात असूनही राहून जाते"  ",
अशा वेळी  मनाला विलक्षण अशी "रुखरुख लागून राहते ", आणि नंतर
एकांती असता मनाला मोठीच "हुरहूर लागून रहाते. ".कारण आपण एक संयमशील श्रोता आणि
प्रेक्षक होऊ शकत नाहीत .
खरे म्हणजे हे दोन्ही आपण टाळू शकतो, त्यासाठी  परस्पर उत्तम असा संवाद हवा,
आणि  समोरच्या व्यक्तीची भावना " समजंस -श्रोता  होऊन ऐकण्याची आपली  तयारी हवी."
बहुतेक वेळा - आपण ऐकून घेण्याच्या बाजूने नसतोच. आणि पुष्कळांना तर नेहमी
"आपलेच घोडे पुढे पुढे दामटण्याची  दांडगी हौस  असते".
 या अशा सवयीच्या  लोकांनी नीटपणे ऐकून घेतलेले नसते, महत्वाचा भाग राहून जातो,
आणि मग योग्य प्रतिसादा  अभावी  भावना पोचत नाहीत.,सांगणारी व्यक्ती नाराज
होऊन निघून जाते. थोड्यावेळाने  मग, आपणच मनाशी म्हणतो-
अरे- तो असे म्हटला काय..!
चुकलेच जरा ..! आणि मग मनाला विलक्षण टोचणी लागते, ही रुखरुख ", अपराधीपणाची
जाणीव  फार त्रासदायक असते.
कार्य परत्वे आपण वेळोवेळी  निरनिराळ्या लोकांशी संपर्कात येतो - त्या वेळी आपल्या स्वभावाची
एक प्रकारे परीक्षाच असते. कोण काय बोलते आहे ? " या कडे लक्ष द्यावी लागते , तसेच आपण कुणाला
काय सांगतो आहोत ", ही ही लक्षात ठेवावे लागते , "प्रसंगावधान आणि  तत्परता - हे गुण आपल्या
स्वभावात  असणे , अशा वेळी खूप उपयोगाचे ठरते .
संयमशील श्रोता आणि प्रेक्षक " अश्या दुहेरी भूमिकेतून यशस्वी वावरता येते ",अशा व्यक्ती सार्वजनिक
ठिकाणी लोकांच्या नजरेत सहजपणे भरत असतात.
तेव्न्हा - ऐकणे तत्परतेचे असावे म्हणजे ', योग्य वेळी योग्य प्रतिसाद देता येतो.
थंड आणि मक्ख चेहेरा ठेवून समोरच्या "आपल्या माणसाला निराश करून नका ".
 तुमच्या मनात काही नसेल ही ,पण तुमच्या दर्शनी रूपाने  विनाकारण तुमच्याबद्दल गैरसमज  होणे",
 नक्कीच बरे नव्हे. समोरच्या व्यक्तीला तुम्ही "बोलणे -सांगणे लक्षपूर्वक ऐकत आहात असे वाटले पाहिजे ",
तरच तुमची भेट फलद्रूप होऊ शकेल , अन्यथा .. अपूर्ण संवाद आणि दुराव्यामुळे " भेटून ही उपयोग नाही ",
असे होणे काय कामाचे ?
आपणच आपल्याला आवरावे -सावरावे आणि घडवावे सुद्धा , यालाच तर जीवनानुभव असे म्हणतात .


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- संयमशील.श्रोता आणि प्रेक्षक ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment